नर्गीसने नाकारलेल्या भूमिका
आयुष्यातील प्रत्येक फ्रेम सुघटीत असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं पण प्रत्येकाच्याच वाट्याला असं परीपूर्ण आयुष्य येईल असं नसतं. मग विधात्याकडून मिळालेलं जीणं अधिकाधिक परीपूर्ण कसं करता येईल याकडे सार्यांचा प्रवास सुरू होतो. मायावी दुनियेत तर याचा प्रत्यय ठायी ठायी येताना दिसतो. अभिनेत्री नर्गीसच्या (Nargis Role) जीवनालेख अभ्यासताना तिने उभारलेलं कर्तृत्व पाहतानाच आयुष्याची तिने केलेली मांडणी व प्रत्येक प्रसंगात तिने घेतलेले ठाम निर्णय याचा तिच्या जीवनावर पडलेला प्रभाव ठळकपणे दिसून येतो. ११ मार्च १९५८ ला तिने सुनील दत्त सोबत विवाह केला आणि आपला सारा भूतकाळ तिने एका क्षणात पुसून टाकला. राजकपूर हे नाव तिने डिलीट करताना तिने कुठेही कटूता ठेवली नाही. तिच्या मृत्युपर्यंत राज-नर्गीसच्या प्रेमकहाणीच्या किस्स्यांनी ती विचलीत झाली नाही. सुनील दत्तच्या मागे ती हिमालयासारखी उभी राहीली. लग्नाच्या वेळी तिच्या हातात असलेले ’अदालत’,’लाजवंती’, ’घरसंसार’ हे चित्रपट तिने आधी पूर्ण केले आणि रूपेरी पडद्यापासून निवृत्ती घेतली. आपली सिनेमातील मंडळी घटनांना कॅश करण्यासाठी इच्छुक असतात. दक्षिणेतील एक निर्माते वासन सुनील दत्त-नर्गीस यांना घेवून एक सिनेमा बनवनार होते व यासाठी दोघांना घसघसशीत असे पाच लाख मानधन द्यायला ते तयार होते!पण नर्गीसने ती ऑफर नाकारली. (Nargis Role)
अजंठा आर्टसच्या बॅनरखाली त्यांनी चित्रनिर्मिती सुरू केली. ’मुझे जीने दो’ (१९६१) या सिनेमा पासून सुनील निर्माता बनला. ’यादे’ हा जगातील पहिला एकपात्री सिनेमा निर्माण करण्याची कल्पना तिचीच होती. पण हा प्रयोग यशस्वी झाला नाही. मोठ्या आर्थिक नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी नर्गीसकडे (Nargis Role) पुन्हा निर्मात्यांनी सिनेमात काम कर्ण्यासाठी गळ घालण्याचे प्रकार सुरू झाले. बिमल रॉय यांनी ’बंदीनी’तील नूतनची भूमिका तिलाच आधी ऑफर केली होती. पण नर्गीस आपल्या ’उसुल की पक्की’ होती. खरं तर नर्गीस हा बंदा रूपया होता. तिची लोकप्रियता तिला कॅश करता येवू शकली असती पण तसे तिने केले नाही. राजकपूरला ‘संगम’च्या वेळी पुन्हां तिची आठवण झाली.’अंदाज’ चा प्रणयी त्रिकोण त्याला पुन्हा बनवायचा होता. सत्यजित रे यांनी त्यांच्या ’अभिजान’ साठी तिलाच विचारलं होतं. (पुढे हि भूमिका वहिदाने केली)(Nargis Role)
=======
हे देखील वाचा : सुनील दत्तचा एक ’पात्री’ प्रयोग
=======
मराठीत ’अन्नपूर्णा’ हा सिनेमा बनविणारे सदाशिव रावकवी यांना हाच सिनेमा हिंदीत बनवायचा होताव त्यातील सुलोचनाबाईंनी केलेली भूमिका नर्गीसला (Nargis Role) द्यायची होती. या सर्व सिनेमांना तिने नम्र नकार दिले. १९६७ साली नर्गीसचा एक सिनेमा आला होता ’रात और दिन’ हा सिनेमा स्विकारण्याचे कारण तो सिनेमा तिच्या भावाने जाफर हुसैन याने बनवला होता. या सिनेमा करीता तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९७१ साली अजंठा आर्टसचा ’रेशमा और शेरा’ आला. सिनेमाला हवं तितकं यश नाही मिळालं. ’मन का मीत’ कधी आला कधी गेला कळालेच नाही. त्या वेळी राज खोसला आणि गुलझार यांनी अनुक्रमे ’मै तुलसी तेरे आंगन की’ आणि ’आंधी’ करीता विचारले होते. नर्गीस आपल्या भूमिकेवर ठाम होती.सुनीलदत्तचे करीयर स्वत:च्या हिमतीने घडावे म्हणून तिने आपला निर्णय बदलला नाही. रसिक प्रेक्षक मात्र नर्गीसने नाकारलेल्या एवढ्या भूमिका पाहून नक्कीच हळहळले!