Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

“सलग ५ दिवस सुरूच होतं आणि सहाव्या दिवशी मी रुग्णालयात

Lata Mangeshkar आणि साहिर लुधियानवी यांच्यात का मतभेद झाले होते?

Nana Patekar आता ओटीटी गाजवणार; ‘संकल्प’ वेब सीरीज लवकरच येणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

तब्बल १६ वर्षांनंतर अभिनेत्री Suruchi Adarkar ची छोट्या पडद्यावर एंट्री; ‘या’ मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका ! 

 तब्बल १६ वर्षांनंतर अभिनेत्री Suruchi Adarkar ची छोट्या पडद्यावर एंट्री; ‘या’ मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका ! 
Actress Suruchi Adarkar
टीव्ही वाले मिक्स मसाला

तब्बल १६ वर्षांनंतर अभिनेत्री Suruchi Adarkar ची छोट्या पडद्यावर एंट्री; ‘या’ मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका ! 

by Team KalakrutiMedia 08/01/2026

Star Pravah वरील लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’ (Muramba) गेली तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. साधी कथा, भावनिक नातेसंबंध आणि दमदार अभिनय यामुळे या मालिकेने घराघरात आपलं स्थान निर्माण केलं आहे. विशेषतः रमा आणि अक्षय या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र, आता या कथेत एक महत्त्वाचं आणि अनपेक्षित वळण येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता प्रेक्षकांना रमा-अक्षयऐवजी स्वरा-अक्षय ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे. या नव्या पात्रामुळे मालिकेची कथा अधिक रंजक आणि भावनिक होणार आहे. ‘स्वरा’ ही भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) साकारणार असून, तब्बल १६ वर्षांनंतर ती स्टार प्रवाहच्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरणार आहे. (Actress Suruchi Adarkar)

Actress Suruchi Adarkar
Actress Suruchi Adarkar

स्वरा या भूमिकेबद्दल बोलताना सुरुची अडारकरने आपला आनंद व्यक्त केला आहे. ती म्हणाली की, “साधारण १६ वर्षांपूर्वी ‘ओळख’ या मालिकेमुळे मला अभिनेत्री म्हणून खरी ओळख मिळाली आणि ती मालिका देखील स्टार प्रवाहवरच होती. त्यामुळे पुन्हा एकदा या चॅनेलच्या कुटुंबात परत येताना खूप छान वाटत आहे.” स्वरा हे पात्र अतिशय सकारात्मक असून, ती सुंदर, हुशार आणि आत्मविश्वासाने भरलेली मुलगी आहे. मात्र, तिचा स्वभाव तितकाच हळवा असल्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींनीही तिच्या डोळ्यांत पाणी येतं. खरं प्रेम करणारी माणसं कधीही एकमेकांपासून दूर जाऊ नयेत, असा तिचा ठाम विश्वास आहे. याच विचारांमुळे रमा आणि अक्षयच्या नात्यात तिच्या आगमनानंतर नेमकं काय घडणार, हे पाहणं अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे.

Actress Suruchi Adarkar
Actress Suruchi Adarkar

स्वराच्या एन्ट्रीमुळे रमा-अक्षयच्या नात्यात दुरावा येणार का, की या नात्याला नवा अर्थ मिळणार, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. त्यामुळे आगामी भागांमध्ये भावनिक संघर्ष, नात्यांची गुंतागुंत आणि नवे ट्विस्ट पाहायला मिळणार यात शंका नाही. (Actress Suruchi Adarkar)

=============================

हे देखील वाचा: स्टार प्रवाहच्या ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेला सुरु होण्याआधीच ब्रेक; १२ ऐवजी ‘या’ दिवशी दाखवला जाणार पहिला एपिसोड

=============================

तेव्हा या सगळ्या घडामोडींचा साक्षीदार होण्यासाठी ‘मुरांबा’ ही मालिका पाहायला दररोज दुपारी १.३० वाजता, फक्त स्टार प्रवाहवर वाहिनीवर पाहता येईल. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment Marathi Serial Muramba Serial Star Pravah suruchi adarkar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.