Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Sikandar : ईद नाही तर ‘या’ दिवशी होणार सलमानचा ‘सिकंदर’ रिलीज!
हिंदी चित्रपटसृष्टीचा भाईजान सलमान खान (Salman Khan) दरवर्षी ईदनिमित्त नवा कोरा चित्रपट भेटीला आणत असतो. यापूर्वी त्याचे ‘वॉंटेंड’, ‘दबंग’, ‘एक था टायगर’ (Ek Tha Tiger) असे अनेक चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित झाले होते आणि त्याचा त्याला बॉक्स ऑफिसवर चांगलाच फायदा झाला होता. मात्र, आता ‘सिंकदर’ (Sikandar) चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल त्याने महत्वाचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी ईदच्या दिवशी रिलीज चित्रपट रिलीज करणारा सलमान यंदा मोठी रिस्क घेत थेट रविवारी चित्रपट रिजीज करणार आहे. (Bollywood upcoming movies)
रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि सलमान खान यांची प्रमुख भूमिका असणारा ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. सुरुवातीला सलमानचा चित्रपट २८ मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, आता रिलीज डेट बदलून चित्रपट ३० मार्च २०२५ रोजी भेटीला येणार आहे. सलमान खानने खास पोस्टर शेअर करून रिलीज डेटची माहिती दिली आहे. ३० मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण असून दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ मार्च २०२५ रोजी ईद आहे. (Salman Khan Movies)

दरम्यान, ‘सिकंदर’ (Sikandar) या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या बाबतीत सलमानने नेमका हा निर्णय का घेतला याचं अद्याप कारण अस्पष्ट जरी असलं तरी रविवारी चित्रपट प्रदर्शित करणं बॉक्स ऑफिसच्या दृष्टीकोनातून जरा रिस्क घेतल्यासारखं वाटत आहे. शिवाय दुसरीकडे विकी कौशलचा ‘छावा’ (Chhaava) चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतच आहे. त्यामुळे ‘सिकंदर’ ‘छावा’ला मागे टाकणार? की ‘छावा’ ‘सिकंदर’वर मात करणार हे येणारा काळच ठरवेल. (Vicky Kaushal)
‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटात सलमान खान सोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच सलमान आणि रश्मिकाची केमिस्ट्री पाहायला मिळणार असल्यामुळे चाहते विशेष उत्सुक आहेत. ए.आर.मुरुगदास दिग्दर्शित सिकंदर चित्रपटात सलमानसह काजल अग्रवाल, प्रतीक बब्बर आणि शर्मन जोशी झळकणार आहेत. सलमानच्या ‘सिकंदर’चे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले असून १८० कोटींचं बजेट असणारा हा चित्रपट ३० मार्च २०२५ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. (Entertainment news)
=========
हे देखील वाचा : जेव्हा ऋषी कपूरच्या सांगण्यावरून अमिताभला सिनेमातून काढून टाकले!
=========
यापूर्वी ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या चित्रपटाचं वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिस कलेक्शन (worldwide box office collection) जाणून घेऊयात. तर, २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या वॉंटेड चित्रपटाने ८३ कोटी, २०१० मध्ये आलेल्या दबंगने २१९ कोटी, २०११ मध्ये आलेल्या बॉडिगार्डने २३४ कोटी, २०१२ मधील एक था टायगरने ३०८ कोटी, २०१४ मधील किकने ३५१ कोटी, २०१५ मधील बजरंगी भाईजानने ६०४ कोटी, २०१६ मध्ये सुलतानने ५७७ कोटी, २०१७ मध्ये ट्यूबलाईटने २०७ कोटी, २०१८ मधील रेसने ३०५ कोटी, २०१९ मधील भारत ने ३०८ कोटी कमावले होते. (Box office collection)