Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajkumar Rao : ‘भूल चूक माफ’ चित्रपटाने दमदार ओपनिंग केली

Chinmay Mandlekar : मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत मनोज बाजपेयी साकारणार नवी भूमिका!

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

दसरा आणि करुंगापायमची प्रतीक्षा…

 दसरा आणि करुंगापायमची प्रतीक्षा…
कलाकृती विशेष

दसरा आणि करुंगापायमची प्रतीक्षा…

by सई बने 01/02/2023

सुपरस्टार नानीचा बहुप्रतिक्षित चित्रपट दसरा आणि काजल अग्रवालचा करुंगापायम या चित्रपटांचे ट्रेलर (Movie Trailer) प्रदर्शित झाले आहेत.  नानी आणि काजल यांच्या या चित्रपटांच्या ट्रेलरच्या माध्यमातून या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. एकीकडे दसरामध्ये नानीचा लूक हा अल्लू अर्जूनच्या पुष्पासारखा झाला आहे.  तर दुसरीकडे काजल अग्रवालच्या करुंगापायमचा ट्रेलरही प्रेक्षकांना भावलाय.  करुंगापायम चित्रपटात काजलची अनेक रुपे बघता येणार आहेत. दसरा चित्रपटाच्या टीझरमधील नानीचा दमदार अवतार आणि अभिनय पाहून 30 मार्च रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट यंदाचा ब्लॉकबस्टर चित्रपट असेल याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

दाक्षिणात्य सुपरस्टार नानीचा दसरा चित्रपट अल्लू अर्जूनच्या पुष्पासोबत टक्कर देणार आहे.  दसराचा टीझर पाहिल्यावर अनेकांना ब्लॉकबास्टर असेच दसराचे वर्णन केले आहे. आता 30 मार्चला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची प्रतीक्षा आहे.  दाक्षिणात्य सुपरस्टार नानीचा बहुप्रतिक्षित चित्रपट दसराचा ट्रेलर (Movie Trailer) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा एका लहानशा खेड्यातील मुलाभोवती फिरते. हा मुलगा आपल्या लोकांसाठी लढतो. हा ट्रेलर (Movie Trailer) पाहिल्यानंतर अल्लू अर्जुनच्या पुष्पा या सुपरहिट चित्रपटाची आठवण होते. मात्र, दसराची कथा सुकुमारच्या चित्रपटापेक्षा खूपच वेगळी आहे.

कोळशाच्या ढिगाऱ्यांनी वेढलेल्या वीरलापल्ली या छोट्याशा गावाच्या परिचयाने ट्रेलरची सुरुवात होते. ट्रेलरच्या शेवटी नानीचा दमदार संवादही ऐकायला मिळतो. हा ट्रेलर रिलीज (Movie Trailer) झाल्यानंतर नानीच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांचाही वर्षाव सुरू झाला आहे. याशिवाय बहुतेक युजर्स या चित्रपटाला सुपरहिट म्हणत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीकांत ओडेला यांनी केले आहे. या चित्रपटात नानी व्यतिरिक्त कीर्ती सुरेश आणि संतोष नारायणन देखील दिसणार आहेत.  नानीच्या दस-याचा टीझर बघून ‘आरआरआर’चे दिग्दर्शक राजामौलीही दसरा या चित्रपटाचे कौतुक करीत आहेत. दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दसराचा हा ट्रेलर (Movie Trailer) शेअर केला आहे. यासोबतच दिग्दर्शकालाही नानीची खात्री पटली आहे. राजामौली यंना नानीचा मेकओव्हरही खूप आवडला आहे. त्यांनी नानीला या मेकओव्हर बद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.  शिवाय  नवोदित दिग्दर्शकाचे असे काम पाहून खूप छान वाटले अशी पावतीही सोबत दिली आहे.  

=======

हे देखील वाचा : जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी …

=======

दसराचे दिग्दर्शन श्रीकांत ओडेला यांनी केले असून ते या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत. या चित्रपटात साई कुमार, समथिरकणी, दीक्षित शेट्टी, संतोष नारायणन आणि जरीना वहाब हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘दसरा’च्या ट्रेलर मुळे ‘पुष्पा’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. तसेच पुष्पाचा पुढचा भाग कधी येणार याचीही चर्चा सुरु झाली आहे.  हा चित्रपट 30 मार्चला प्रदर्शित होत आहे.

दुसरीकडे काजल अग्रवालच्या ‘करुंगापायम’ चित्रपटाचा ट्रेलर (Movie Trailer) रिलीज झाला आहे. हा चित्रपट एक हॉरर चित्रपट असून या याच्याही ट्रेलरची चर्चा आहे. अभिनेता विजय सेतुपतीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून हा ट्रेलर रिलीज केला असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘करुंगापियम’ या चित्रपटात काजल अग्रवाल व्यतिरिक्त इतर 4 अभिनेत्री आहेत.  रेजिना कॅसांड्रा, रायजा विल्सन आणि जननी याही मुख्य भूमिकेत आहेत. पाच वेगवेगळ्या व्यक्ती एकमेकांना भेटल्यावर त्यांचे आयुष्य कसे बदलते आणि मग त्यांना कसे एकमेकांना सांभाळावे लागते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य म्हणजे, इराणची अभिनेत्री नोइरिका सुद्धा या चित्रपटातील पाचवी नायिका आहे. या चित्रपटात कलाईरासन, योगी बाबू, करुणाकरन, जॉन विजय, शा रा आणि लोलू सभा मनोहर यांच्याही भूमिका आहेत. चेन्नई, उदुमलाईपेट्टाई आणि पोल्लाची येथे या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.काजलचा हा चित्रपट आता मोठ्या पडद्यावर केव्हा येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.  

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Dussehra Entertainment Hollywood Movies Karungapayam movie trailer
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.