
“तो जायच्या आधी त्याच्यासोबत ४-५ वर्ष मी चित्रपट… ”; सोनिया परचुरे Atul Parchure यांच्या आठवणीत भावूक…
मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटविश्वातील अष्टपैलु अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं १४ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झालं… बरेच वर्ष सुरु असणारी त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली… बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची सुरुलात रंगभूमीपासून करणाऱ्या अतुल यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नुकताच एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता…यावळी त्यांची पत्नी सोनिया परचुरे यांना बोलताना अगदी गहीवरून आले. त्या संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोनिया परचुरे यावेळी म्हणाल्या की, “माझं या सगळ्या रंगमंचाशी नातं जोडलं ते अतुल मुळेच. त्यामुळे अतुल नसताना मला कुठल्याच थिएटरमध्ये अजूनही जावसं वाटत नाही. पण त्याच्यासाठी तुम्ही सगळे जण आलात याबद्दल मला फारच चांगल वाटत आहे. ३० वर्षांमध्ये जो मी एक अतुल बघितला तो आणि आता तो नसताना मी जो अतुल बघतेये तो एक वेगळाच अतुल आहे. कारण त्याच्याविषयी इतकं सगळेजण बोलतायत , त्याचं मित्र प्रेम…. तो जायच्या आधीचे चार-पाच वर्ष मी एकही सिनेमा त्याच्यासोबत पाहिला नाही; कारण त्याने सर्व सिनेमे त्याच्या मित्रांसोबत पाहिलेले असायचे. पण आम्ही दोघे एकमेकांचा खूप रिस्पेक्ट करायचा. त्याची एवढी मैत्री होती”…

पुढे सोनिया म्हणाल्या की, “आपल्याला वाटणं आणि एखादी गोष्ट जाहीरपणे सांगणं यामध्ये फरक आहे. त्यासाठी खूप मोठं धाडस लागतंअतुल जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा तो सतत मला सांगायचा की तू सुनीलशी बोलली आहेस ना वगैरे. कारण त्याचं नाटक चालू होतं. शेवटपर्यंत त्याची नाटकाशी नाळ जोडलेली. तो सतत नाटकाबद्दलच बोलायचा. त्यामुळे आज त्याच्यासाठी आलेल्या मित्र मंडळींचे विशेष आभार”…
================================
================================
अतुल परचपरे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये कामं केली होती…. खट्टा मिठा, आवारापन, ऑल द बेस्ट, तुमसा नही देखा, पार्टनर, फिर भी दिल है हिंदुस्थानी अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे अतुल पु. लं देशपांडंच्या साहित्याचे निस्सीम भक्त होते…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi