Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“Sholay ही माझी ऑल टाइम फेवरेट मूवी नाही”, असे धर्मेंद्र का म्हणाले?

 “Sholay ही माझी ऑल टाइम फेवरेट मूवी नाही”, असे धर्मेंद्र का म्हणाले?
बात पुरानी बडी सुहानी

“Sholay ही माझी ऑल टाइम फेवरेट मूवी नाही”, असे धर्मेंद्र का म्हणाले?

by धनंजय कुलकर्णी 21/10/2025

आज जेव्हा ‘शोले’ हा चित्रपट पन्नास वर्षे पूर्ण करतोय आणि त्याची संपूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू आहे; त्यावेळेला या चित्रपटाचे मुख्य नायक धर्मेंद्र यांनी, “‘शोले’हा चित्रपट माझा ऑल टाइम फेवरेट नाही”, असे सांगून खळबळ उडवून दिली आहे. या मुलाखतीत धर्मेंद्र यांनी त्यांचा ‘प्रतिज्ञा’ हा चित्रपट ऑल टाइम फेवरेट आहे असे सांगितले. खरंतर ‘प्रतिज्ञा’ हा चित्रपट ‘शोले’ ज्या वर्षी प्रदर्शित झाला त्याच १९७५ साली ‘शोले’च्या नंतर महिना भरात प्रदर्शित झाला होता आणि हा चित्रपट त्यावर्षीच्या टॉप टेन चित्रपटां पैकी एक होता.

धर्मेंद्र यांनी या मुलाखतीत असे सांगितलेले ‘सत्यकाम’, ‘प्रतिज्ञा’ आणि ‘ शोले’ हे माझे आवडीचे चित्रपट आहेत. पण माझा ऑल टाईम फेवरेट सिनेमा हा ‘प्रतिज्ञा’ आहे!  मागच्या शतकातील ब्लॉकबस्टर शोले चित्रपटाच्या  निर्माता दिग्दर्शक  सिप्पी यांनी पुन्हा धर्मेंद्र सोबत का एखादा चित्रपट केला नाही?  हा प्रश्न देखील अनेक जणांना पडतो. कारण ‘शोले’ हा मागच्या शतकातील सर्वाधिक चर्चेला जाणारा आणि सर्वाधिक यशस्वी सिनेमा समजला जातो. धर्मेंद्र आणि सिप्पी पुन्हा एकत्र का आले नाहीत?  याचा जेव्हा आपण त्या काळात जाऊन विचार करू लागतो. तेव्हा एक गोष्ट निश्चित होतो की ‘शोले’ या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांच्या अँग्री यंग मॅन इमेज चा अधिक बोलवाला झाला आणि त्यांचा सुपरस्टार पदाचा मार्ग अधिक प्रशस्त झाला. तितकी लोकप्रियता धर्मेंद्र च्या वाट्याला आली नाही.

‘शोले’ चित्रपटानंतर रमेश सिप्पी  यांन १९७८ साली ‘ शान’ या मेगा प्रोजेक्टची निर्मिती सुरू केली. यामध्ये सुरुवातीला त्यांनी शोले चीच  स्टार कास्ट रिपीट करण्याचे ठरवले होते. संजीव कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी यांना त्यांनी साईन केले होते. पण धर्मेंद्रच्या असे लक्षात येऊ लागले की मल्टीस्टार सिनेमांमध्ये त्याच्या भूमिकेकडे फारसे कोणाचे लक्ष जात नाही. तो काळ तसा मल्टीस्टार सिनेमांचा होता. सलीम जावेद यांनी धर्मेंद्रला समजावून सांगितले की, “मल्टीस्टार सिनेमाच्या काही मर्यादा असतात. तिथे प्रत्येक भूमिकेला एक ठराविक बंदिस्त चौकट असते त्या पलीकडे जाऊन त्या भूमिकेला आपण जास्त मोठे करू शकत नाही.” धर्मेंद्रने मात्र आता मनोमन सोलो लीड चेच सिनेमा करण्याचा निर्णय घेतला होता. ‘शान’ सिनेमाच्या दरम्यान रमेश सिप्पी  सोबत थोडे क्रिएटिव्ह डिफरन्स झाल्यामुळे त्यांनी हेमा मलिनी सोबत हा चित्रपट सोडला आणि अशा प्रकारे सिप्पी  आणि धर्मेंद्र हे पुन्हा एकत्र कधी झाले नाही!  रमेश सिप्पी यांनी मात्र अमिताभ बच्चन सोबत ‘शोले’ नंतर ‘शान’, ‘शक्ती’ आणि ‘अकेला’ हे  चित्रपट केले.

================================

हे देखील वाचा: Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

=================================

धर्मेंद्र ज्या सिनेमाला आपला ऑल टाइम फेवरेट सिनेमा मानतो तो ‘प्रतिज्ञा’ हा चित्रपट १९ सप्टेंबर १९७५ रोजी प्रदर्शित झाला होता. धर्मेंद्रचा  चुलत भाऊ अजित सिंग देओल यांनी निर्माण केला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन दुलाल गुहा यांनी केले होते. ‘मेरा गाव मेरा देश’ या चित्रपटापासून भारतीय सिनेमांमध्ये डाकू पटांना पुन्हा एकदा चांगले दिवस आले होते. हा चित्रपट त्याच कॅटेगिरीतला होता. ही एक सूड  कथा होती. चित्रपटात धर्मेंद्रची नायिका हेमा मलिनी होती. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते. या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेले एक गाणे त्या काळात कमालीचे हिट झाले होते. आणि हेच गाणे धर्मेंद्रचे आयुष्यातल्या सिग्नेचर सॉंग बनले! गाण्याचे बोल होते ‘मै जट यमला पगला दिवाना..’ हे गाणे गाताना रफी साहेब इतके एक्साइट झाले होते की ते कधी नव्हे ते स्टुडिओमध्ये अक्षरश: नाचत नाचत हे गाणे गात होते.

गाणे रेकॉर्ड झाल्यानंतर ते धर्मेंद्रला म्हणाले “आता मी माझे काम केले आहे. आता या गाण्यात रंग कसे भरायचे ते तू बघ.”  धर्मेंद्र देखील खूष होता पण धर्मेंद्र डान्स साठी कधीच फेमस नव्हता. त्यामुळे या चित्रपटाचे कोरिओग्राफर गोपी कृष्ण आणि मनोहर नायडू यांनी शिकवलेल्या स्टेप्स तो विसरला आणि त्याने सर्व बाजूला ठेवून आपल्या खास स्टाईलने या गाण्यावर बिनधास्त नृत्य केले. प्रेक्षकांना देखील हा धर्मेंद्रचा डान्स प्रचंड आवडला. काहींना तो कमालीचा कॉमिक वाटला पण धर्मेंद्रसाठी हा चित्रपट आणि हे गाणे क्लासिक ठरले. ‘प्रतिज्ञा’ हा चित्रपट त्यावर्षीच्या टॉप टेन मध्ये सहाव्या क्रमांकावर होता. हा चित्रपट आणि हे गाणे धर्मेंद्रंना इतके आवडले की त्यांनी नंतर आपल्या मुलांसोबत या सिनेमाचे दोन सिक्वेल देखील बनवले या सिनेमाचे नाव होतं ‘यमला पगला दिवाना’. धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन ‘शोले नंतर फक्त ‘राम बलराम’ या सिनेमात एकत्र चमकले.  

================================

हे देखील वाचा : Sholay : ‘शोले’ तील सुरमा भोपालीची भूमिका करायला जगदीप का तयार नव्हते?

================================

धर्मेंद्र खरं तर १९६० साली रूपेरी  पडद्यावर आले होते. अनेक सुपरस्टार समोर ते टिकून राहिले. राजेंद्रकुमार, शम्मी कपूर, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन… यांच्या झंजावाद त्यांचा वेगळा एक प्रेक्षक वर्ग होता. त्यांचा वेगळा फॅन फॉलोवर होता. धर्मेंद्र संपला संपला असे म्हणत असताना १९८७ झाली तब्बल  सात सुपरहिट सिनेमे दिले होते. अगदी काही वर्षांपूर्वी २०२३ साली  ‘रॉकी अँड राणी की प्रेम कहानी’ या चित्रपटात देखील धर्मेंद्रने जबरा भूमिका केली होती!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Chitchat bollywood update Dharmendra dharmnedra Entertainment Entertainment News pratigya movie Sholay sholay movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.