
गौरव अमुलची काळजी कशी घेणार?; लवकरच Single Papa 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार
अभिनेता-दिग्दर्शक कुणाल खेमू (Kunal Khemu) याने आजवर विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतीच त्याची ‘सिंगल पापा’ (Single Papa) ही वेब सीरीज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती. सिंगल पेरेंटच्या काळात या सीरीजने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं. आणि आता लवकरच या सीरीजचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला य़ेणार आहे. जाणून घेऊयात त्याबद्दल…

‘सिंगल पापा’ या वेबसीरिजची कथा एका अशा माणसाची आहे ज्याला वडिल होण्याची इच्छा असते आणि पालक होण्यासाठी तो या महत्वाच्या जबाबदारीसाठी कसा तयार होतो, लोकांच्या नजरेत सिंगल आई जसं आपल्या मुलाला एकटी वाढवू शकते अगदी त्याचप्रमाणे लोकांच्या नजरेत ‘सिंगल पापा’ ही संकल्पना तो कसा रुजवतो याची ही कथा आहे.(Web Series On Netflix)
================================
हे देखील वाचा : Shashank Ketkar नंतर ‘या’ कलाकारांनीही केली मंदार देवस्थळींची पोलखोल
================================
प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानंतर आता नेटफ्लिक्सने ‘सिंगल पापा २’ येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे आता प्रेक्षक आतुरतेने दुसऱ्या सीझनची वाट पाहात असून गौरव अमुलची काळजी कशी घेणार हे पाहण्यासाठी उस्तक आहेत. दरम्यान, सिंगल पापा या सीरीजमध्ये कुणाल खेमूसोबतच प्राजक्ता कोळी (Prajakta Koli), मनोज पाहवा, आयेशा रझा, नेहा धुपिया, सुहेल नय्यर, दयानंद शेट्टी, आयेशा अहमद आणि ईशा तलवार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. (Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi