Mandakini : नेपोटिझमच्या शर्यतीत मंदाकिनीच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या…

Sridevi : ‘या’ सिनेमातील ‘तांडव’ नृत्य करायला श्रीदेवी का तयार नव्हत्या ?
आपल्या नृत्यनिपुण कौशल्यामुळे साउथ आणि हिंदी सिनेमाचा पडदा गाजवणाऱ्या श्रीदेवी (Sridevi) चे अनेक डान्स परफॉर्मन्स हिंदी सिनेमामध्ये प्रचंड गाजले. नगीना चित्रपटातील ‘मै तेरी दुश्मन तू दुश्मन मेरा’ असेल किंवा ‘हवा हवाई’ हा मि. इंडिया परफॉर्मन्स किंवा ‘एक दो तीन’ हा तेजाबचा… १९८९ साली पंकज पराशक दिग्दर्शित ‘चालबाज’ (Chaalbaaz) हा चित्रपट आला होता.

श्रीदेवी (Sridevi) च्या करीअरमधील हा एक महत्त्वाचा सिनेमा होता. कारण या सिनेमात पहिल्यांदा श्रीदेवी डबल रोल करत होती. हेमा मालिनीच्या ‘सीता और गीता’ या चित्रपटाचा तो रिमेक होता. श्रीदेवी ज्या ज्या वेळेला सिनेमांमध्ये डान्स परफॉर्मन्स देत असे त्यावेळी तो डान्स त्या सिनेमातील व्यक्तिरेखेला पूरक आहे की नाही याची ती कायम काळजी घ्यायची. विनाकारण कुठलाही डान्स व्यक्तिरेखेच्या इमेजला बाधक असा करत नव्हती. त्यामुळेच तिचा प्रत्येक डान्स परफॉर्मन्स हा त्या व्यक्तिरेखेचा एक भाग वाटत असायचा.
‘चालबाज’ या चित्रपटामध्ये श्रीदेवी (Sridevi) ने एक तांडव नृत्य केले होते. खरंतर हे तांडव नृत्य त्या व्यक्तिरेखेसाठी योग्य नाही असे तिला वाटत होते कारण या चित्रपटांमध्ये श्रीदेवीने ज्या दुहेरी भूमिका केल्या होत्या त्यातील अंजू ही कायम दबून राहिलेली, घाबरलेली आणि कायम भीती खाली वावरणारी मुलगी दाखवली होती. तर मंजू ही बंडखोर मारामारी करणारी अरेला कारे करणारी अशी मुलगी दाखवली होती.

चित्रपटात हा तांडव परफॉर्मन्स अंजू या कॅरेक्टरवर चित्रित होणार होते. पण यासाठी श्रीदेवी (Sridevi) तयार नव्हती. ती म्हणाली, “यातील हतबल दुर्बल अंजू हा तांडव परफॉर्मन्स कसा देऊ शकेल? पुन्हा या परफॉर्मन्सच्या शेवटी मला Anupam kher च्या थोबाडीत मारायचे आहे! संपूर्ण सिनेमात अनुपम खेरला पाहून थरथर कापणारी अंजू त्याच्या श्रीमुखात कशी काय लगाऊ शकते?” असा तिचा सवाल होता. पण दिग्दर्शक पंकज पराशर यांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन होता. तिचे या गाण्यातून ट्रान्सफॉर्मेशन दाखवायचे होते.
ते श्रीदेवी (Sridevi) ला कन्व्हेन्स करताना म्हणाले की, “अंजू ही उत्तम नर्तक आहे. शिवा नटराज यांचा तिच्यात वास आहे आणि पार्टीमध्ये तिला कोणीतरी ओढून आणते आणि डान्स करायला लावते. आपण असा सिक्वेन्स तयार करू. मी कॅमेरा पहिल्यांदा नटराज मूर्तीवर झूम करेल. त्यानंतर मृदुंगाचा आवाज येईल. नंतर कॅमेरा तुझ्या चेहऱ्याच्या हालचाली टीपेल आणि तुझा डान्स सुरू होईल! शिव तुझ्या शरीरात प्रवेश करून तांडव करतील!” कोरिओग्राफर सरोज खान श्रीदेवीच्या डान्स स्टेप्स बसवणार होत्या.
हा एक इन्स्ट्रुमेंटल परफॉर्मन्स होता. पण सिनेमाच्या कथानकाला वळण देणारा असा परफॉर्मन्स होता. श्रीदेवी (Sridevi) ने यामध्ये बेफाम डान्स केला होता. संपूर्ण चित्रपटात घाबरलेली अंजू यामध्ये डान्स करताना तिच्यातील चेंज ओव्हरला मोठ्या सामर्थ्याने पुढे आणते. या तांडव नृत्याच्या शेवटी श्रीदेवी अनुपम खेरच्या थोबाडीत मारते हा शॉट अनुपम खेरने रीयल वाटावा म्हणून खरी खुरी थप्पड मारायला लावली. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट खूप चांगला दिसून आला.

‘चालबाज’ हा सिनेमा सुपर डुपर हिट झाला. याच वर्षी Sridevi चा ‘चांदनी’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. यात देखील तिचा इन्स्ट्रुमेंटल परफॉर्मन्स होता. ‘चांदनी’ आणि ‘चालबाज’ या दोन्ही सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. पुरस्कार तिला ‘चालबाज’च्या भूमिकेसाठी मिळाला.
===========
हे देखील वाचा : Lucky Ali : लकी अलीचा पहिला म्युझिक अल्बम ‘सुनो’…
===========
दिग्दर्शकाने आणि सरोज खानने व्यवस्थित कन्विन्स केल्यामुळे श्रीदेवीचा तांडव नृत्य प्रकार प्रेक्षकांना पाहायला मिळाला अर्थात व्यक्तिरेखेच्या मर्यादित राहून डान्स परफॉर्म करण्याची श्रीदेवीची स्टाईल खरोखरच ग्रेट होती! या सिनेमात सनी देओल आणि रजनीकांत तिच्या नायकाच्या भूमिकेत होते. ‘न जाने किधर से आयी है न जाने किधर को जायेगी ये लडकी…’ हा तिचा डान्स परफॉर्मन्स जबरदस्त होता. (Sridevi)