Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Sachin Pilgoankar :’माझं गाणं ऐकलं आणि…’ राजकुमार बडजात्यांची शेवटची इच्छा काय होती?
सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoanakr) यांचे किस्से सध्या विशेष चर्चेत आहेत… वयाच्या चौथ्या वर्षापासून हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या सचिन यांच्या गाठीशी फार अनुभव आणि आठवणी आहेत आणि त्या आठवणी ते विविध मुलाखतींमधून सांगत असतात… बऱ्याचदा त्यांचा यामुळे ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. असाच एक किस्सा त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे. या मुलाखतीत सचिन यांनी राजश्री प्रोडक्शनचे निर्माते ताराचंद बडजात्या यांचा मुलगा राजकुमार बडजात्यांची (Rajkumar Badjatya) एक खास आठवण शेअर केली आहे. यावेळी सचिन म्हणाले की, “राजकुमार बडजात्या यांनी मृत्युपूर्वी माझं गाणं ऐकलं होतं आणि ती त्यांची शेवटची इच्छा होती”… (Entertainment News)

सचिन पिळगांवकर यांनी राजकुमार बडजात्या यांच्यासोबत ‘अखियोंके झरोको से’, ‘गीत गाता चल’, ‘गोपाल किशन’, ‘नदीया के पार’ आणि ‘जाना पेहचाना’ यांसारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. सचिन, राजकुमार यांना ‘राजा बाबू’ म्हणायचे. राजकुमार बडजात्या यांच्या निधनानंतर त्यांच्या नातवाने सचिन यांना हा किस्सा सांगितला होता… तर, झालं असं की, राजकुमार यांच्या मृत्यूची बातमी समजताच सचिन अंत्यदर्शनासाठी गेले होते. त्यावेळी सूरज बडजात्या यांनी सांगितलं की, ‘माझ्या मुलाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे’ (Rajshree Procuction news)
================================
================================
‘राजश्री’ला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगांवकर म्हणाले की, ‘राजकुमार यांना ऍम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते. राजा बाबू झोपले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा नातू बसला होता. तेव्हा त्याने त्यांना विचारलं की, “तुमची इच्छा काय आहे. तुमची शेवटी इच्छा काय असं नाही विचारलं. तेव्हा ते हसून म्हणाले, ‘मला ते सचिनचं गाणं दाखवा ‘श्याम तेरी बन्सी पुकारे राधा नाम…’ मला सचिनला बघायचं आहे.’ त्याने मग मोबाईलमध्ये ते गाणं त्यांना दाखवलं. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तिथे त्यांनी जगाचा निरोप घेतला.’ (Bollywood)

सचिन पिळगांवकर यांनी ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ मराठीसह हिंदी इंडस्ट्रीत काम केलं आहे… अभिनयापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास दिग्दर्शक, निर्माता, गायक अशा विविध क्षेत्रांतही झाला… सचिन यांनी ‘शोले’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘नदिया के पार’, ‘घर दीवार’ अशा अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी उत्कृष्ट कामं केली आहेत… (Sachin Pailgoankar Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi