Bollywood Movies : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांचं झालंय

Son Of Sardaar 2 Trailer: अजय देवगनच्या हटके कॉमेडीने चाहते खूश, २५ जुलैला सिनेमा चित्रपटगृहात धडकणार!
Son Of Sardaar 2 : २०१३ साली आलेल्या सुपरहिट कॉमेडी फिल्म ‘सन ऑफ सरदार’नंतर तब्बल १३ वर्षांनी अजय देवगन पुन्हा जस्सीच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर परततोय. या चित्रपटाचा दमदार सिक्वल ‘सन ऑफ सरदार 2’ चा ट्रेलर आज ११ जुलै रोजी प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय.ट्रेलरच्या काही दिवस आधी अजय देवगनने ‘सन ऑफ सरदार 2’चा पोस्टर आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता. या पोस्टरमध्ये चित्रपटातील सर्व स्टारकास्ट झळकत आहेत. अजयने पोस्टर शेअर करत म्हटलं होतं ,“पाजी! २ दिवसांनंतर ‘इम्पॉसिबल’लाही लागणार क्लास… ‘सन ऑफ सरदार 2’चा ट्रेलर ११ जुलैला येतोय. चित्रपट २५ जुलैला थिएटरमध्ये!” या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये ट्रेलरसाठी उत्सुकता आणखीच वाढली होती.सुमारे २ मिनिटं ५९ सेकंदांचा हा ट्रेलर अजय देवगनच्या धम्माल कॉमेडीने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो. सुरुवातीचे ३८ सेकंद फक्त अजयच्या जबरदस्त पंचेस आणि संवादांनी सजलेले आहेत. नेहमी गंभीर भूमिकांमध्ये दिसणारा अजय इथे अगदी वेगळ्याच अवतारात कॉमेडी करताना पाहायला मिळतो. (Son Of Sardaar 2 Trailer)

अभिनेते रवि किशन, दीपक डोबरियाल देखील आपल्या भूमिकांमध्ये खुलून आले आहेत. मात्र यामध्ये खास लक्ष वेधून घेतलं ते संजय मिश्रा यांनी. त्यांचा “बेबे फोल्ड हो गई…” हा डायलॉग सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय आणि चाहत्यांना खळखळून हसवतोय.चित्रपटात अजय देवगनसोबत मृणाल ठाकूर आणि नीरू बाजवा मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर या सिनेमात एक भलीमोठी स्टारकास्ट पाहायला मिळतेय.

संजय मिश्रा, दीपक डोबरियाल, चंकी पांडे, कुब्रा सैत, विंदू दारा सिंग, शरत सक्सेना, अश्विनी कालसेकर, रोशनी वालिया आणि साहिल मेहता यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात विशेष म्हणजे दिवंगत अभिनेते मुकुल देव देखील झळकणार असून, ही त्यांची शेवटची फिल्म असणार आहे. अजय देवगनच्याच प्रॉडक्शनअंतर्गत बनलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक पूर्णपणे मनोरंजनाचा तडका ठरणार असल्याची चर्चा आहे.
==============================
==============================
‘सन ऑफ सरदार 2’ २५ जुलै २०२५ रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अजय देवगनचा फॅन बेस पाहता, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करणार, असा विश्वास प्रेक्षकांना वाटतोय. अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे, “फर्स्ट डे फर्स्ट शो नक्की पाहणार!”