
सामंथाची 30 किलोची साडी आणि कोटींचे दागिने….
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सामंथा प्रभू (Samantha) आता शाकुंतलम (Shakuntalam) या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर येत आहे. 17 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणा-या या चित्रपटाची सामंथाच्या चाहत्यांना प्रतीक्षा आहे. त्यातच आता शाकुंतलमचा (Shakuntalam) फोटो सामंथानं शेअर केला आहे. सफेद साडी नेसलेली सामंथा (Samantha) अप्रतिम सुंदर दिसत आहे. ही साडी प्रसिद्ध डिझायनर निता लुल्ला यांनी डिझाईन केली आहे.
शाकुंतलममध्ये (Shakuntalam) सामंथानं 30 किलो वजनाची साडी परिधान केली असून तिचे दागिनेही खास बनवण्यात आले आहेत. या दागिन्यांची किंमतीही काही कोटींच्या घरात आहे. सामंथानंही (Samantha) या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटाचे शुटींग सुरु झाल्यावर तिची तब्बेत बिघडली होती. पण त्यानंतर सामंथानं कठिण वर्कआऊटकडे लक्ष दिले. शाकुंतलमसाठी (Shakuntalam) सामंथानं (Samantha)काही किलो जन घटवलं आहे. त्यात तिच्यासोबत या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जूनच्या लहानग्या लेकीनंही अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सामंथानं या छोटीचंही भरभरून कौतुक केल्याची पोस्ट शेअर केली आहे. शाकुंतलम या थ्रीडी चित्रपटाकडून सामंथाच्या अनेक अपेक्षा आहेत. आता तिचा या चित्रपटातील लूक सामंथानं शेअर केल्यावर त्याला लाखो लाईक मिळाले आहेत, त्यावरुन शाकुंतलम बॉक्स ऑफीसवर यशाचे नवे रेकॉर्ड करेल असा अंदाज व्यक्त होत आहे.

अभिनेत्री सामंथा (Samantha) हिने तिच्या आगामी शाकुंतलम चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. या चित्रात, सामंथा फुलांनी सजलेल्या पांढर्या शुभ्र पोशाखात दिसत आहे. या चित्रपटातील सामंथाचे पोशाख नीता लुल्ला या प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनरने डिझाइन केले आहेत. कवी कालिदास यांच्या नाटकावर आधारित असलेल्या या चित्रपटातील सामंथाची वेशभुषा चर्चेत आहे. कवी कालिदासाच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम’ या नाटकावर आधारित या चित्रपटात सामंथानं 3 कोटींचे दागिने आणि सुमारे 30 किलो वजनाची साडी परिधान केल्याचे वृत्त आहे. राजा दुष्यंत आणि शकुंतला यांची प्रेमकथा असलेल्या या चित्रपटात सामंथाच्या (Samantha) साड्या आणि त्यावरचे दागिने यासाठी खास डिझाईन तयार करण्यात आले आहेत. कालिदासांच्या अभिज्ञान शाकुंतलम या जगप्रसिद्ध नाटकावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरस्कार विजेते दिग्दर्शक गुणशेखर यांनी केले आहे. हा चित्रपट थ्रीडीमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामुळेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब झाल्याचे सांगण्यात येते. हा चित्रपट आधी 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु चित्रपटाच्या 3D रूपांतरणास उशीर झाल्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.
स्वतः सामंथा (Samantha) या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. या चित्रपटाबाबत बोलतांना तिनं सांगितले आहे की, माझ्या पूर्वीच्या कामापेक्षा पूर्णपणे वेगळे असलेले चित्रपट निवडणे मला नेहमीच आवडते. शाकुंतलम (Shakuntalam) हा तसाच वेगळा चित्रपट आहे. मला नेहमीच पौराणिक कथा, पीरियड ड्रामा आणि या प्रिन्सेस वर्ल्डचे वेड आहे. शाकुंतलममधील माझी स्वप्नातील भूमिका मला खूप आवडली. काही प्रसंग शूट केल्यावर बघितल्यावर ही मी स्वतः आहे का? हा प्रश्नच पडल्याचे सामंथानं सांगितलं. या चित्रपटाच्या सेटवरही बराच खर्च करण्यात आला आहे. ही सर्व परीकथा असून चित्रपट पडद्यावर बघण्याची उत्सुकता असल्याचे सामंथानं (Samantha) सांगितलं. याशिवाय अभिनेता अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू अर्हा देखील शाकुंतलममधून (Shakuntalam) मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. तिच्याबाबत बोलतांना सामंथा (Samantha) उत्साहीत झाली होती. अल्लू अर्हाचा जन्म रॉकस्टार होण्यासाठी झाला असल्याचे ती सांगते. सेटवर 200-300 लोक असूनही ती छोटी ज्या आत्मविश्वासानं वावरत होती त्याला तोड नाही, असेही सामंथानं (Samantha) सांगितले आहे.
======
हे देखील वाचा : दसरा आणि करुंगापायमची प्रतीक्षा…
======
या चित्रपटात शाकुंतलाच्या (Shakuntalam) मुख्य भूमिकेत सामंथा (Samantha) आणि पुरू घराण्याचा राजा दुष्यंताच्या भूमिकेत देव मोहन यांच्यासह मोहन बाबू, जिशू सेनगुप्ता, मधु, गौतमी, आदिती बालनणि अनन्या नागल्ला यांच्याही भूमिका आहेत. गुणशेखर यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये या चित्रपटाची घोषणा केली. हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये शाकुंतलमचे चित्रिकरण करण्यात आले.
या चित्रपटात भरतच्या भूमिकेसाठी अभिनेता अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू अर्हा हिची निवड करण्यात आली आहे. हा अल्लू अर्जूनच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का ठरणार आहे. शाकुंतलम (Shakuntalam) चित्रपटामधील व्हिज्युअल आणि ग्राफिक्सचीही खूप चर्चा आहे. यासाठी कॅनडा, हाँगकाँग आणि चीनमधील व्हीएफएक्स तंत्रज्ञांनानी काम केले आहे. एकूण 17 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या शाकुंतलम या थ्रीडी चित्रपटाची सामंथाच्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे.