Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sonali Bendre हिने अखेर तिच्या आणि राज ठाकरे यांच्या नात्याबद्दल

Ek Goan Ki Kahani चित्रपटाला ५० वर्ष पुर्ण!

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sidharth Chandekar “जिथे ओलावा होता, तिथे….” सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला नात्यांवर आधारित कवितेचा व्हिडिओ

 Sidharth Chandekar “जिथे ओलावा होता, तिथे….” सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला नात्यांवर आधारित कवितेचा व्हिडिओ
टीव्ही वाले

Sidharth Chandekar “जिथे ओलावा होता, तिथे….” सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला नात्यांवर आधारित कवितेचा व्हिडिओ

by Jyotsna Kulkarni 15/01/2025

कलाकार नेहमीच त्यांच्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसतात. सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत ते त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देतात. मात्र अनेकदा कलाकार देखील त्यांच्यात असणाऱ्या सुप्त कला देखील या माध्यमातून त्यांच्या फॅन्सच्या समोर आणताना दिसतात. (Marathi Actors)

अनेक कलाकार चांगले चित्र काढतात, काही स्वयंपाक छान करतात, काही डिझायनिंगमध्ये कुशल असतात. सोशल मीडियामुळे आपल्याला आपल्या आवडत्या कलाकारांचे वेगळे गुण देखील समजतात. अशाच एका मराठी अभिनेत्याचा एक वेगळाच आणि सुंदर गुण समोर आला आहे.

नुकताच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने (Sidharth Chandekar) त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमुळे सिद्धार्थ चांगलाच गाजत आहे, सोबतच त्याच्यात असणारा एक गुण देखील प्रेक्षकांच्या समोर आला आहे. सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो चक्क एक कविता सादर करताना दिसत आहे. त्याची कविता आणि त्याने केलेले सादरीकरण याची खूपच चर्चा होताना दिसत आहे. (Entertainment Masala)

सिद्धार्थने सादर केलेल्या कवितेमध्ये त्याने नात्यांची वीण उलगडली आहे. आजकालची बदल जाणारी नाती त्याने त्याच्या कवितेमधून अगदीच समर्पक शब्दात मांडली आहे. सिद्धार्थने त्याच्या कवितेमध्ये म्हटले,

View this post on Instagram

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

“गंमत बघा ना, जे लांब आहेत, त्यांना जवळ यायचंय. जे जवळ असतात, त्यांना लांब जायचंय. खूप काही बोलून बसलो म्हणून काही लोक भीत आहेत, थोडं तरी बोलायला हवं होतं म्हणून काही लोक पस्तावताहेत. इन्स्टा स्टोरी बघायला तयार आहेत; पण, खरी स्टोरी ऐकायला तयार नाहीत. मीच का घ्यायचा पुढाकार, हा प्रश्न काहींना, तर का घेतली मी माघार हा प्रश्न काहींना. आठवणींची जागा अहंकारानं कधी घेतली? जिथे ओलावा होता, तिथे ठिणगी कधी पेटली? मान्य, काही विस्कटलेल्या गोष्टी पुन्हा आवरता येत नाहीत. पण, एकदा ठेच लागली म्हणून काय परत सावरता येत नाही? लपवलेला तुकडा लावून बघा, कोडं आपोआप सुटेल, रक्ताचं नातं ना, असं कसं तुटेल?” (Sidharth Chandekar Poem)

सिद्धार्थने सादर केलेल्या या कवितेचा हा व्हिडिओ कमालीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर मराठीमधील अभिजित खांडकेकर, अनघा अतुल, अमेय वाघ, पौर्णिमा डे, आदिनाथ कोठारे, हेमंत ढोमे, सायली संजीव, गायत्री दातार, जितेंद्र जोशी, किरण गायकवाड, वैदेही परशुरामी, अभिज्ञा भावे आदी अनेक कलाकारांनी आणि नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. (Sidharth Chandekar Post)

===============

हे देखील वाचा : Kranti Redkar “माझ्या मुलींचा बाबा….” लग्नाच्या वाढदिवसाच्या क्रांती रेडकरने शेअर केली खास पोस्ट

===============

सध्या सिद्धार्थ त्याच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘फसक्लास दाभाडे’ या सिनेमाच्या निमित्ताने खूपच चर्चेत आहे. तो सतत सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे. त्याचा हा प्रदर्शित होणारा सिनेमा देखील अशाच जवळच्या नात्यांवर आधारित आहे. फसक्लास दाभाडे या चित्रपटाची कथा ही तीन भावंडांवर आधारित असल्याचे समोर आलेल्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाले आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटातून अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २४ जानेवारी २०२४ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Fissclass Dabhade)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Celebrity Celebrity News Entertainment Featured Marathi Movie फसक्लास दाभाडे सिद्धार्थ चांदेकर सिद्धार्थ चांदेकर कविता सिद्धार्थ चांदेकर पोस्ट सिद्धार्थ चांदेकर व्हिडिओ
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.