Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Siddharth Jadhav : अर्थशास्त्राच्या पेपरला सिद्धार्थ जाधवनं काढलं ‘या ‘ अभिनेत्याचं चित्र!
आपल्या दमदार अभिन. आणि तुफान एनर्जीने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपलं वलय निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव (Siddharth jadhav). एकांकिका ते चित्रपट असा प्रवास करणाऱ्या सिद्धार्थचं बालपण तसं हलाखीतच गेलं. अनेक मुलाखतीमध्ये त्याने परळ-लालबाग जिथे तो लहानाचा मोठा झाला तिथल्या आठवणी त्याने सांगितल्या आहेतच. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या अभ्यासाचा एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. काय आहे तो रंजक किस्सा वाचाच.. (Marathi movies)
सिद्धार्थ जाधवने मुलाखतीत १२वीच्या परीक्षेची एक भन्नाट आठवण सांगितली आहे. सिद्धार्थ म्हणाला की,, ” बारावीची परीक्षा सुरू होती. रात्रभर जागून इतिहासाचा अभ्यास केला होता. मात्र सकाळी जेव्हा पेपरला गेलो तेव्हा त्याला कळलं की, आज अर्थशास्त्र या विषयाची परीक्षा आहे. हे समजताच माझा पुरता गोंधळ उडाला. पेपर दुपारी ३ चा होता आणि मी सकाळी ११ वाजताच परीक्षा केंद्राबाहेर पोहोचलो. मग एका मित्राच्या घरी गेलो आणि ऐनवेळी थोडा अभ्यास केला”.(Bollywood news)

सिद्धार्थ तसा अभ्यासात जरा मागे असला तरी अभिनयाच्या वर्गात त्याचा नक्कीच पहिला क्रमांक येतोच. २००७ मध्ये बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटातून सुरु झालेल्या सिद्धार्थ जाधवचा अभिनय प्रवास त्याला रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरीजपर्यंत घेऊन आला आहे. नुकताच त्याचा ‘आता थांबायचं नाय’ या मराठी चित्रपट प्रदर्शित झाला असून बऱ्याच वर्षांनी सिद्धार्थ आणि भरत जाधव(Bharat Jadhav) एकत्र दिसले आहेत. आगामी काळात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि अंकुश चौधरी यांचा एखादा चित्रपट यावा आणि त्याचं दिग्दर्शन पुन्हा एकदा केदार शिंदे यांनी करावं अशी अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. (entertainment)
======================================
हे देखील वाचा: Amitabh Bachchan : ….आणि नीना कुळकर्णींसाठी संपूर्ण टीमला बच्चन साहेबांनी समजावलं!
=======================================
सिद्धार्थने आत्तापर्यंत ‘जत्रा’, ‘साडे माडे तीन’, ‘दे धक्का’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘शिक्षणाचा आयचा घो’, हुप्पा हुय्या’, ‘इरादा पक्का’, ‘टाईम-प्लीज’, ‘प्रियतमा’, ‘कुटुंब’, ‘येरे येरे पैसा’, ‘शासन’, ‘शिकारी’, ‘नवरमाझा नवसाचा २’, ‘राधे’, ‘गोलमाल’, ‘सर्कस’, ‘सिंबा’ अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. (Siddharth jadhav movies)