Bollywood Movies : ३४ वर्षांच्या कारकिर्दित या अभिनेत्याने फ्लॉपपेक्षा सुपरहिट

Shreyas Talpade : “आईच्या हट्टामुळे बॅंकेत नोकरीही केली पण…“
अभिनेता ते सुत्रसंचालक अशी ओळख मिळवणारा श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) सध्या ‘चल भावा सिटीत’ या त्याच्या नव्या कार्यक्रमामुळे विशेष चर्चेत आहे. श्रेयस तळपदे हा एक हरहुन्नरी अभिनेता तर आहेच पण एक उत्तम डबिंग आर्टिस्ट ही ओळखही त्याने ‘पुष्पा’ चित्रपटामुळे निर्माण केल आहे. पण तुम्हाला माहित आहे का? श्रेयसने अभिनयक्षेत्रात न येता एका वेगळ्याच क्षेत्रात करिअर करावं अशी त्याच्या आईची इच्छा होती. कलाकृती मिडीयाशी बोलताना श्रेयसने आईचा हट्ट काय होता तो सांगितला आहे. जाणून घेऊयात…(Bollywood update)

१९९८ साली ‘वो’ (Woh) या मालिकेतील मनोरंजनसृष्टीत श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याने अभिनेता म्हणून एन्ट्री घेतली. त्यानंतर मागे कधी त्याने वळून पाहिलंच नाही. पण श्रेयसच्या आईला त्याने अभिनेता न होता नोकरी करावी असं वाटत होतं. याबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला की, “माझ्या कुटुंबातील फारसं कुणी या सिने-इंडस्ट्रीमध्ये नाही आहे. माझे एक काका होते जे नाटकांमध्ये कामं करत होते. माझी आत्या काही चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका करत होती. पण ज्यावेळी मी ठरवलं की मला नाटकात किंवा चित्रपटात काम करायला आवडेल त्यावेळी घरच्यांचा अप्रोच फार वेगळा होता.
श्रेयस पुढे म्हणाला, “अभिनय करायचं या माझ्या निर्णयासाठी तेव्हा माझा चुलत भाऊ माझ्या पाठीशी उभा होता. कारण, घरच्यांना ही इंडस्ट्री फारशी भावली नव्हती. मात्र, माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की तुला जे आवडेल ते कर. आईचं असं म्हणणं होतं की तु वेळ वाया घालवतोयस. आवड म्हणून ठिक आहे पण नोकरीचं बघ. आणि त्यावेळी बरेचसे असे कलाकार होते जे बॅंकेत नोकरी करुन अभिनय करत होते. आईचं ऐकून मी बॅंकेत नोकरीचाही प्रयत्नकेला पण ते काही शक्य झालं नाही. शेवटी अभिनयाचीच वाट धरली. आणि एकांकिकेपासून पहिलं नाटक मिळालं आणि आजपर्यंततो अभिनयाचा माझा प्रवास अविरतपणे सुरु आहे याचा मला आनंद आहे”. (Shreyas Talpade movies)
===========
हे देखील वाचा : Chhaava : चित्रपटातील एका गाण्यात दिसले प्रभू श्रीराम आणि मारुतीराय
===========
श्रेयसच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, श्रेयसने (Shreyas Talpade) कॉलेजमधील एकांकिकांपासून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर नाटकांमधून प्रवास करत मालिका आणि मग चित्रपटापर्यंत तो पोहचला. ‘सावरखेड एक गाव’, ‘इक्बाल’, ‘रेवती’, ‘सरीवर सरी’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘बयो’, ‘वेलकम टु सज्जनपूर’, ‘सनई चौघडे’, ‘गोलमाल ३’, ‘हाऊसफुल्ल २’, ‘गोलमाल अगेन’ अशा अनेक मराठी, हिंदी चित्रपटात त्याने उल्लेखनीय भूमिका साकारल्या. तर ‘पुष्पा’ चित्रपटासाठी अल्लू अर्जूला हिंदी वर्जनसाठी आवाज देत त्याने आणखी एक यशाची पायरी गाठली. सध्या तो चल भावा सिटीत या कार्यक्रमाचा होस्ट असून लवकरच नव्या प्रोजेक्ट्समधून तो समोर येणार आहे. (Entertainment trending news)