रोहित शेट्टीचा ‘सिंघम’ अवघ्या चार महिन्यात बनला होता!
बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक आणि अभिनेता यांच्या काही खास जोड्या आहेत. सत्तरच्या दशकामध्ये मनमोहन देसाई आणि अमिताभ बच्चन हे कॉम्बिनेशन सुपरहिट होत होते. शक्ती सांमंत आणि राजेश खन्ना, त्याचप्रमाणे प्रकाश मेहरा आणि अमिताभ बच्चन हे कॉम्बिनेशन म्हणजे यशस्वी सिनेमाची हमी असायची . अलीकडच्या काळामध्ये रोहित शेट्टी आणि अजय देवगन ही जोडी अशीच यशस्वी सिनेमांना जन्म देणारी ठरली आहे. (Singham)
रोहित शेट्टी आणि अजय देवगन या दोघांच्या मैत्रीचा इतिहास १९९१ सालापासूनचा आहे. अजय देवगन यांना त्यांचे वडील वीरू देवगन यांनी ‘फुल और कांटे’ या चित्रपटातून लॉन्च केले. या सिनेमाचे असिस्टंट डायरेक्टर होते रोहित शेट्टी. रोहित शेट्टीचे वडील फाईट मास्टर शेट्टी आणि अजयचे वडील वीरू देवगन हे दोघेही ॲक्शन डायरेक्टर होते. समकालीन होते दोघांची चांगली मैत्री होती. फाईट मास्टर शेट्टी यांचे निधन झाल्यानंतर रोहित देवगन फॅमिलीच्या जवळ आला आणि तिथूनच अजय आणि रोहित यांच्या मैत्रीचा प्रारंभ झाला. या दोघांमधील रेपो इतका जबरदस्त होता की एक सुपरहिट सिनेमा त्यांनी अवघ्या चार महिन्यात पूर्ण केला होता! आज आपल्याला अगदी अशक्य वाटेल असा हा किस्सा आहे. कोणता होता तो सुप्पर हिट चित्रपट आणि काय होते ती स्टोरी?
हा सिनेमा होता, २२ जुलै २०११ रोजी प्रदर्शित झालेला ‘सिंघम’(Singham). या चित्रपटाने रोहित शेट्टी यांच्या ‘सिंघम सिरीज’ची सुरुवात झाली. त्या नंतर सिंघम रिटर्न्स, सूर्यवंशी आणि सिम्बा हे चित्रपट आले. या सिरीजचा पुढचा चित्रपट ‘सिंघम अगेन’ या वर्षीच्या अखेरीस प्रदर्शित होतो आहे. यातील ‘आता माझी सटकली…’ हा डॉयलॉग समाज माध्यमावर प्रचंड लोकप्रिय आहे!या सिनेमात अजय देवगन ने ठेवलेल्या मिशा देखील खूप चर्चेत होत्या.
या सिरीजचा पहिला चित्रपट ‘सिंघम’ (Singham) अवघ्या चार महिन्यात तयार झाला होता! इतक्या कमी कालावधीत तयार झालेला हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. खरंतर ‘गोलमाल थ्री’ नंतर रोहित शेट्टी ‘बोलबच्चन’ या सिनेमाच्या तयारीला लागले होते. या दरम्यान सहा-सात महिन्याचा कालावधी त्यांच्या हातात होता. याच काळात एकदा रिलायन्स एंटरटेनमेंट कंपनीकडून रोहित शेट्टी यांना बोलावण्यात आले आणि त्यांनी एक सिनेमा बनवण्याची ऑफर त्यांना दिली. तेव्हा रोहित शेट्टी म्हणाले, ”आता माझ्याकडे अजिबात वेळ नाही. कारण काही महिन्यातच मी ‘बोलबच्चन’ या सिनेमाचे शूटिंग सुरू करत आहे. त्याचबरोबर माझा ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा सिनेमा देखील लवकरच फ्लोअरवर येतो आहे. त्यामुळे पुढची तीन-चार वर्ष तरी माझ्याकडे अजिबात वेळ नाही!”
तरी रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यानी एक डीव्हीडी त्यांच्याकडे दिली आणि म्हणाले, ”ही एक तमिळ मूव्ही आहे. तुम्ही बघून तर घ्या” हा एक तामिळ चित्रपट होता ‘सिंघम’. रोहितने त्या रात्री तो चित्रपट पाहिला आणि तो एकदम प्रभावित झाला. हाच प्लॉट वापरून आपण हिंदीच्या प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त ॲक्शन मुव्ही देऊ शकतो असा कॉन्फिडन्स त्याच्या मनात निर्माण झाला. सकाळी लगेच त्यांनी अजय देवगनला कॉन्टॅक्ट केला आणि त्याला रफ स्कीम सांगितली. अजय म्हणाला,” तू कॉन्फिडंट असशील तर मला काहीच प्रॉब्लेम नाही!” अशा पद्धतीने त्याने सिंघम (Singham) या चित्रपटाची सुरुवात केली. सिनेमा रिलायंस एंटरटेनमेंटने प्रोड्यूस केला.
७ मार्च २०११ या दिवशी ‘सिंघम’ (Singham) चित्रपटाचा पहिला शॉट गोव्यात चित्रित झाला आणि २२ जुलै २०११ या दिवशी ‘सिंघम’ देशभर रिलीजसुध्दा झाला! अवघ्या चार महिन्यांमध्ये सिनेमाचे शूट, एडिटिंग, डबिंग सर्व रेड्डी! ६ मार्च २०११ ला रात्री बारा वाजता अजय देवगन गोव्यात पोहोचला. तोवर त्याला स्क्रिप्ट देखील माहिती नव्हते. तरी दुसऱ्या दिवशी मुहूर्ताचा शॉट झाला. अजय आणि रोहित या दोघांमधील अंडरस्टँडिंग इतके जबरदस्त होतं की त्यांना फार काही एकमेकांना सांगायची गरज पडायची नाही.
रोहित शेट्टी यांनी सांगितले की “डोक्यात ताण तणाव नसेल तर काम अतिशय फास्ट आणि क्वालिटी होते!” चार महिन्यात त्यांनी ‘सिंघम’ (Singham) हा चित्रपट हाता वेगळा केला आणि २२ जुलै २०११ ला हा चित्रपट रिलीज देखील झाला. या सिनेमाने जबरदस्त बिजनेस केला आणि ‘सिंघम सिरीज’ इथूनच सुरू झाली. रोहित आणि अजय हे दोघे १९९१ पासून एकत्र आहेत. रोहितला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी अजय देवगन यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.
========
हे देखील वाचा : प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपडा..!
========
अजय देवगन यांनी स्वतःचे प्रोडक्शन सुरू केले तेव्हा सुद्धा रोहित त्यांच्यासोबत होता. ‘गोलमाल’ आणि ‘सिंघम’ (Singham) ही सिरीज प्रचंड यशस्वी होण्यामागे या दोघांची मैत्री कारणीभूत आहे. रोहित शेट्टीने आजवर बनवलेल्या सिनेमांपैकी जवळपास ऐंशी टक्के सिनेमाचा नायक हा अजय देवगन आहे. अजय देवगनला रोहित शेट्टी भावापेक्षा जास्त मान देतो तो त्याला लाडाने बॉस या नावाने पुकारतो. एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, ”माझ्या रुपेरी जीवनात अजय देवगन याचे स्थान सर्वात शीर्षस्थानी आहे.”