Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Suniel Shetty : बॉलिवूडच्या ॲक्शन हिरोचा अभिनय प्रवास…
कलाकार म्हटलं की कुठल्यातरी ‘कॉंट्रोव्हर्सी’ मध्ये त्याचं नाव येणं किंवा त्याने काहीतरी असं विधान करणं ज्याच्या बातम्या फ्रंट पेडला झापल्या जातील… मात्र, बॉलिवूडमधला एक असा कलाकार आहे जो या सगळ्या वादांपासून कायम लांब राहिला आणि केवळ आपल्या चित्रपटांमधून आणि सामाजिक कार्यातून लोकांच्या मनात जागा निर्माण करत राहिला… तो अभिनेता म्हणजे सुनील शेट्टी (Suniewl Shetty)… आज त्याच्या वाढदिवशी जाणून घेऊयात सुनील शेट्टीचा अभिनय प्रवास…(Bollywood News)

जेव्हा सुनील शेट्टी याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली तेव्हा त्याचा लूक हिरोसारखा बिलकूल नव्हता… त्याच्यासमोर सलमान खान, अक्षय कुमार, अनिल कपूर असे देखणे हिरो होते.. त्यामुळे सुनील शेट्टीला आपलं वर्चस्व बॉलिवूडमध्ये निर्माण करण्यासाठी जरा वेळ गेला… सुनील शेट्टी याच्याकडे ना चेहरा होता ना नृत्याचं अंग, पण हळूहळू का होईना इंडस्ट्रीत तो स्थिरावत गेला… १९९२ साली ‘बलवान’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं… तेव्हा त्याची हिरोईन होती गोड चेहऱ्याची दिव्या भारती. हा चित्रपट तसा फारसा चालला नाही पण सुनील शेट्टी प्रेक्षकांच्या लक्षात राहिला…(Entertainment News)

‘बलवान’ चित्रपटानंतर सुनील शेट्टी याने आपल्या अभिनयात जरा सुधारणा करत ‘दिलवाले’, ‘मोहरा’ हे चित्रपट केले आणि स्वत:ला सिद्ध केलं… १९९७ मध्ये आलेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटाने सुनील शेट्टीला एक ओळख मिळवून दिली… त्यानंतर Early 20’s मध्ये सुनील शेट्टीचे काही हिट काही फ्लॉप चित्रपट येत होतचे पण २००० मध्ये आलेल्या ‘हेरा फेरी’ चित्रपटाने तर सुनीलचं नशीबच पालटलं… परेश रावल, अक्षय कुमार यांच्यासोबतचा त्याचा अभिनय खणखणीत वाजला आणि प्रेक्षकांच्या हिरोच्या लिस्टमध्ये सुनील शेट्टी देखील दाखल झाला…(Suniel Shetty Movies)

‘मे हु ना’, ‘हुतुतू’, ‘भाई’, ‘काटे’, ‘LOC कार्गिल’, ‘चुपचुपके’, ‘पहेली’, ‘हलचल’ असे बरेच चित्रपट आले… मात्र, ‘धडकन’ चित्रपटातील त्याने साकारलेला देव आजही ९०च्या दशकातील प्रत्येक प्रेमी तरुण रिलेट करु शकतो यात शंकाच नाही… इतकंच नाही तर ‘धडकन’ चित्रपट हा इतका हिट होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं… आणि या चित्रपटासाठी सुनील शेट्टीला सर्वोत्कृष्ट खलनायक म्हणून फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता.. शिवाय, अभिषेक बच्चन आणि करिना कपूर यांचा डेब्यु चित्रपट असणाऱ्या ‘रेफ्युजी’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी देखील त्याला नामांकन मिळालं होतं…(Latest Bollywood News)
================================
हे देखील वाचा : Suneil Shetty : सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपट नाकारला होता पण….
=================================
सुनील शेट्टी याच्या ॲक्शन भूमिकांपेक्षा गंभीर आणि विनोदी भूमिका प्रेक्षकांना अधिक भावल्या.. पुढे २००२ साली तो चित्रपट निर्मिती क्षेत्रातही उतरला… सुनील शेट्टीचे वडिल एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करत होते.. अतिशय कष्टाने आपल्या पालकांनी लहानाचं मोठं केल्याची भावना सुनीलच्या मनात कायम होती.. आणि म्हणूनच इंडस्ट्रीत आर्थिक स्थैर्य आल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये वडिल काम करत होते की बिल्डींग सुनील शेट्टीने विकत घेतती… आज मुंबईसह बऱ्याच ठिकाणी सुनीलचे हेटल व्यवसाय आहेत.. त्यामुळे एक उत्तम अभिनेत्यासोबत तो यशस्वी बिझनेसमॅन देखील आहे… बॉलिवूडमध्ये ३० वर्षांपेक्षा अधिक काळ सातत्याने विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सुनील शेट्टी याला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi