Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Shashank Ketkar शशांक केतकरच्या घरी झाले लक्ष्मीचे आगमन, रिव्हिल केले लेकीचे नाव

 Shashank Ketkar शशांक केतकरच्या घरी झाले लक्ष्मीचे आगमन, रिव्हिल केले लेकीचे नाव
टीव्ही वाले

Shashank Ketkar शशांक केतकरच्या घरी झाले लक्ष्मीचे आगमन, रिव्हिल केले लेकीचे नाव

by Jyotsna Kulkarni 23/01/2025

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे आनंदाचे वारे वाहताना दिसत आहे. अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत असून दुसरीकडे काही कलाकार आई बाबा होताना दिसत आहे. २०२५ च्या पहिल्याच दिवशी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता असलेल्या शशांक केतकरने (Shashank Ketkar) तो दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची माहिती दिली होती. १ जानेवारी २०२५ रोजी त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तो पुन्हा बाबा होणार असल्याचे जाहीर केले होते. (Shashank Ketkar)

शशांकच्या या पोस्टवर इंडस्ट्रीमधल्या कलाकारांनी आणि नेटकऱ्यांनी देखील त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. शशांक आणि त्याची पत्नी प्रियांका ढवळे यांनी अतिशय सुंदर गुलाबी रंगाच्या थीमवर मॅटर्निटी फोटोशूट करत लवकरच आई-बाबा होणार असल्याचं सर्वांना सांगितलं होते. या पोस्टनंतर अवघ्या काही दिवसातच शशांकने तो बाबा झाला असल्याचे जाहीर केले आहे. (Latest Marathi News)

शशांकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला मुलगी झाली असल्याचे सांगितले आहे. यासोबतच त्याने त्याच्या गोंडस मुलीचे नाव देखील जाहीर केले आहे. शशांकची पत्नी असलेल्या प्रियांका ढवळेने एका चिमुकलीला जन्म दिला आहे. शशांकने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक खूपच खास, क्युट, गोड व्हिडिओ शेअर केला आहे. (Shashank Ketkar Blessed With Baby Girl)

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

शशांकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शशांकने त्याचे, प्रियांकाचे आणि ऋग्वेदचे हात हळूहळू उघडत त्याच्या मुलीचे हात रिव्हिल केले आहे. या व्हिडिओमध्ये मुलीचे बारसे झाल्याचे देखील दिसत आहे. म्हणूनच त्याने या व्हिडिओमध्ये त्यांच्या लेकीच्या नामकरणाचाही फोटो टाकत मुलीचे नाव सांगितले आहे. शशांक आणि प्रियांका यांनी त्यांच्या चिमुकलीचं नाव राधा असे ठेवले आहे. (Entertainment mix masala)

शशांकने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये मुलगी झाली याचा आनंद शशांक आणि प्रियांका यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत आहे. “राधा”, (Radha) असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शशांकने त्याच्या मुलीचा चेहरा दाखवलेला नाही. यासोबतच त्याने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात त्याने प्रियांका ऋग्वेद आणि शशांक राधा असे लिहिलेले दिसत आहे. “आता खऱ्या अर्थाने कुटुंब पूर्ण झालं. घरात लक्ष्मी आली…” असे त्याने लिहिले आहे.

Shashank Ketkar

दरम्यान शशांकबद्दल सांगायचे झाले तर त्याने प्रियांकासोबत ४ डिसेंबर २०१७ रोजी लग्न केले होते. याआधी त्याने अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबत लग्न केले होते. मात्र काही महिन्यातच त्यांचा घटस्फोट झाला. प्रियांकासोबत लग्न झाल्यानंतर २०२१ मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केले होते. अभिनेत्याच्या मोठ्या मुलाचं नाव ऋग्वेद असं आहे.

======

हे देखील वाचा :Balasaheb Thackeray बाळासाहेब ठाकरेंनी अमिताभ बच्चनपासून ते संजय दत्तपर्यंत ‘या’ सर्व कलाकारांना केली मदत

======

दरम्यान शशांकच्या कामाबद्दल सांगायचे झाले, तर त्याने अनेक चित्रपट, नाटक, मालिका, वेबसीरिज अशा सर्वच माध्यमांमध्ये त्याने काम केले आहे. यासोबतच त्याने हिंदी वेबसेरीजमध्ये देखील काम करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या तो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘मुरांबा’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Celebrity Entertainment Featured Marathi Movie Shashank Ketkar Shashank Ketkar beacme father Shashank Ketkar Second Child Shashank Ketkar Shares Good News शशांक केतकर शशांक केतकर बातम्या शशांक केतकर बाबा झाला शशांक केतकर माहिती
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.