Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

चक्क Salman Khan याला ऑफर केली होती ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका!
बॉलिवूडमधलं ऑल टाईम फेव्हरेट आणि गॉसिप कपल म्हणजे ऐश्वर्या राय आणि सलमान खान…. बरीच वर्ष त्यांच्या ब्रेकअपला उलटून गेली असली तरी आजही त्यांच्याबद्दलचे किस्से आवर्जून लोकं वाचतात किंवा ऐकतात.. असाच एक किस्सा निर्माते रजत जैन यांनी एका मुलाखतीत सांगितला असून यात त्यांनी चक्क एका चित्रपटात सलमान खानल ऐश्वर्याच्या भावाच्या भूमिकेसाठी विचारले होते असा खुलासा त्यांनी केला आहे…. नेमका काय आहे किस्सा जाणून घेऊयात… (Aishwerya Rai & Salman Khan)

तर, निर्माते रतन जैन यांनी नुकतीच टीव्ही ९ भारतवर्षला मुलाखत दिली. यात त्यांनी २००० मध्ये आलेल्या ‘जोश’ चित्रपटाच्या कास्टिंगबाबत खुलासा केला… ते म्हणाले की, “आम्ही ठरवलं होतं की चंद्रचूर सिंगने जी भूमिका साकारली आहे, ती भूमिका आमिर खान करेल आणि शाहरुख खान मॅक्स ही भूमिका साकारेल. पण, मन्सूर खान यांनी मला सांगितलं की आमिर खानला मॅक्स ही भूमिका साकारायची आहे. मी स्पष्ट नकार देत सांगितले की फक्त शाहरुखच ही भूमिका साकारेल, नाहीतर मी हा चित्रपट करणार नाही.” (Josh Movie)

पुढे ते एसं देखील म्हणाले की, “शाहरुख खान जी भूमिका साकारणार होता, तीच भूमिका आमिरला पाहिजे असं शाहरुखच्या कानावर गेलं होतं… त्यामुळे त्याने सर्वांनी एकत्र येऊन कथा वाचली पाहिजे असे सुचवलं. चित्रपटाची कथा वाचण्यास सुरुवात होण्याआधी मन्सुरने आमिरला मॅक्स ही भूमिका साकारायची आहे असे सांगितले. ते ऐकल्यानंतर शाहरुख खान उठला आणि त्याने सांगितले की मग मी हा चित्रपट करणार नाही आणि तो निघून गेला”. (Shah Rukh Khan & Aamir Khan)

रतन पुढे म्हणाले की, ‘जोश’ चित्रपटातून शाहरुख आणि आमिर खान दोघेही बाहेर पडल्यानंतर काही दिवस चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं… त्यानंतर सलमान खानला चित्रपटासाठी विचारण्यात आले, तर त्याने होकार दिला. म्हणजेच त्याने ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका साकारण्यास होकार दिला होता… पण त्याचवेळी त्याच्याकडे संजय लीला भन्साळींचा ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट ऑफर केला गेला आणि त्याने अर्थात त्या चित्रपटाला होकार दिला… त्यानंतर पुन्हा एकदा मी पुन्हा शाहरुखला चित्रपटाबद्दल विचारले. त्याने थोडा विचार केला आणि अखेर या चित्रपटाला होकार दिला. (Entertainment Gossips)
================================
हे देखील वाचा : एका गैरसमजामुळे भांडण; Shah Rukh Khan आणि Sunny Deol मध्ये ३० वर्ष होता अबोला!
================================
दरम्यान, जोश चित्रपटात ऐश्वर्या फिक्स होती… ‘जोश’ चित्रपटात भावंडांची भूमिका साकारल्यानंतर शाहरुख आणि ऐश्वर्याने ‘मोहब्बतें’ चित्रपटात प्रियकर व प्रेमिकाची भूमिका साकारली होती…. तर, ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटात ऐश्वर्या व सलमान यांनी स्क्रीन शेअर केली होती… सध्या सलमान आणि शाहरुखच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ‘किंग’ चित्रपटात शाहरुख आणि बॅटल ऑफ गलवान चित्रपटात सलमान खान दिसणार आहे… दोघेही ‘पठाण वर्सेस टायगर’मध्ये झळकणार होते पण सध्या तो प्रोजेक्ट थांबला आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi