Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Shah Rukh Khan याला ‘किंग’च्या सेटवर दुखापत; थेट अमेरिकेला झाला रवाना!
सध्या बॉलिवूडचा किंग खान आगामी ‘किंग’ चित्रपटाच्या शुटींगमंध्ये व्यस्त आहे… याच चित्रपटाच्या सेटवर एक अॅक्शन सीन शुट करताना शाहरुख खानला दुखापत झाली आहे.. नेमकी त्याला दुखापत काय झाली आहे हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून त्याला उपचारासाठी मात्र तातडीने अमेरिकेला घेऊन जाण्यात आले आहे… मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये शूटिंग करत असताना शाहरुख सोबत हा अपघात झाला आहे…

दरम्यान, काही मिडिया रिपोर्टनुसार,शाहरूखला झालेली दुखापत गंभीर नसल्याचं म्हटलं जात आहे. परंतु ही दुखापत त्याच्या स्नायूंना झाल्याचं सांगण्यात आलं आहे. यापूर्वी देखील बऱ्याच चित्रपटाचं शुटींग करताना किंवा स्टंट करताना शाहरुख खानच्या स्नायूंना दुखापत झाली आहे. तसेच, उपचारासाठी आता शाहरुख खान याला किती वेळ जाईल याची निश्चित माहिती न समजल्यामुळे किंग चित्रपटाचं शुटींग वेळापत्रक पुढे ढकलण्यात आलं आहे…
================================
=================================
‘किंग’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर शाहरुख खान या चित्रपटात त्याची मुलगी सुहाना सोबत झळकणार आहे… या चित्रपटात अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण, अर्शद वारसी, जयदीप अहलावत, राघव जुयाल आणि सौरभ शुक्ला यांसारखे स्टार्स देखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. ‘किंग’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अधिकृतपणे जाहीर केली नसली तरी, हा चित्रपट २०२६ मध्ये चित्रपटगृहात दाखल होऊ शकतो असे सांगितले जात आहे….
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi