Kiran Mane किरण मानेंची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिनी खास पोस्ट
sequel movie : २०२५ : मराठी, हिंदीत सिक्वेल फार
पहिल्या चित्रपटाचा पुढचा भाग ही मुळात विदेशी कल्पना. एन्टर द ड्रॅगनचा रिटर्न ऑफ ड्रॅगन वगैरे अनेक चित्रपट. काहींची तर ‘चित्रपट मालिका‘.आपल्याकडे ती सर्वप्रथम दिसली अशोक त्यागी दिग्दर्शित ‘रिटर्न ऑफ ज्वेल थीफ‘ (१९९६) या चित्रपटात. तीन चार दशकांपूर्वी ‘नवीन चित्रपटाचा शानदार मुहूर्त’ हा एक रुजलेला फंडा. आपली चित्रपटसृष्टी लहान मोठ्या सेलिब्रेशनमध्ये मनसोक्त रस घेणारी. मी मिडियात आल्यावर असे अनेक कलरफुल फिल्मी मुहूर्त अनुभवले. अनेक चित्रपटांची मुहूर्ताची आमंत्रणेही भारी असत. मोठ्ठे आमंत्रण ही तर खासियत. (sequel movie)
अशातच एके दिवशी हाती आमंत्रण आले, अंधेरीतील आंबोली येथील फिल्मालय स्टुडिओत return of jewel thief चित्रपटाचा मुहूर्त. चित्रपटात अशोक कुमार, देव आनंद (ही नावे वाचताना विजय आनंद दिग्दर्शित ‘ज्वेल थीफ’ डोळ्यासमोर आला नसता तर नवलच), धर्मेंद्र, जॅकी श्राॅफ, शिल्पा शिरोडकर, सदाशिव अमरापूरकर, मधु, प्रेम चोप्रा. या चित्रपटाची पटकथा संजय निरुपम यांची (त्यानी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीची ही गोष्ट). मुहूर्तासाठीचा सेट अतिशय भपकेबाज हे अपेक्षित होतेच. तो पाहत असतानाच दोन बातम्या समजल्या. एक म्हणजे, हा चित्रपट ज्वेल थीफचा पुढचा भाग म्हणून निर्माण होत आहे आणि नेमके हेच न आवडल्याने विजय आनंदने या चित्रपटाच्या मुहूर्ताचा क्लॅप देण्यास नकार दिला आणि त्याची अनुपस्थिती हीच एक बातमी झाली. (Bollywood masala)
रिटर्न ऑफ ज्वेल थीफसाठी फिल्मालय स्टुडिओत अनेक दिवसांसाठी भला मोठा सेट लागला असता. एकदा शिल्पा शिरोडकर तर एकदा सदाशिव अमरापूरकरच्या मुलाखतीसाठी असे माझे दोनदा जाणे झाले. विशेष उल्लेखनीय गोष्ट, या सिक्वेलला बर्यापैकी व्यावसायिक यश प्राप्त झाले. अर्थात मूळ ज्वेल थीफच्या दर्जाची शक्यता आणि अपेक्षा अजिबात नव्हती.
या दशकात सिक्वेल चित्रपट (sequel movie) संस्कृती फारच रुजली. ती जणू फ्रेन्चाईजी झाली. चित्रपटाच्या जगात यश हेच यशाचे चलनी नाणे असल्याने असे झाले यात आश्चर्य ते काय? सिंघम अगेन फसला म्हणून सिक्वेल निर्माण होणे थांबणार नाही.
२०२५ मध्ये अनेक सिक्वेल चित्रपट (sequel movie) पडद्यावर येणार आहेत. काही नावे तर बघा, Sukumar दिग्दर्शित pushpa 3 (अर्थात अल्लू अर्जुन) याचे बजेट किती असेल असा प्रश्नच नको. तेलगू चित्रपटही अशी उत्तुंग झेप घेतोय हेच कौतुकाचे. तो हिंदीसह दक्षिणेकडील अन्य प्रादेशिक भाषेत डब होऊन जगभरातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचेल. व्यावसायिक दृष्टिकोन असाच व्यापक हवा. गंमत म्हणजे पहिला पुष्पा जास्त मनोरंजन होता असे म्हणेपर्यंत दुसरा पुष्पा जास्तच जोरात चालला. चित्रपटाच्या यशाचे अस्तित्व जाणवणे, कायम राहणे काय असते यासाठी पुष्पा २ उत्तम माॅडेल.
=============
हे देखील वाचा : Yearend movies : यामुळे वर्षअखेरीस चित्रपट केले जातात प्रदर्शित !
=============
नवीन वर्षातील काही सिक्वेल असे,
अहमद खान दिग्दर्शित Welcome to the Jungle (संजय दत्त, अनिल कपूर, सुनील शेट्टी, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पट्टानी, श्रेयस तळपदे), तरुण मनसुखानी दिग्दर्शित हाऊसफुल्ल-५ (Sanjay Dutt, नाना पाटेकर, Tiger Shroff, अभिषेक बच्चन, चंकी पांडे, जॅकलीन फर्नांडिस, Fardeen Khan, चित्रांगदा सिंग), सोनम बजवा दिग्दर्शित ‘बागी ४‘ ( संजय दत्त, टायगर श्राॅफ, सोनम बजवा), विजयकुमार अरोरा दिग्दर्शित ‘सन ऑफ सरदार २‘ ( Ajay Devgn, मृणाल ठाकूर) वगैरे वगैरे अनेक सिक्वेल (sequel movie) नवीन वर्षात आपल्या समोर येतील. (Entertainment mix masala)
हिंदी चित्रपटाच्या यशाची टक्केवारी घसरली, साऊथच्या बिग बजेट धमाकेदार मसालेदार चित्रपटांचे आक्रमण वाढलयं अशी कितीही ओरड झाली तरी हिंदी चित्रपट निर्मितीत कमालीचे सातत्य आहे. अनेक कलाकार आपल्या मोठ्या स्टाफसह सेटवर तर झालेच पण आऊटडोअर्सला येतात म्हणून निर्मिती खर्चात अवाजवी वाढ झाल्याची मध्यंतरी ओरड तर झाली. पुढे काय? असो. असे काही ना काही घडत बिघडत प्रत्येक क्षेत्र वाटचाल करीत असते आणि एखादा ॲनिमल (२०२३), पुष्पा २ (२०२४) खणखणीत सुपर हिट ठरताच अनेक प्रश्न बाजूला पडतात. यशाची हीच तर गंमत आहे. ते सगळीकडेच सकारात्मक वातावरण निर्माण करते. नवीन उर्जा निर्माण करते.
=============
हे देखील वाचा : Chandan Cinema : चंदन चित्रपटगृह पडद्याआड
=============
मराठीतही सिक्वेल संस्कृती रुजलीय. नवीन वर्षात त्याचा प्रत्यय येणार आहेच.
Sanjay Jadhav दिग्दर्शित “ये रे ये रे पैसा ३” या चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची आहे, संवाद लेखन अरविंद जगताप यांचे आहे. या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, Umesh Kamat, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले, Vanita Kharat, जयवंत वाडकर अशी स्टार कास्ट आहे. अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे यांच्यासह सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू आणि संकेत पाठकही आहेत. संजय जाधव या चित्रपटाचे छायाचित्रण करणार आहेत. याशिवाय “दे धक्का ३” वगैरे सिक्वेल (sequel movie) नवीन वर्षात आपल्यासमोर येणार आहेत. रसिकांचे मनसोक्त मनमुराद मनोरंजन करणारे चित्रपट लोकप्रिय ठरतील हा तर दीर्घकालीन अलिखित नियमच आहे. प्रत्येक चित्रपट रसिकांच्या आवडीनुसार कमी जास्त यशस्वी ठरते. पूर्वप्रसिध्दी केवळ त्याची सपोर्ट सिस्टीम असते. (latest marathi movies)
चित्रपटाचा सिक्वेल (sequel movie) अर्थात पुढचा भाग हा ट्रेण्ड आता केवढा तरी रुजलाय. त्यात पटकथेची कन्टीन्यूटी असू देत, तर रंजकता येईल. चित्रपटाचे ब्रॅण्ड नेम तयार झालयं म्हणून दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा भाग असे होत राहिलेच तर हंसे होण्याचीच जास्त शक्यता. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीसमोर ओटीटीवर जगभरातील अनेक देशातील अनेक भाषांतील कन्टेन आहे, त्याच्या आवडीनिवडीवर फोकस ठेवल्यास उत्तम. आपण नवीन वर्षात अनेक विषयांवरचे चित्रपट नक्कीच पहायला मिळतील अशी अपेक्षा ठेवूयात आणि ती नेहमीच ठेवतो आणि कमी अधिक प्रमाणात पुरीदेखिल होते.