Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेने सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून

Samantha Ruth Prabhu- Raj Nidimoru यांचं ‘भूत शुद्धी विवाह’ पद्धतीने लग्न; काय असते ही परंपरा?
सोशल मिडिया उघडलं की लोकांच्या लग्नाचे-Engagementsचेच फोटो-व्हिडिओ आपल्याला दिसतात.. अशातच लग्नसराई आहे म्हटल्यावर बऱ्याच सेलिब्रिटींनीही नंबर लावलाय… बऱ्याच महिन्यांपासून ज्या कपलच्या रिलेशनबद्दल डाऊट होता त्या समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि राज निदिमोरु (Raj Nidimoru) यांनी १ डिसेंबर २०२५ला लग्न केलं… त्यांचं लग्न साध्या सुध्या पद्धतीने नाही तर ‘भूत शुद्धी विवाह’ या परंपरेनुसार झालंय… आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकी ही परंपरा काय आहे? चला तर मग समंथा आणि राजचं लग्न झालेला भूत शुद्धी विवाह सोहळा काय आहे जाणून घेऊयात… (Samantha-Raj Marriage)
तर, भूत शुद्धी विवाह ही एक प्राचीन योगिक लग्नाची विधी आहे.. यात विधीत नवरा-नवरी लग्नाच्या पवित्र बंधनात एकरुप होण्याआधी ५ घटकांची शुद्धी केली जाते.. म्हणजे कोणते? तर पृथ्वी, पाणी, अग्नी, वायु आणि आकाश यांची शुद्धी केली जाते… आणि या भूत शुद्धी विवाहामध्ये लिंग भैरवी साक्षीदार असते… या ५ घटकांच्या शु्द्धीने जोडप्यांमध्ये फक्त विचार आणि भावनाच नाही तर एनर्जीचं आदानप्रदान होत दोघे घट्ट बंधनात एकमेकांशी बांधले जातात… शिवाय, ५ घटकांच्या शुद्धीमुळे नात्याला अधिक शुद्ध आणि मजबूत बनवते.. वैवाहिक प्रवासात आनंद, शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक संतुलन मिळावं यासाठीही हा भूत शुद्धी विवाह केला जातो… विशेष म्हणजे हा विवाह काही निवडक ठिकाणीच केला जातो.. आणि त्यापैकीच एक ठिकाण जिथे समंथाने लग्न केलं ते म्हणजे कोईम्बतुरच्या ईशा योग केंद्रात… (Tollywood)

मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे या लग्नाची साक्षीदार लिंग भैरवी असते.. तर हे रुप ईश्वरी स्त्रीत्वाचं उग्र आणि करुणामय रुप आहे… आणि सद्गगुरुंनी ईशा योगा केंद्रात या देवीची प्राण प्रतिष्ठाद्वारे स्थापना केली होती… यापासून मिळणारी ऊर्जा जीवन समृद्ध करण्यासाठी आणि जन्मपासून मृत्यूपर्यंत प्रत्येक टप्प्यावर शरीर, मन आणि ऊर्जा यांचा balance करण्यासाठी उपयोगी ठरते… (Samantha Ruth Prabhu Second Marriage)
================================
================================
समंथाने नागा चैतन्यासोबतच्या (Naga Chaitanya) घटस्फोटानंतर ४ वर्षांनी दुसरं लग्न केलंय… आणि भूत शुद्धी या विवाहाच्या अनोख्या परंपरेसोबतच सध्या ट्रेण्ड मध्ये असणारं intimate wedding ही तिने केलंय… ‘द फॅमेली मॅन’च्या (The Family Man) दिग्दर्शकासोबत तिने केलेलं लग्न खरं तर काही जणांच्या भूवय्या उंचावणारं होतंच.. पण तिने आपली पर्सनल लाईव्ह प्रायवेट ठेवत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का नक्कीच दिलाय… (Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi