Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Sholay मधील सुरमा भोपाली ही भूमिका करायला जगदीप का तयार नव्हता?
या वर्षी ‘मिलेनियम ऑफ द मूवी’ ‘शोले’ आपल्या प्रदर्शनाची पन्नास वर्षे पूर्ण करत आहे. त्या निमित्ताने सगळीकडे भरपूर रिसर्च आणि कमेंटस चालू आहे. ‘शोले’ सिनेमातील अगदी बारीक सारीक गोष्टींवर चर्चा चालू आहेत. रमेश सिप्पी यांनी या चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टरला एक वेगळी ओळख मिळवून दिली. मॅकमोहन सारख्या कलाकाराला चित्रपटात एकच डायलॉग ‘पुरे पचास हजार’ असून देखील ‘अरे ओ सांभा…’ म्हणलं की आपल्या डोळ्यापुढे मॅकमोहन येतो! इतका जबरदस्त इम्पॅक्ट या चित्रपटाचा आपल्यावर आहे.

सिप्पी यांनी यातील हरेक व्यक्तीरेखेला स्वतंत्र ओळख मिळवून दिली. या चित्रपटात असरानी आणि जगदीप या दोन विनोदी कलाकारांनी अगदी छोट्या छोट्या भूमिका केल्या आहेत. पण या भूमिकांना एक वेगळी स्टोरी लाईन आहे आणि शोले चित्रपटाच्या कथानकाशी या दोन्ही स्टोरी लाईन अगदी व्यवस्थित मॅच झालेली आहे. असरानी यांनी रंगवलेला अंग्रेज जमानेका जेलर अविस्मरणीय ठरला. चार्ली चॅप्लिन आणि हिटलर यांची नक्कल करत त्याने साकारलेला ब्रिटिशकालीन जेलर ऑल टाईम ग्रेट बनला. त्याचप्रमाणे या चित्रपटात जगदीप या हास्य अभिनेत्याला ‘सुरमा भोपाली’ ही भूमिका मिळाली.
कॉमेडीयन जगदीप याने साडे तीनशे अधिक चित्रपटात काम जरी केले असले तरी ‘सुरमा भोपाली’ ही त्याच्या सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक ठरली आणि तीच त्याची ओळख ठरली. पण गंमत म्हणजे सुरमा भोपाली ची भूमिका करायला जगदीप ने आधी साफ नकार दिला होता! ‘ही भूमिका मी करणार नाही…’ असे त्याने निक्षून सांगितले होते. मग असे काय घडले? की त्याने या भूमिकेला होकार दिला. त्याला या भूमिकेसाठी कसे राजी केले.
================================
हे देखील वाचा : Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..
=================================
जगदीप हिंदी सिनेमाच्या दुनियेत पन्नास च्या दशकामध्ये आला होता. अगदी लहान वयात बालकलाकार म्हणून त्याने चित्रपटात काम सुरू केले. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये संघर्ष करत त्याने स्वतःला सिद्ध केले. पन्नास च्या दशकाच्या अखेरीस त्याला नायकाच्या भूमिका देखील ऑफर होऊ लागल्या. पण नंतर साठच्या दशकाच्या मध्यापासून त्याने स्वतःला कॉमेडीयन म्हणून सेट करायचे ठरवले. साठच्या च्या दशकामध्ये एका चित्रपटात जगदीश भूमिका करत होता. या चित्रपटाचा नायक सलीम होता. सलीम जावेद पैकी एक सलीम. आणि या चित्रपटाचे संवाद जावेद अख्तर लिहित होते.

जावेदला अख्तर यांना नक्कल/मिमिक्री करत कॉमेडी करण्याची खूप सवय होती. एकदा लंच ब्रेक मध्ये जगदीश सोबत गप्पा मारत असताना त्याने भोपाळ मध्ये त्याला भेटलेल्या एका फॉरेस्ट ऑफिसर च्या आवाजाची नक्कल करून दाखवाली. टिपिकल भोपाली भाषेतील लहजा हि नक्कल होती. ही नक्कल / मिमिक्री जगदीपला एवढी आवडली की त्याने त्याच आवाजामध्ये बोलायला सुरुवात केली. (हा तोच आवाज होता जो पुढे शोले या चित्रपटात सुरमा भोपाली साठी वापरला गेला होता.) पुढचे दोन चार दिवस जावेद अख्तर आणि जगदीप त्याच शैलीत एकमेकांशी बोलत होते. चित्रपटाचे शूट झाल्या नंतर ते दोघे विसरून देखील गेले.

सत्तरच्या दशकाच्या प्रारंभी सलीम आणि जावेद हे एकत्र आले आणि डायलॉग लिहू लागले. ‘शोले’ चित्रपटा चे शूट १९७३ सुरू झाले. हा चित्रपट बऱ्यापैकी पूर्ण झाला होता पण यात सुरमा भोपाली हे कॅरेक्टर असावे असे सलीम जावेद यांना वाटत होतं. तसे त्यांनी चित्रपटाचे निर्माते जी पी सिप्पी यांना सांगितले. त्यांनी ही भूमिका आणि त्या भूमिकेचे महत्त्व समजावून सांगितले. सिप्पी तयार झाले. ही भूमिका जगदीपला द्यायची असे जावेद अख्तर यांनी आधीच ठरवले होते. जगदीप ला कॉन्टॅक्ट केले आणि त्याला ती भूमिका ऑफर केली. पण जगदीप ने आता भूमिका करायला नकार दिला. जावेद अख्तरला धक्का बसला. त्याने त्याला हरतऱ्हेने समजावून सांगितले की,” हे कॅरेक्टर आपण त्या चित्रपटाच्या वेळी किती बोलत होतो!” पण जगदीश चा नकार कायम होता. त्याचे दोन कारणे त्यांनी सांगितले.
================================
हे देखील वाचा : Sholay म्हणजेच मिनर्व्हा, मिनर्व्हा म्हणजेच शोले
=================================
एक तर सिप्पी यांच्या आधीच्या एका चित्रपटात त्याने काम केले होते.तो सिनेमा होता १९५८ सालचा ‘ ब्रह्मचारी’. पण त्याचे व्यवस्थित मानधन त्याला मिळाले नाही. दुसरे कारण असे होते की ‘शोले’ चित्रपटातील जेलरची भूमिका त्याला करायची ती भूमिका त्याला टाळून असरानी ला दिल्याचा राग त्याच्या डोक्यात होता. सिप्पी यांनी नी त्याला सांगितले ,”असरानी ची भूमिका तर ऑलरेडी शूट झाली आहे. चित्रपट देखील बऱ्यापैकी पूर्ण झाला आहे. आता आपल्याला काही बदल करता येत नाही. तुझे मागच्या चित्रपटाचे राहिलेले मानधन आम्ही आत्ता देऊन टाकतो. या चित्रपटात तू काम कर!” अशा पद्धतीने जगदीप ला पटवण्यात आले आणि जगदीप सुरमा भोपाली ही भूमिका करण्यासाठी राजी. त्याचं टिपिकल भोपाली बोलणं ‘मे तो मजाक करी रहा था…’ तुफानी हिट झालं होतं. आज ‘सुरमा भोपाली’ ही भूमिका आपण ‘ शोले ‘ पासून अलग करू शकत नाही. जगदीप ची देखील ही आवडती भूमिका ठरली. जगदीपने साडेतीनशे चित्रपटात जरी भूमिका केल्या असल्या तरी त्याच्या सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी सुरमा भोपाली ची भूमिका ठरली. ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस १९८८ साली त्याने ‘सुरमा भोपाली’ नावाचा एक सिनेमा देखील बनवला होता.