
Sonali Kulkarni : “मी सतत त्यांच्याकडे पैसे…”, सोनालीच्या बालपणीचा संघर्ष
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही गेले अनेक वर्ष काम करत असणारी सोनाली कुलर्णी म्हटलं की दिल चाहता है चित्रपट सर्वात आधी डोळ्यांसमोर उभा राहतो. आजवर अनेक चित्रपटांतून सातत्याने विविधांगी भूमिका प्रेक्षकांना देणाऱ्या सोनाली कुलकर्णी यांचं बालपण मात्र फारच हलाखीचं होतं. घराची आर्थिक परिस्थिती बिकट असूनही स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभी राहात आज त्यांनी आपलं नाव इंडस्ट्रीमध्ये कमावलं आहे. आज जरी सोनाली कुलक्रणी यशाच्या शिखरावर दिसत असल्या तरी लहानपणीच त्यांच्या संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा आहे. (Sonali Kulkarni)

सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) यांनी आपल्या संघर्षाची कहाणी’सुमन म्युसिक मराठी’ यांच्या ‘आम्ही असं ऐकलंय’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितली. यावेळी बालपणीच्या संघर्षाबद्दल सांगताना सोनाली म्हणाल्या, ‘मी खूप लहान होते. तुटक्या चपला, एक फ्रॉक, कापडी पिशवी आणि मी तासंतास त्यांच्या दारापाशी उभी असायचे की, ते बघतील आणि मी म्हणायचे की, काका आईने सांगितलं की, पैसे बाबांच्या पगारातले द्याल का? मी खूप लहान होते आणि त्यांच्या घरातले चाललेले सगळे व्यवहार दिसले होते की, ते कसे कलर टीव्ही बघतात, त्यांच्याकडे फोन आहे, त्यांच्याकडे फर्निचर आहे, ते ब्रेड जॅम खातात आणि मी त्यांच्या फाटकापाशी उभी आहे.’ (Bollywood gossip)
===========
हे देखील वाचा : Chhaava : चित्रपटातील एका गाण्यात दिसले प्रभू श्रीराम आणि मारुतीराय
===========
पुढे त्या म्हणाल्या, “मी सतत अशी त्यांच्याकडे जायचे पैसे मागायला. कारण, माझे बाबा वेगवेगळ्या ठिकाणी काम करायचे आणि त्यांना त्या व्यवसायामध्ये खूप विचित्र पद्धतीने फसवलं गेलं होतं. मला ती गोष्ट मनाला लागली की, माणसांनी आपल्या पायावर समर्थपणे उभं असलं पाहिजे त्यामुळे त्या काळात मी मनाशी पक्क केलं की असे कष्ट करेन की, जेणेकरून माझ्याकडे पुरेसे पैसे असतील आणि माझ्या मित्र मैत्रिणींना असं वाटेल की, सोनाली आहे ना! मग काही काळजी नाही.'(Entertainment news)
सोनाली कुलकर्णी यांनी केवळ हिंदी, मराठीच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपली पकड मजबूत केली आहे. काही तमिळ चित्रपटात त्यांनी काम केलं असून लवकरच त्या तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. ‘The Paradise’असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीकांत ओडेला यांनी केलं आहे. याशिवाय, आत्तापर्यंत ‘दिल चाहता है’, ‘गुलाबजाम’, ‘देऊळ’, ‘कच्चा लिंबू’, ‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ यांसारख्या अनेक गाजलेल्या हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (Sonali Kulkarni movies)