Bobby Deol ‘या’ अभिनेत्रीच्या होता प्रेमात; ५ वर्षांचं रिलेशनशिप, लग्नही

Sanjay Dutt याने वडिलांच्याच विरोधात सुनील शेट्टीला प्रचार करायला सांगितले आणि…
४० वर्षांपेक्षा अधिक काळ बॉलिवूडमध्ये टिकून राहणाऱ्या बऱ्याच अभिनेत्यांपैकी २ नावं आहेत ती म्हणजे संजय दत्त (Sanjay Dutt) आणि सुनील शेट्टी (Suneil Shetty)… वडिल आणि आई दोघेही सुपरस्टार असून संजय दत्त याला कायम त्याच्या अभिनयामुळे चित्रपट मिळाले.. तर, सुनील शेट्टी याला कुणीही गॉफादर नसल्यामुळे त्याने स्वत:च्या मेहनतीवर आपलं स्थान इंडस्ट्रीत तयार केलं… नुकतीच या दोन्ही अभिनेत्यांनी नेटफ्लिक्सवरच्या कमिप शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती.. यावेळी अनेक जुन्या आठवणींना दोघांनी उजाळा देत एका पॉलिटिकल प्रचाराचा खास किस्सा सांगितला होता… जाणून घेऊयात त्याबद्दल…(Bollywood News)

तर, नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये सुनील शेट्टी आणि संजय दत्त आले होते.. यावेळी दोघांनी एकमेकांसमोत शुटींग करतानाचे अनेक मजेशीर किस्से सांगितले… यावेळी संजय दत्त याने चक्क वडिल सुनील दत्त यांच्याच विरोधातील एका रॅलीमध्ये सहभाग घेतला होता… याबद्दल सुनील दत्त म्हणाला की, “संजय दत्तला राजकीय पक्षातील मित्राचा फोन आला. तो मित्र सुनील दत्त ज्या राजकीय पक्षात होते, त्याच्या विरोधी पक्षातील होता. त्याने संजय दत्तला फोन करून सांगितले की निवडणुका आहेत, त्यासाठी तुम्ही माझ्यासाठी प्रचार करायला या. ती व्यक्ती सुनील दत्त (Sunil Dutt) यांच्या विरोधात निवडणुकीसाठी उभी राहिली होती हे आधी संजयला माहितच नव्हतं… त्यामुळे संजयने त्याला होकार दिला.”
सुनील शेट्टीचे बोलणे ऐकूण संजय दत्त यावर म्हणाला की, “मी विसरलो होतो”. पुढे किस्सा सांगताना सुनील शेट्टी पुढे म्हणाला की, “प्रचाराचा दिवस जवळ आला, त्यावेळी संजय दत्तच्या लक्षात आलं की ही व्यक्ती तर माझ्याच वडिलांच्या विरोधात निवडणुकीत उभी राहिली आहे. त्यावेळी संजय दत्तने मला फोन केला आणि अण्णा मी ज्या ठिकाणी प्रचारासाठी जाणार होतो, तिथे माझ्याऐवजी तुम्ही जाणार आहात, असं मी कळवलं आहे. त्यावर मी संजयला म्हणालो की मी प्रचारासाठी जातो.” (Bollywood Retro News)
====================================
हे देखील वाचा : ‘कोमा’त गेलेल्या नर्गिसला सुनील दत्त ने परत आणले!
====================================
पुढे सुनील म्हणाला, “प्रचार करून आल्यानंतर रात्री आमच्या दोघांचे जवळचे मित्र नितीन मनमोहनजी यांचा फोन आला. ते मला म्हणाले की, दत्त साहेब तुम्हाला बोलवत आहेत. मी विचारले की कोणता दत्त बोलवत आहे? त्यावर ते म्हणाले की सुनील दत्त बोलवत आहेत. मी म्हणालो की सुनील दत्त मला का बोलवत आहेत? त्यावर ते म्हणाले की, तुम्ही ज्या प्रचारासाठी गेला होता, तो माणूस त्यांच्या विरोधात आहे.. मी दत्त साहेबांना भेटायला गेलो… ते मला ते म्हणाले की, मी समजू शकतो तुम्ही मित्र आहात, पण माझ्याविषयीसुद्धा विचार करायला पाहिजे होता. मी मनातल्या मनात विचार करत होतो की तुमच्या मुलाने तुमचा विचार केला नाही, मी कसा करणार?”, हे सुनीलने कार्यक्रमात बोलल्यानंतर एकच हशा पिकला होता… मात्र, सुनील दत्त एक उत्कृष्ट अभिनेते तर होतेच, शिवाय त्यांचं राजकीय करिअरही फार उत्तम होतं…

दरम्यान, संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांनी ‘रुद्रा’, ‘रख्त’, ‘दस काहनिया’, ‘ब्लु’, ‘एल.ओ.सी कार्गिल’, ‘दस’, ‘प्रोब्लेम’, ‘शुटआऊट एट लोखंडवाला’, ‘देसी बॉईज’ या चित्रपटांमध्ये कामं केली आहेत.. तसेच, आगामी ‘वेलकम टु द जंगल’ (Welcome To The Jungle) या चित्रपटातही दोघं एकत्र दिसणार असून यात अक्षय कुमारही असणार आहे… (Sanjay Dutt and Suneil Shetty movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi