Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

शशी कपूर पहिल्याच चित्रपटात बनला ॲक्टर-डायरेक्टर!
हा किस्सा आहे राज कपूरचे भाऊ प्रिन्स चार्मिंग शशी कपूर (Shashi Kapoor) यांचा! त्यांनी बी आर चोप्रा यांच्या ‘धर्मपुत्र’ या सिनेमातून रुपेरी पदार्पण केले होते. पण त्याचवेळी ते बिमल रॉय यांच्या एका चित्रपटात भूमिका करत होते. गंमत म्हणजे बिमल रॉय आणि शशी कपूर (Shashi Kapoor) यांची या सिनेमादरम्यान इतकी चांगली ट्युनिंग झाली की शशी कपूरला या चित्रपटात नायकासोबत एक महत्त्वाचा रोलदेखील करावा लागला होता. हे भाग्य फार कमी लोकांच्या वाटायला येत असतात ते शशी कपूरच्या नशिबात होतं. कोणता होता तो रोल आणि काय होता तो किस्सा?

तर १९५९ साली जेव्हा शशी कपूर (Shashi Kapoor) चांगल्या भूमिकांच्या शोधात होते एका अर्थाने स्ट्रगल करत होते त्या काळात त्यांना एकदा निरोप मिळाला “दिग्दर्शक बिमल रॉय यांनी तुम्हाला बोलावले आहे!” शशी कपूरला खूप आनंद झाला. कारण त्यावेळी बिमल रॉय यांच्या नावाचा मोठा डंका भारतीय सिनेमात वाजत होता. शशी कपूर बिमल रॉय यांना भेटण्यासाठी मोहन स्टुडीओमध्ये गेले. बिमलदा यांच्या रूममध्ये त्यांचे असिस्टंट ऋषिकेश मुखर्जी आणि गुलजार उपस्थित होते. दोघेही शशी कपूर यांना ओळखत होते. ते शशी कपूरला (Shashi Kapoor) म्हणाले,”बिमलदा लवकरच दोन चित्रपट लॉन्च करत आहेत. एक ‘बंदिनी’ आणि दुसरा ‘प्रेम पत्र . तुम्ही मात्र ‘प्रेम पत्र’ या चित्रपटातील भूमिका एक्सेप्ट करा कारण यात रोमँटिक नायकाची भूमिका तुमच्या इमेजला साजेशी आहे!” शशी कपूर यांनी मनात विचार केला ‘सध्या तर मी बेकार आहे. माझ्याकडे चॉईस करण्यासारखे काही नाही. त्यामुळे जे मिळेल ते घ्यायचं!’ शशी कपूर आत गेले.

बिमलदा शशी कपूर (Shashi Kapoor) यांना म्हणाले ,”शशी देखो हम एक फिल्म बना रहा है. आय वोन्ट यु इन द फिल्म. तुमको काम करना है.” शशी कपूर लगेच म्हणाला, “दादाजी बिलकुल !आय ऍम रेडी.” विमलदाने डेट्सबाबत विचारले शशी कपूरने (Shashi Kapoor) लगेच पुढच्या डेट्स देऊन टाकल्या. त्याने हेदेखील विचारले नाही की चित्रपट कोणता आहे आणि मानधन किती आहे. बाहेर आल्यानंतर गुलजार यांनी विचारले “कोणती भूमिका एक्सेप्ट केली?” त्यावर शशी कपूर म्हणाला “हे तर मी विचारलंच नाही.” सगळेजण खूप हसू लागले.

नंतर काही दिवसांनी बिमल रॉय यांच्या ऑफिसमधून शशी कपूर (Shashi Kapoor) यांना पुन्हा बोलावण्यात आले. ‘प्रेम पत्र’ या चित्रपटात त्यांना नायकाची भूमिका मिळाली होती. मोहन स्टुडिओमध्ये शूटिंग सुरू झाले. या शूटिंगच्या दरम्यान विमल रॉय आणि शशी कपूर (Shashi Kapoor) यांच्यात चांगली मैत्री झाली. शशी कपूर (Shashi Kapoor) एक चांगला विद्यार्थी होता. तो कॅमेरा, अँगल, लाइट्स, दिग्दर्शनातील बारकावे… या सगळ्या गोष्टी हळूहळू एकलव्यासारखे शिकत होता. बिमलदादेखील त्याच्या एकूणच अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्वाने प्रभावीत झाले होते.
नंतर बिमल रॉय यांनी त्याला विचारले,”शोशी अरे तुम कितना पैसा लेगा? तुम बताया नही.” त्यावर शशी कपूरला (Shashi Kapoor) काय उत्तर द्यावे कळालेच नाही. मग बिमलदा यांनी विचारले, “अच्छा ये बता. बी आर चोप्राने फिल्म मै काम करनेका कितना टका दिया तुमको?” त्यावर शशी म्हणाला, “पच्चीस हजार!” बिमलदा म्हणाले, “उडी बाबा पच्चीस हजार! हम भी तुमको उतना ही टका देगा!”

या सिनेमाच्या दरम्यान एकदा शशी कपूरला (Shashi Kapoor) त्याच्या वैयक्तिक कामासाठी लंडनला जायचे होते. ‘प्रेम पत्र’ या चित्रपटातील काही शॉट्स लंडनला चित्रित करायचे होते. बिमल रॉय यांनी भारतातूनच तिथली टीम अरेंज केली आणि शशी कपूरला म्हणाले, “शोशी, तू मेरा काम करेगा? लंडन मे कुछ शॉट्स पिक्चराईज करने का है? तू उसका डायरेक्शन करेगा?” त्यावर शशी कपूर म्हणाले, “लेकीन दादा क्या मै ये कर सकूंगा?” त्यावर बिमलदा म्हणाले, “मै तुमको शुरू से देखता है. तुम बडा स्टुडिअस लडका है. तुम जरूर कर सकेगा डोंट वरी गो अहेड!“
============
हे देखील वाचा : हँडसम शशी कपूरला पाहून तरुण शर्मिला टागोर त्याच्यावर लट्टू झाली होती!
============
शशी कपूर (Shashi Kapoor) लंडनला गेले तिथे बिमलदांच्या मित्रांनी कॅमेरामॅन, लाईटमॅन सर्व टीम अरेंज करून दिली. बिमलदा यांच्या सूचनेनुसार शशी कपूर (Shashi Kapoor) यांनी काही शॉट्स तिथे चित्रित केले आणि ते मुंबईला पाठवून दिले. त्याच्या रशेस पाहिल्यानंतर बिमलदा खूष झाले आणि शशी कपूरला म्हणाले, “शोशी तुम एक दिन बडा डायरेक्टर बनेगा!” शशी कपूर (Shashi Kapoor) यांनी दिग्दर्शित केलेले ते शॉट प्रेम पत्र या चित्रपटात ठेवले गेले. शशी कपूर यांच भाग्य थोर पहिल्या चित्रपटात नायका सोबत त्यांना सिनेमातील काही शॉट्सचे डायरेक्शन करण्यासाठी संधी मिळाली आणि ही संधी त्यांना विमल रॉय यांच्यामुळे मिळाली. पुढे शशी कपूर ऐंशीच्या दशकामध्ये दिग्दर्शक बनला पण त्याचे मूळ १९६१ सालच्या प्रेम पत्र या चित्रपटाच्या वेळी होते!