Indeevar : संगीतकार आनंदजी यांनी इंदीवर यांना सुचवले होते हुक

Salman khan : रिलीजपूर्वीच ‘सिकंदर’ची डॉलरमध्ये कमाई सुरु!
सलमान खान (Salman Khan) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या बहुप्रतिक्षित ‘सिकंदर’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्याने लोकांना वेड लावलं असून आता चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता अधिक लागली आहे. सलमानने यंदा शुक्रवार किंवा ईदच्या दिवशी चित्रपट रिलीज करण्याचा स्वत:चाच ट्रेण्ड मोडून चक्क रविवारी चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे त्याच्या या रिस्कचं प्रेक्षक स्वागत करत असून रिलीजपूर्वीच चित्रपटाने डॉलर्समध्ये कमाई सुरु केली आहे.
सलमान खानच्या (Salman Khan) ‘सिकंदर’ चित्रपटाचं अॅडवान्स बुकींग सुरु झालं असून प्रेक्षक तुफान प्रतिसाद देताना दिसत आहेच. चित्रपट रिलीज होण्यास काही दिवस बाकी असतानाच, निर्मात्यांनी अमेरिकेत अॅडव्हान्स बुकिंग सुरू केलं असून ‘सिकंदर’ने देशभरातील सुमारे ५०६ शोमधून अंदाजे १६,०४७ डॉलर्सची कमाई केल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, सलमानने रिलीज डेट बदलण्याचा जरी विचार केला असला तरी त्याचा सामना काही मोठ्या चित्रपटांशी होणार आहे. ६ आठवड्यांपासून थिएटर गाजवणारा ‘छावा’ (Chhaava) आधीच रेकॉर्ड मोडत आहे. त्यातचं ईदच्या आठवड्यात ‘रॉबिनहूड’ आणि ‘वीरा धीरा सूरन’ हे चित्रपटही प्रदर्शित होणार असल्यामुळे सिकंदरला टफ फाईट द्यावी लागेल असं दिसतंय. (Upcoming films of Bollywood)
==================
हे देखील वाचा: Salman Khan : ‘सनम तेरी कसम’मध्ये दिसला असता सलमान खान?
==================
ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित, सिकंदरमध्ये प्रेक्षकांना तुफान अॅक्शन सीक्वेन्स पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, २०१४ च्या ब्लॉकबस्टर ‘किक’ (Kick) नंतर सलमान आणि नाडियाडवाला सिकंदरच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आहेत. त्यामुळे प्रेक्षक आतुरतेने सिकंदर चित्रपटाची वाट पाहत आहेत. (Salman Khan movies)