‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
ये साइना है…
सायना नेहवाल या बॅडमिंटनपट्टूनं भारताचं नाव जगभरात केलं आहे. लहानवयापासून हातात रॅकेट घेतलेल्या सायनाचा सगळा प्रवास हा लक्षवेधक आहे. आता यशाच्या शिखरावर असणा-या सायनानं यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. सायनाचा हा सगळा प्रवास बघायचा असेल तर त्यासाठी 26 मार्चची वाट पहायला लागणार आहे. कारण साइना नावाचा चित्रपट 26 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे.
परिणिती चोप्रा (Parineeti Chopra) यामध्ये सायना नेहवालच्या भूमिकेत आहे. साइनाचा टिझर, पोस्टर प्रदर्शित झाल्यावर त्यावर काहींनी टीका केली होती. पण ही टीका साइनाचा ट्रेलर बघितल्यावर कुठल्याकुठे गुल झाली आहे. परिणितीचा परफेक्ट लूक आणि अमोल गुप्ते सारख्या मान्यवर दिग्दर्शकाचा मॅजिक टच या चित्रपटाला लाभला आहे. त्याचा अंदाजच साइनाचा ट्रेलर बघून आला.
सायनाच्या (Saina Nehwal) सगळ्या प्रवासात तिचे कोच असलेले पुलेला गोपीचंद (Pullela Gopichand) यांची महत्त्वाची भूमिका आहे. साइना चित्रपटामध्ये गोपीचंद यांच्या भूमिकेत मानव कौल असणार आहेत. तर सायनाचे आईवडील म्हणून शुभ्रज्योती बराट आणि मेघना मलिक हे असणार आहेत. सुरुवातीला या चित्रपटासाठी श्रद्धा कपूरला घेण्यात आलं होतं. स्पोर्टबेस चित्रपट असल्यामुळे त्याचा वर्कआऊटही मह्त्त्वाचा होता. श्रद्धानं त्यासाठी आवश्यक सराव सुरु केला.
पण नंतर तिच्या बिझी शेड्यूलमुळे या वर्कआऊटला पुरेसा वेळ मिळत नव्हता. अखेर या चित्रपटातून तिला डच्चू देऊन परिणिती चोप्राला संधी देण्यात आली आहे. परिणितीनं या संधीचं सोन केल्याची झलक ट्रेलरमधून बघायला मिळाली. चूब्बीगर्ल म्हणून परिणितीची ओळख आहे. मात्र साइनासाठी तिनं खूप मेहनत घेतली. वजनही कमी केलं. या सर्वांचा परिणाम म्हणजे साइनामध्ये तिचा परफेक्ट लूक झाला आहे.
साइनाचा (Saina) पोस्टर रिलीज झाल्यावर सोशल मिडायावर त्यावर टिका करण्यात आली होती. राहुल नंदा यांनी केलेल्या या पोस्टरमध्ये सर्विस करतांनाचा सायनाचा हात वर दाखवला असून ती फूल उंच उडवते असं दाखवण्यात आलं आहे. काही ट्रोलर्सनी यावर सायना की सानिया असा प्रश्न विचारला होता. मात्र या सगळ्यांना दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं. त्यावर हा वाद शमला… पण महिला दिनाच्या दिवशी साइनाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर या टिकाकारांना खरं उत्तर मिळालं आहे, असं म्हणता येईल.
2020 मध्ये हा चित्रपट पडद्यावर येणार होता. मात्र कोरोनाचा फटका साइनालाही बसला. त्यामुळे आता 26 मार्च रोजी साइना पडद्यावर येणार आहे. ज्या मुली क्रीडा क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांनी नक्की पहावा असा हा चित्रपट आहे. कुठल्याही क्षेत्रात जिद्द, चिकाटी आणि मेहनत गरजेची असते. लहानपणापासून सायनानं घेतलेली मेहनत, तिच्या पालकांची भूमिका, कोचचे मार्गदर्शन या सर्वांवर चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. परिणितीनं या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत ट्रेलरमधून दिसतेय.
एकूण परिणितीसाठी 2021 हे वर्ष महत्त्वाचं ठरणार आहे. परिणितीचा नुकताच द गर्ल ऑन द ट्रेन हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. त्यातही परिणितीच्या अभिनयाचं कौतुक समिक्षकांनी केलं आहे. साइनाच्या आधी म्हणजेच 19 मार्च रोजी परिणितीचा संदिप और पिंकी फरार हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यशराज बॅनरच्या या चित्रपटात परिणिती आणि अर्जून कपूरची जोडी आहे. 2019 मध्ये अक्षय कुमारचा चित्रपट केसरीमध्ये परिणिती दिसली होती. त्यानंतर आता 2021 मध्ये ती पुन्हा पडद्यावर दिसत आहे.