Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Sai Tamhankar ला करायचं होतं आमिर खान शी लग्न म्हणाली, ‘मी आमिरच्या ‘दिल… ‘
Sai Tamhankar: मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या प्रांजळ बोलण्याच्या शैलीसाठीही प्रेक्षकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. विविध मुलाखतींमधून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असते. नुकतीच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या बालपणातील एक गोड आणि मनोरंजक किस्सा शेअर केला असून, तो सध्या प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.(Sai Tamhankar on Aamir Khan)

“डिजिटल कॉमेंट्री” या प्लॅटफॉर्मवर दिलेल्या या मुलाखतीमध्ये सईने सांगितले की, लहान असताना बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा तिचा फेव्हरेट अभिनेता होता. इतकंच नाही, तर लहानपणी तिला आमिर खानशी लग्न करायचं होतं! ती म्हणाली, “मी आमिरच्या ‘दिल’ या चित्रपटाच्या कॅसेट्स जवळ ठेवायचे. आईला सरळ सांगितलं होतं मी आमिर खानशी लग्न करणार आहे.” हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर गोड हास्य होते आणि त्या आठवणींनी ती खुदकन हसली ही. सई पुढे म्हणाली, “ही गोष्ट १०० टक्के खरी आहे. आपल्या नकळत आपण ज्या गोष्टी मनातून बोलतो, त्या खरंच आयुष्यात घडतात असं वाटतं. आमिरसोबत लग्नाची गोष्ट तेव्हा एका लहान मुलीचा निरागस स्वप्न होतं. पण नशिब असं जुळून आलं की, मला त्याच्यासोबत ‘गजनी‘ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.”

सईने स्पष्ट केलं की, आमिर खानसोबत तिची नंतर पुन्हा एकदा भेट झाली, तीही सामाजिक कार्याच्या निमित्ताने. ती म्हणाली “पाणी फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात आमची पुन्हा भेट झाली. तेव्हा मी त्याला माझ्या बालपणीच्या या किस्स्याविषयी सांगितलं. आमिरने ते ऐकून मनापासून हसून घेतले. तो फक्त एक महान अभिनेता नाही तर एक दिलदार आणि नम्र माणूस आहे,” असे सईने आवर्जून सांगितले.(Sai Tamhankar on Aamir Khan)
==============================
==============================
सई ताम्हणकरचा हा किस्सा चाहत्यांना नक्कीच गोड आणि भावनिक वाटणारा आहे. लहानपणचं स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण होणं ही प्रत्येकासाठी खास गोष्ट असते, आणि सईच्या या आठवणीने तिच्या चाहत्यांच्या मनात अजून एक खास स्थान निर्माण केलं आहे.