Housefull 5 OTT: थिएटर्सनंतर आता ओटीटीवर झळकणार ‘हाउसफुल 5’; जाणून घ्या, कधी आणि कुठे

‘काटा रुते कुणाला…’ हे नाट्यगीत Shanta Shelke यांना कसे सुचले?
साठच्या दशकात संगीत नाटकांनी पुन्हा एकदा नाट्यरसिकांवर आपली जादू दाखवायला सुरूवात केली होती.आता या पालखीचे भोई नवे होते. कवयित्री शांता शेळके त्यापैकी एक. ’हे बंध रेशमाचे’ या नाटकातील एका गीताचा हा किस्सा. पं जितेंद्र अभिषेकी, रणजीत देसाई आणि शांता शेळके बसले होते.शांताबाईंना काही केल्या गाण्याकरीता समयोचित शब्द सुचत नव्हते.
या गीतातील अपेक्षित असलेलं अचूक मर्म समजावतांना, अभिषेकींबुवांनी एक शेर सुनावला.”आप गैरो कि बात करते हो,हमने तो अपने भी आजमाए है.लोग काटो कि बात करते है,हमने तो फुलो से जख्म खाए है.” शांताबाईंना लगेच हवे ते शब्द सुचले आणि नाट्य़गीत जन्माला आले “काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी मज फुल हि रुतावे हा दैव योग आहे” मराठी साहित्याच्या दरबारातील एक रसिकमान्य कवयित्री ! अशीच कथा त्यांच्या तोच चंद्रमा नभात या गीताची आहे.गीतकार, कथालेखिका, कादंबरीकार, अनुवादक, ललितलेखिका, बालवाङ्मयकार, समीक्षक, वृत्तपत्र सहसंपादिका अशा वेगवेगळ्या साहित्यिक भूमिकांवरही हुकूमत असणार्या बहुश्रुत साहित्यिक म्हणजे शांता जनार्दन शेळके होत्या. शांताबाईंचा हा साहित्य प्रवास थक्क करनारा आहे.
याच शांताबाईंना टोपण नाव घेऊन गीत लेखन करावं लागलं होतं.तो किस्सा देखील मजेशीर आहे.सुधीर फडके व वसंत पवार या मातब्बर संगीत दिग्दर्शकांबरोबर शांताबाईंनी चार-पाच चित्रपटांसाठी गीते लिहिली व ती ध्वनिमुदितही झाली होती. नेमकी त्याच वेळेस शांताबाईंची फिल्म सेन्सॉर बोर्डावर पाच वर्षांसाठी नेमणूक करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या गीतलेखनावर बंधन येणार होते. म्हणून त्यांनी सेन्सॉर बोर्डाचे सदस्यत्व नाकारले. पण बोर्डाचे अध्यक्ष एम. डी. भट यांनी शांताबाईंना तसे करण्याची काही आवश्यकता नाही असे सांगितले. शांताबाईंनी एखादे टोपण नाव घेऊन ते द्यावे असे सुचवले.
भट साहेबांनी सांगितलेला तोडगा मान्य करून त्यांनी डॉ. वसंत अवसरे या नावाने त्या काळात गीतलेखन केले. राजा गोसावींच्या अवघाची संसार या १९६० सालच्या सिनेमातील ’जे वेड मजला लागले ’ हे गीत बाईंनी टोपण नावाने लिहिले आहे! या पाच वर्षाच्या कालावधी नंतर त्यांनी पुन्हा स्वत:च्या नावाने लिहायला सुरूवात केली. किलबिल किलबिल पक्षी बोलती, तोच चंद्रमा नभात, हि वाट दूर जाते, दाटून कंठ येतो, माझे राणी माझे मोगा, काटा रुते कुणाला , जिवलगा राहिले रे दूर घर माझे , माझ्या सारंगा , वादळ वार सुटलगं, मी डोलकर , मगे उभा मंगेश ,जय शारदे वागेश्वरी,ऋतु हिरवा ऋतु बरवा,रेशमाच्या रेघांनी,का धरीला परदेश, असेन मी नसेन मी या त्यांच्या गाण्यांनी मराठी चित्रपट व नाट्यसृष्टी रसरशीत बनली. १९९६ साली झालेल्या आळंदीच्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.
शांता शेळके यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ साली पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, व शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे) झाले. आचार्य अत्र्यांच्या “नवयुग’ मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे.
=============
हे देखील वाचा : ‘डॉन’ चित्रपटाच्या निर्मिती मागे मनोज कुमार यांचे कनेक्शन
=============
शांताबाई यांना अनेक मान्यवर पुरस्कारांनी गौरविण्यात आले . यात प्रामुख्याने गदिमा गीतलेखन पुरस्कार (१९९६), सुरसिंगार पुरस्कार (’मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ या गीतासाठी),केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार (चित्रपट भुजंग),यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार (२००१) साहित्यातील योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी काही काळ टोपण नाव घेवून गीत लेखन केल. मराठी साहित्यात असे टोपण नाव घेवून लिखाण करण्याची जुनीच परंपरा आहे. चटकन आठवणारी नावे अशी. अरुण टिकेकर (टिचकीबहाद्दर आणि दस्तुरखुद्द), अनिल बाबुराव गव्हाणे (बापू), अशोक जैन (कलंदर), अशोक रानडे (दक्षकर्ण), आत्माराम नीलकंठ साधले (आनंद साधले), आत्माराम शेट्ये (शेषन कार्तिक), आनंद बालाजी देशपांडे (आकाशानंद), विठ्ठल वामन हडप (केयूरक), नारायण सदाशिव मराठे (केवलानंद सरस्वती), प्रल्हाद केशव अत्रे (केशवकुमार), कृष्णाजी केशव दामले (केशवसुत), वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज आणि बाळकराम), काशिनाथ हरी मोदक ( माधवानुज), जयवंत दळवी (ठणठणपाळ)