‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Saurabh Gokhale : “डीजेपुढे पारंपारिक वादनाला झुकावं लागलं”
गणरायाची अकरा दिवस भक्ती भावाने सेवा केल्यानंतर अखेर बाप्पाला निरोप त्याच्या भक्तांनी दिला… संपूर्ण देशभरात गेले १० दिवस जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं… लाडक्या बाप्पाला कुठे पारंपारिक ढोल-ताशाच्या साथीने, कुठे आरती गात तर कुठे डीजे लावून त्या गाण्यांवर थिरकत निरोप दिला गेला.. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये ढोल-ताशांच्या गाजरात आणि डीजे लावून बाप्पाचं विसर्जन केलं गेलं.. पण या सगळ्या जल्लोषात डीजेबद्दलचा वाईट अनुभव अभिनेता सौरभ गोखलेनं शेअर केला आहे. (Ganeshotsav 2025)

सौरभ गोखले हा अभिनयासोबतच वादनही करतो.. पुण्यात कलावंत ढोल-ताशा पथकाचा तो सचिव आणि सदस्य आहे… अशातच ६ सप्टेंबरला अनंत चर्तुथीच्या दिवशी पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा वाईट अनुभव शेअर केला आहे.. सौरभने शेअर केलल्या व्हिडिओमध्ये मिरवणुकीचा अनुभव सांगताना सौरभ म्हणाला की, “गणेश विसर्जनाच्या दिवशी आम्हाला एक अत्यंत वाईट अनुभव आला. मी कलावंत पथकाचा एक सदस्य आहे. आम्ही आज मार्केट यार्ड गणेश मंडळाबरोबर वादन करणार होतो. संध्याकाळी सहा वाजताची आमची मिरवणूक होती. आम्ही बातम्यांमधून चांगली गोष्ट ऐकत होतो, ती म्हणजे लक्ष्मी रोडची मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चालली आहे. विसर्जन अत्यंत वेळेत होत आहेत. पण आम्हाला याउलट अनुभव आला”. (Marathi Entertainment News)

पुढे तो म्हणाला की, “आमची सहाची मिरवणूक होती आणि वादनासाठी आम्ही तयारही होतो. मात्र, टिळक रोडला चाललेला डीजेचा धुमाकूळ आणि न सरकणारी मिरवणूक, याच्यापुढे सगळी मंडळं हतबल झाली होती. मार्केट यार्ड मंडळदेखील अत्यंत हतबल झालं होतं. त्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले. आम्हीही खूप वेळ वाट पाहिली. अखेरीस डीजेपुढे मंडळाला झुकावं लागलं. शिवाय आम्हालाही वादन न करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्या कर्णकर्कश्य आवाजात रममाण झालेले लोक पाहून आम्ही वादन न करण्याचा निर्णय घेतला. कारण ते बघून असं वाटलं, इथे येणाऱ्या लोकांना पारंपरिक वाद्यांबद्दल फारसं प्रेम नाही. पण धुमाकुळ घालण्यात अधिक रस आहे. त्यामुळे आलेली गर्दी आणि, चाललेले नृत्य, तिथे वाजणारं संगीत ऐकून मनस्ताप झाला”… असं सौरभ मनस्ताप व्यक्त करत म्हणाला.
====================================
हे देखील वाचा : Abhishek Bachchan : ह्रतिक रोशनमुळे आदित्य चोप्राशी ‘धुम २’ वेळी का भांडलेला अभिषेक?
====================================
पुढे सौरभ म्हणाला की, “हे सगळं लोकांसमोर यावं म्हणून हा व्हिडीओ करत आहे. बाकी काही नाही. त्यामुळे आम्ही आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांनी एक गजर केला. कारण ध्वज असाच उतरवायचो नसतो. ध्वजवंदन करत आम्ही या वादनाला पूर्णविराम दिला. याचा विचार करणं गरजेचं आहे. डीजेच्या धुमाकुळाला ब्रेक लागणं गरजेचं आहे. मला वाटतं आताही वेळ गेलेली नाही. सर्वांनी विचार करा. आपण सगळेच पारंपरिक वाद्यांकडे वळूया. नाही तर काही वर्षांनी, वर्षांनीसुद्धा नव्हे, तर काही दिवसांनी परिस्थिती आणखी घातक होणार आहे आणि याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागणार आहे. विचार करा”… आता यावर पुण्यातील इतर गणेशोत्सव मंडळांकडून काही उत्तर येणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे…(Ganpati viserjan in pune 2025)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi