Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ajay Devgan : “ही ऑस्कर लेवलची कोरिओग्राफी कोणी केली?”; ‘सन

सुपरस्टार Dev Anand पाहायचे ‘हा’ मराठी कार्यक्रम!

Dashavatar : मराठी चित्रपट ‘दशावतार’च्या फर्स्ट लूकला जागतिक स्तरावर पसंती; अमेरिकन यूट्यूबर्सने

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Promo: पुन्हा एकदा दिसणार

‘Chala Hava Yeu Dya 2′ च्या नव्या होस्टसाठी श्रेया बुगडेची खास

Ramayana : साई पल्लवीच्या भूमिकेबद्दल काय म्हणाल्या टेलिव्हिजनच्या ‘सीता माता’?

Dev Anand : ….तसं झालं असतं तर देव आनंद ‘तिसरी

Satyabhama Movie : सती प्रथेवर आधारलेला ‘सत्यभामा’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

OTT Release July :Special Ops 2 ते ‘आप जैसा कोई’;

Kantara Chapter 1 : ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’चं पोस्टर रिलीज; रुद्रावताराने

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sridevi : झुरळाला दारू पाजून शेखर कपूरने हा शॉट घेतला!

 Sridevi : झुरळाला दारू पाजून शेखर कपूरने हा शॉट घेतला!
बात पुरानी बडी सुहानी

Sridevi : झुरळाला दारू पाजून शेखर कपूरने हा शॉट घेतला!

by धनंजय कुलकर्णी 15/03/2025

सिनेमाचे चित्रीकरण करतांना कधी कधी अनपेक्षितपणे काही अडचणी येतात पण त्यावर काही गमतीशीर मार्ग देखील काढले जातात आणि यातूनच तो शॉर्ट ओके होतो. असाच काहीसा प्रकार शेखर कपूर दिग्दर्शित ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री श्रीदेवी (sridevi) एका झुरळाला घाबरते असा शॉट होता. श्रीदेवी घाबरून त्या कॉक्रोचकडे पाहत राहते आणि छोटी मुले तिला या संकटातून वाचवतात असा तो शॉट होता.

सुरुवातीला शेखर कपूर यांना हा शॉट सहज शूट करता येईल असे वाटले. परंतु कॉक्रोच एका जागी स्थिर राहत नव्हते. वारंवार रिटेक होत होते. ॲक्शन म्हटलं की कॉक्रोच भुरकन पळून जायचे! या शॉटमध्ये एकदा श्रीदेवी (sridevi) त्या कॉक्रोचकडे पाहते आणि कॉक्रोच देखील त्याच्या छोट्या डोळ्यातून श्रीदेवीकडे रागाने पाहतो हा शॉट होता. त्याच्या डोळ्याकडे पाहून श्रीदेवी आणखी घाबरते. या शॉटची डिमांड अशी होती की तो क्लोजमध्ये घ्यायचा होता. झुरळाच्या डोळ्यातील रागीट भाव बघून श्रीदेवी आणखी घाबरते असा तो प्रसंग होता.

अशा प्रसंगात कॉक्रोचने एका जागी स्थिर राहणे गरजेचे होते. पण कॉक्रोच शेवटी कॉक्रोच. तो काही अभिनेता नाही. फ्रिज म्हणले की शांतपणे उभा राहिल. त्यामुळे कॉक्रोच इकडून तिकडे पळत होते. लहान मुलांचे मनोरंजन होत होते. पण शॉट काही केल्या होत नव्हता. शेखर कपूरने एका डब्यामध्ये बरेच कॉकरोच भरून आणले होते. अनेक कॉक्रोच ट्राय करून पाहिले. पण कुणीही मनासारखा शॉट देत नव्हतं. चित्रपटाचे कोरिओग्राफर होते बाबा आजमी! ते देखील दमून गेले होते. कारण सकाळपासून काही केल्या हा एकच शॉट जमत नव्हता. काय करायचे? एका झुरळाने संपूर्ण युनिटला वात आणला होता. (sridevi)

शेवटी शेखर कपूर यांनी एक आयडिया केली. त्यांनी आपल्या असिस्टंटला बोलवून त्यांना हा शॉट घेण्यासाठी एक जुगाड करायला सांगितला. सर्वांनी तो जुगाड ऐकून हसण्यावारी नेले त्यांना वाटले शेखर कपूर मजाक करत आहेत. परंतु शेखर कपूर सिरीयस होते. त्यांनी एक ग्लास मागवला. त्यात कॉक्रोचला सोडले. वरून रमचे तीन चार थेंब टाकले. धावपळ केल्यामुळे कॉकरोच तहानलेला होताच. त्याने पटकन ती रम पिऊन टाकली. शेखर कपूरने आणखी थोडी रम टाकली ती रम देखील झुरळाने पिऊन टाकली! आता कॉकरोचला ती रम आवडू लागली. तो आणखी रम हवी म्हणून वर पाहू लागला. शेखरने आणखी रम टाकली असे करून दोन-तीन चमचे रम कॉक्रोचच्या पोटात गेली.

==========

हे देखील वाचा : Kishore Kumar यांनी गायलेल्या गाण्याच्या मेकिंगचा रंजक किस्सा!

==========

आता या मद्यपानाचा असर त्याच्या शरीरावर दिसू लागला. तो भयंकर लीथार्जिक झाला, डुलत डुलत फिरू लागला आणि एका जागी सुस्त झाला! आता रमचा पुरता अंमल त्याच्यावर चढला होता. छायाचित्रकार बाबा आजमीला हाच शॉट हवा होता. त्याने लगेच हा शॉट पूर्ण केला! झिंगत झिंगत झुरळ बाहेर निघून गेले. शॉट ओके झाला. कधी कधी देशी जुगाड काम करून जातात. कॉक्रोचला रम पाजण्याचा शेखर कपूर यांचा जुगाड कमालीचा यशस्वी झाला. आता तुम्ही जेव्हा मि. इंडिया पाहाल तेव्हा हा शॉट पाहताना हा जुगाड नक्की आठवा.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat Celebrity Celebrity News Entertainment Featured Mr. India shekhar kapoor Sridevi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.