Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Suneil Shetty : “इथे राहतो म्हणजे मराठी बोलता आलीच पाहिजे”!
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी-हिंदी भाषेचा वाद सुरु होता… त्यातच राज्य सरकारने शाळेत इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण समिती लागू केल्यानंतर एक नवा वाद पेटला होता.. मात्र, राज्य सरकारने हे धोरण मागे घेतले असून हिंदी भाषेची सक्ती नसणार आहे… अशातच आता अभिनेता सुनील शेट्टी (Suneil Shetty) याने मराठी भाषेबद्दल महत्वाचं विधान केलं असून माझी कर्मभूमी मुंबई असल्यामुळे इथे राहून मला मराठी बोलता आलंच पाहिजे असं मत त्याने व्यक्त केलं आहे.(Entertainment)

सुनील शेट्टी याने नुकतेच शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं, यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्याने मराठी भाषेबद्दल आपलं परखड मत मांडलं आहे… सुनील म्हणाला की,माझी जन्मभूमि कर्नाटका आहे पण कर्मभूमी मुंबई आहे. त्यामुळे मी ज्या शहरात राहतो, तिथली भाषा, संस्कृती समजून घेणं आणि तिचा सन्मान करणं हे माझं कर्तव्य आहे. मराठी ही खूप सुंदर भाषा आहे आणि मला ती येणं आवश्यक आहे.”(Marathi Entertainment News)
================================
हे देखील वाचा: Suneil Shetty : सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपट नाकारला होता पण….
=================================
दरम्यान, सुनील शेट्टी याने मराठी भाषेचं केलेलं कौतुक आणि मराठी भाषा आलीच पाहिजे असा व्यक्त केलेला अट्टाहास लोकांकडून दाद मिळवत आहे. ३०-४० वर्षांपेक्षा अधिक काळ खरं तर आपल्या अभिनयाने गाजवणारा सुनील शेट्टी आगामी कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसेल याची त्याच चाहते नक्कीच वाट पाहात आहेत…(Bollywood)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi