Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Hera Pheri 3 : बाबू भैय्या नंतर श्यामचीही हेरा फेरीतून

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi: ‘क्योंकि सास भी कभी

Vaama Ladhai Sanmanachi Movie: ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटातील ‘गुटूर गुटूर’

Chandrashekhar : सुबहा न आयी शाम न आयी जिस दिन

Gram Chikitsalay : आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजतेय ग्रामीण जीवनाची सीरीज!

Mahesh Manjrekar : ‘आता थांबायचं नाय’चित्रपटाबद्दल मांजरेकरांनी व्यक्त केलं स्पष्ट

Shah Rukh Khan : १९ वर्षांनी ‘ही’ अभिनेत्री पुन्हा किंग

50 Years Of गळ्यात साखळी सोन्याची,ही पोर कोणाची?

Raid 2 : बॉक्स ऑफिसवर ‘रेड २’ चित्रपटाने मारली बाजी!

Jarann Marathi Movie Teaser: ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’; ‘जारण’ चा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

या वयातही वीशीतल्या तरुणीला लाजवेल अशीच तिची अदा आहे…

 या वयातही वीशीतल्या तरुणीला लाजवेल अशीच तिची अदा आहे…
मनोरंजन ए नया दौर

या वयातही वीशीतल्या तरुणीला लाजवेल अशीच तिची अदा आहे…

by सई बने 08/06/2022

पाच फूट सात इंच उंची. चवळीच्या शेंगेसारखी फिगर. आणि सौंदर्याची देणगी लाभलेली शिल्पा शेट्टी नावाची अभिनेत्री बाजीगर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दाखल झाली.  शिल्पाला यात साईड़ अॅक्टरची भूमिका मिळाली होती. पण शिल्पानं त्यात आपली छाप सोडली. बॉलिवूडमध्ये येण्याआधी शिल्पा मॉडेलिंगही करत होती.  लक्सगर्ल म्हणून तिची ओळख होती. मुंबईत शिक्षण झालेल्या शिल्पाचे खरे नाव अश्विनी. पण बॉलिवूडमध्ये तिने शिल्पा हे नाव घेतलं आणि ते यशस्वीही झालं.  सुनंदा आणि सुरेंद्र शेट्टी यांची मोठी मुलगी असलेली शिल्पा अठराव्या वर्षीपासून मॉडेलिंग करु लागली. तिच्यावर तिच्या आईचा, सुनंदा यांचा मोठा प्रभाव आहे. आईच्या पाठिंब्यानं शिल्पानं बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. तिने तब्बल 40 पेक्षा अधिक चित्रपट केले. त्यात हिंदी, तामिळ, तेलगू या भाषेतील चित्रपटांचा समावेश आहे. (shilpa shetty)

शाळेत असतांना ती शाळेच्या वॉलिबॉलची संघाची कॅप्टन होती. भरतनाट्यम ही तेवढ्याच तन्मयतेने करायची. याशिवाय कराटेमध्ये तिला ब्लॅकबेल्ट मिळाला होता. बाजीगरमधून आलेली ही मुंबईची कन्या मै खिलाडी तू अनाडी, धडकन सारख्या चित्रपटातून अधिक लक्षात राहीली. याशिवाय शिल्पा तिच्या अक्षय कुमारसोबत असलेल्या प्रेमप्रकरामुळेही चर्चेत राहीली. लग्नापर्यंत गेलेले हे नाते, प्रेमाच्या पुढे गेले नाही. त्यांचा झालेला ब्रेकअपही चांगलाच गाजला. रिचर्ड गील यांनी एका शो मध्ये शिल्पाबरोबर केलेली जवळीकही गाजली. याशिवाय शिल्पा युके बीग ब्रदर शोमध्ये सहभागी झाली आणि विजयीही झाली. यावेळी तिला रंगभेदावरुन बरीच टीका सहन करावी लागली. शिल्पाची धाकटी बहिणही शमिताही अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये दाखल झाली. या दोघा बहिणींनी फरेब या चित्रपटात एकत्र भूमिका केली आहे.(shilpa shetty)

शिल्पाचा अभिनय प्रवास चालू असतांना अक्षय कुमार बरोबर झालेल्या ब्रेकअपमुळे ती काही काळ अस्वस्थ होती. मात्र याचवेळी तिच्या आयुष्यात बिझनसमॅन राज कुंद्रा यांची एन्ट्री झाली. राज कुंद्रा यांचा विवाह झाला होता. त्यामुळे या प्रेमप्रकरणामुळेही शिल्पा चर्चेत आणि वादातही राहीली. राज कुंद्रांच्या पहिल्या पत्नीने तिच्यावर अनेक आरोप केले. पण हे प्रेमप्रकरण लग्नाच्या बेडीपर्यंत पोहचलं. आणि 2009 मध्ये शिल्पा मिसेस राज कुंद्रा झाली. या दोघांना विवान नावाचा मुलगाही झाला. आता काही महिन्यांपूर्वी सरोगसीच्या माध्यमातून शिल्पाला एक मुलगीही झाली आहे. (shilpa shetty)

शिल्पाच्या (shilpa shetty) आयुष्याचा हा एक भाग. तर दुसरा भाग अजून एका गोष्टीनं व्यापला आहे. ती गोष्ट म्हणजे योगा. आणि परफेक्ट डायट. या दोन्ही गोष्टीमुळे आज ४७व्या वर्षातही शिल्पा विशीतल्या तरुणीसारखी दिसतेय. या तिच्या योगामुळे तिच्या फॅनफोलोअरच्या संख्येत मोठी झाली आहे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शिल्पा काय खाते. कुठलं ज्युस पिते. हे शेड्युल अनेक फॉलो करतात. तिचा योगा पॉवर प्रोग्राम सर्वाधिक लोकप्रिय ठरला आहे.  शरीराबरोबर मनही तंदुरुस्त असावे लागते. यासाठी योगासारखा पर्याय नाही, असं शिल्पा सांगते. आठवड्यातले सहा दिवस तिचं डायट शेड्युल अगदी कडक असतं.  एक दिवस ती या शेड्युलला दांडी मारते. मानसिक ताण तणाव कमी करण्यासाठी योगासारखा पर्याय नाही हे शिल्पा सांगते. आता या लॉकडाऊनच्या काळात शिल्पा योगाचे धडे देत आहे. तीचं डायट जरी हायफंडो असलं तरी योगा मात्र अस्सल भारतीय आहे. या योग योगीनी शिल्पाला वाढदिवसाच्या कलाकृती मिडीयातर्फे हेल्दी शुभेच्छा…. (shilpa shetty)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Bollywood Bollywood Chitchat Bollywood Topics Celebrity Celebrity Birthday Celebrity News Entertainment Featured
Previous post
Next post

1 Comment

  • Jayant bane says:
    10/06/2020 at 1:30 pm

    Very nice 👌

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.