‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Chhaya Kadam : पहिला फिल्मफेअर पुरस्कार आणि शाहरुख खानने मिठी मारत केलेलं कौतुक…
आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटसृष्टीची शान वाढवणाऱ्या छाया कदम हिला नुकताच पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला… ७०व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात दिग्गजांच्या यादीत छाया कदम (Chhaya Kadam) हिचं नाव सर्वोत्कृष्ट सहायय्क अभिनेत्री या कॅटेगरीत तिला हा पुरस्कार किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडिज’ (Laapata Ladies) या चित्रपटासाठी देण्यात आला… विशेष म्हणजे हा पुरस्कार घेतल्यानंतर चक्क शाहरुख खान याने छायाला मिठी मारत तिचं कौतुक केलं… (Filmfare Awards 2025)

दरम्यान, छाया कदम हिने साकारलेल्या ‘मंजू माई’च्या भूमिकेला मिळालेल्या या मोठ्या सन्मानामुळे मराठी चित्रपटसृष्टीची मान अभिमानाने उंचावली आहे. पुरस्कार सोहळ्यात आपलं नावदाहिर होताच छाया कदमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारल्यानंतर छाया म्हणाली की, “प्रत्येकवेळी असं वाटायचं की आता मला पुरस्कार मिळेलच. सगळेजण कौतुक करायचे, पण पुरस्कार काही मिळत नव्हता. यावेळी विचार करून ठेवला होता, अवॉर्ड मिळो न मिळो… छान तयार होऊन आपण या सोहळ्याला जायचं. खूप आभार… किरण आय लव्ह यू…तू माझ्यावर इतका विश्वास ठेवलास. एका मराठी मुलीला तू युपीमधली मंजू माई बनवलंस…मला स्वत:ला खात्री नव्हती की, मी खरंच ही भूमिका करेन की नाही. पण, किरण तू नेहमी मला विश्वास दिलास. हा पुरस्कार त्या सगळ्यांसाठी आहे जे लोक इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षे काम करत आहेत आणि नेहमी विचार करतात…कधी होणार? कधी पुरस्कार मिळेल? मेरा टाइम कब आएगा? त्या सगळ्यांसाठी हा पुरस्कार आहे”. (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी ओळख असल्यासारखं वाटतंय”
================================
दरम्यान, छायाचे हे शब्द ऐकून स्टेजवर कार्यक्रम होस्ट करत असणारा शाहरुख खान छायाकडे आला आणि त्याने तिला मिठी मारली… तिच्या कामाचं कौतुक करत तो असं म्हणाला की, माझं तर कौतुक फार कुणी करत नाही पण पुरस्कार देतात.. त्याचा या वाक्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला… त्यानंतर शाहरुख खानने स्वत: छाया यांना मंचावरून खाली नेऊन सोडलं. (Shah rukh Khan News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi