Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sanam Teri Kasam सिनेमातील एका गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!

 Sanam Teri Kasam सिनेमातील एका गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!
बात पुरानी बडी सुहानी

Sanam Teri Kasam सिनेमातील एका गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!

by धनंजय कुलकर्णी 21/01/2026

संगीतकार आर डी बर्मन इतका टॅलेंटेड संगीतकार होता की तो कोणत्या गोष्टीचा आपल्या मेजर साठी उपयोग करून घेईल हे सांगता येत नसायचे. गुलजार यांनी ‘इजाजत’ (१९८७ ) या चित्रपटातील ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है..’ हे गाणं जेव्हा आर डी यांच्याकडे संगीताला दिलं तेव्हा आरडी म्हणाले होते,” उद्या तू मला टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन आणून देशील आणि याला चाल लावून संगीत दे असं म्हणशील!!”  पण दुसऱ्या क्षणाला त्यांनी  या गाण्याल्या संगीत देण्याचा विचार सुरू केला आणि एक सुंदर गाणं तयार झालं.  

असे प्रकार अनेकदा झाले होते. त्यातील हा एक दिलचस्प किस्सा. १९८० साली अमेरिकेत ‘झेनाडू’ नावाचा एक म्युझिकल हिट सिनेमा आला होता. याच वर्षी पाकिस्तानचे लष्करशहा झिया उल हक यांचा भारत दौरा होता आणि याच वर्षी आर डी बर्मन बरखा रॉय यांच्या एका चित्रपटाला संगीत देत होते. आता तुम्ही म्हणाल या तीन विभिन्न गोष्टींचा परस्परांशी काय संबंध आहे?  पण या तीन गोष्टींमुळे एका बेहतरीन गाण्याची निर्मिती झाली होती.  १९८० साली बरखा रॉय यांनी आपली बहीण रिना रॉय याच्यासाठी एका चित्रपटाची निर्मिती सुरू केली होती. चित्रपटाचे नाव तो ‘सनम तेरी कसम’.  

कमल हसन आणि रीना रॉय यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या.  या चित्रपटाची गाणी गुलशन बावरा यांनी लिहिली होती.  या गाण्याच्या सीटींग साठी बरखा रॉय यांनी एक स्पेसिफिक डेट ठरवली होती आणि त्या दिवशी आपण गाणं फायनल करू असं म्हणाले होते. गुलशन बावरा जिथे राहायचे यांच्या खिडकीतून आर डी बर्मन यांचे घर दिसत असायचे,  गाण्याची सीटिंग च्या आदल्या रात्री गुलशन बावराने आपल्या खिडकीतून पाहिले तर आर डी बर्मन यांच्या बेडरूमचे लाईट चालू होते.  रात्री उशिरापर्यंत लाईट चालू होते.  गुलशन बावरायला कळेना आर डी बर्मन नेमकं कशावर काम करत आहेत .  

दुसऱ्या दिवशी जेव्हा गुलशन बावरा आर डी बर्मन यांच्याकडे गेले तेव्हा आरडी डाराडूर  झोपलेले होते गुलशन ने त्यांना उठवले आणि विचारले ,” अरे यार , मी बघितले काल रात्रभर तू जागा होतास?  आज आपल्या गाण्याची मीटिंग  आहे बरखा राय  कुठल्याही क्षणी येथे येतील आणि अजून आपलं काहीच तयार नाही!”  त्यावर आर डी बर्मन म्हणाले,” अरे गुल्लू , रात्री मी झेनाडू नावाचा एक सिनेमा पाहत होतो. अतिशय फंटास्टिक म्युझिकल सिनेमा आहे तू पण नक्की पहा.” गुलशन बावरा  म्हणाला,” ते ठीक आहे.  पण आपल्या गाण्याचे काय?” आर डी बर्मन यांच्या डोक्यात काल चा ‘झेनाडू’ सिनेमा आणि त्याची गाणीच गुणगुणत होती.  

================================

हे देखील वाचा : ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित Amitabh-Jaya Bachchan यांचा हा सिनेमा अर्धवट का राहिला?

=================================

या सिनेमाचे एक टायटल सॉंग होतं झेनाडू sssss ‘ त्याची ट्यून आर डी बर्मन यांना खूप आवडली होती. ते सारखे झेनाडू sssss  झेनाडू sssss असं म्हणत होते.  तोच त्यांच्या घरातील वर्तमान पत्र त्यांना दिसलं त्यात हेडिंग होती “झिया इस नोट कमिंग’.  आर डी बर्मन च्या डोक्यात झेनाडू च्या गाण्याची ट्यून होतीच लगेच त्याने त्याला जोडून झिया शब्द घेतला झेनाडू “झिया  या कॉम्बिनेशन मधून ट्यून  तयार झाली आणि त्यावर गुलशन बावराने लगेच शब्द लिहिले ‘जाने जां ओ मेरी जाने जां मिलेगे दो  दिवाने बने गे फिर अफसाने करेगा अपनी चर्चा ये जहां धिन तीनक धिन निशा..’  इथे फक्त गुलशन बावराने झिया  शब्दाच्या जागी निशा हा शब्द टाकला कारण सिनेमातील नायिकेचे नाव निशा होते .  यातून हे वंडरफुल गाणं तयार झालं! आर डी बर्मन हा खरोखर अफलातून संगीतकार होता आपल्या म्युझिक साठी तो कोणत्या गोष्टीचा कधी उपयोग करून घेईल हे कोणालाही कळायचं नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून देखील त्याला म्युझिक सापडत असेल.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Entertainment kamal hasan rina roy sanam teri kasam
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.