एस पी बालसुब्रमण्यम : पुरस्कारांचा बादशहा!
आपल्या गायकीने संपूर्ण भारत वर्षात सर्वाधिक गाणी गाऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करणारा गायक म्हणजे एस पी बालसुब्रमण्यम (S. P. Balasubrahmanyam). त्यांनी भारतातील सोळा भाषांमधून तब्बल चाळीस हजाराहून अधिक गाणी गायली. याची नोंद गिनीज बुक ने घेतली आहे. सहा वेळा नॅशनल अवॉर्ड अनेक फिल्म रिलेटेड अवॉर्ड्स, नंदी अवॉर्ड्स तसेच साउथ कडील फिल्मफेअर अवॉर्ड्स अशा पुरस्कारांचा बादशहा म्हणजे एस पी बालसुब्रमण्यम. (S. P. Balasubrahmanyam) त्यांच्या पहिल्या हिंदी गाण्याचा किस्सा एकदा त्यांनी टीव्हीवरील एका चॅनलवर सांगितला होता.
४ जून १९४६ रोजी जन्मलेल्या एस पी बी (S. P. Balasubrahmanyam) यांनी १९६६ साली पहिल्यांदा पार्श्वगायन केले. त्यानंतर पुढची पंधरा वर्षे ते दक्षिणेतील सर्व भाषांमधून गात होते. एल व्ही प्रसाद निर्मित १९७८ सालच्या ‘मारो चरित्र’ या तेलगू भाषेतील चित्रपटाचा रिमेक हिंदी मध्ये केला जाणार होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन के बालचंदर केले होते. चित्रपट होता ‘ एक दुजे के लिए’ कमल हसन आणि रती अग्निहोत्री यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. या दोघांचा हा पहिलाच हिंदी सिनेमा होता. कमल हसन साठी पार्श्वगायन एस पी बी यांनीच करावे अशी दिग्दर्शकाची इच्छा होती. त्यांनी तशी इच्छा हिंदी ‘एक दुजे के लिये’ चे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याशी बोलून दाखवली.एल पी यांच्या मनात किशोर कुमार होता. त्यांनी एकदा एस पी बी (S. P. Balasubrahmanyam) यांचे गाणे ऐकल्यानंतरच निर्णय घेवू असे सांगितले. तेंव्हा एसपीबी अमेरिकेत लाईव्ह शो करत होते.
चित्रपटाचे दिग्दर्शकाने त्यांच्याशी संपर्क साधा आणि भारतात येताना मुंबईला थांबून संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची भेट घ्या असे सांगितले. त्या पद्धतीने एस पी बी (S. P. Balasubrahmanyam) मुंबईत आले आणि एल पी यांना एका रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये भेटले. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलल यांनी एसपीबी यांना हिंदी गाणे गायला सांगितले. हिंदी गाण्यासाठी एस पी बी (S. P. Balasubrahmanyam) तेवढे कम्फर्टेबल नव्हते तरीही त्यांनी ‘दोस्ती’ चित्रपटातील ‘जाने वालो जरा मुडके देखो मुझे’ हे गाणं गाऊन दाखवलं. या गाण्याचे संगीत एलपी यांनीच दिले होते. यानंतर त्यांनी ‘मेरे महबूब’ या चित्रपटातील टायटल सॉंग गाऊन दाखवले. एल पी यांना त्यांच्या शब्दांमध्ये, शब्दोचारांमध्ये थोडा प्रॉब्लेम वाटला. म्हणून ते नंतर सांगतो असे म्हणाले. एस पी बी मद्रास ला निघून गेले.
नंतर के बालचंदर यांनी एल पी यांना असे सांगितले ,” जरी एस पी बी (S. P. Balasubrahmanyam) कडून गाताना शब्दोचारां च्या काही चुका जरी झाल्या तरी त्या ग्राह्य याच्यासाठी आहेत की चित्रपटाचे पात्र हे दक्षिण भारतीय आहे. त्यामुळे त्यांच्याकडून हिंदी बोलताना आणि गाताना चुका होणे नैसर्गिक आहे. त्यामुळे या चुकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका किंबहुना त्या झाल्या तरी तशाच राहू द्या!” दिग्दर्शकाचा हा अँगल एल पी यांना आवडला आणि त्यांनी एस पी बी ना रेकॉर्डिंग साठी मुंबईला बोलावले.
या पहिल्या हिंदी गाण्याच्या अनुभवाबाबत एस पी बी (S. P. Balasubrahmanyam)यांनी सांगितले ,”मला नर्वसनेस नक्कीच आला होता. पण तो मी पहिल्यांदाच हिंदी गात होतो याच्यासाठी नाही; तर पहिल्याच गाण्यांमध्ये माझ्यासोबत स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर गाणे गाणार होत्या. लतादीदींनी मला सांभाळून घेतले.” एसपी पुढे सांगतात,” रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये लता दीदी शुभ्र पांढऱ्या रंगाच्या साडी मध्ये अवतरल्या. जणू सरस्वती देवीच स्टुडिओमध्ये अवतरली असे मला वाटते. मी वाकून त्यांना नमस्कार केला. लतादीदींनी देखील मोकळे हसत तू चांगले गाशील असा धीर दिला! मी मात्र आतून जाम घाबरलो होतो.”
तितक्यात तिथे एकाने सर्वांना चहा आणून दिला. एस पी बीं (S. P. Balasubrahmanyam)चा हात थरथरच होता. त्यामुळे त्यांच्या हातातून चहाचा कप निसटला आणि खाली सांडला. चहाचे काही शिंतोडे लतादीदींच्या पांढऱ्या शुभ्र साडीवर पडले. ते खूपच घाबरले. त्यांना वाटलं गेलं. आपल्या हातातून गाणं गेलं आणि आपलं करिअर देखील गेलं! आपल्या पहिल्याच गाण्याच्या पहिल्या वेळी असा अप शकून घडला. त्यावर लतादीदी मात्र खळखळून हसत म्हणाल्या ,” काही काळजी करू नका. खूप चांगला शगुन घडला आहे. तुझे करिअर हिंदी सिनेमा खूप चांगले होणार आहे!” लता च्या तोंडून जणू साक्षात सरस्वती च बोलत होती. लतादीदींच्या आशीर्वादाने एसपी बी यांना धीर आला आणि त्यांनी एक दुजे के लिये चे सर्व गाणी गायली यात त्यांची लता सोबत तीन गाणी होती. यातील ‘तेरे मेरे बीच मे कैसा है ये बंधन अन्जाना’ या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
========
हे देखील पहा : यांच्या हट्टापाई राजकुमारीने १९७८ साली ही लोरी गायली…
========
कमल हसन साठी एस पी बालसुब्रमण्यम (S. P. Balasubrahmanyam) हे कॉम्बिनेशन यानिमित्ताने सुरू झाले. त्याच्या पुढच्या ‘ये तो कमाल हो गया’ या चित्रपटात देखील प्लेबॅक दिला. नंतर मात्र कमल हसन हिंदी सिनेमा सोडून परत साउथ कडे वळाले. त्यामुळे एसपीबी यांच्या हिंदी गाण्यांना देखील थोडासा ब्रेक लागला पण पुन्हा सात आठ वर्षांनी ‘मैने प्यार किया’ या चित्रपटासाठी सलमान साठी एस पी बी गायला लागले आणि त्यांचा पुन्हा एकदा जबरदस्त कम बॅक झाला. सलमान साठी एस पी बी (S. P. Balasubrahmanyam) भरपूर गायले. २०१३ साली शाहरुख खान यांच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ च्या टायटल सॉंग मुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले होते. अतिशय नेक दिलखुलास व्यक्तिमत्व एस पी बालसुब्रमण होते. २५ सप्टेंबर २०२० रोजी करोना काळात त्यांना आपले प्राण गमवावे लागले!