
Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!
बॉलिवूडमध्ये कोणताही गॉफादर नसून आपल्या टॅलेंटवर इंडस्ट्रीत नाव कमावणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput). करिअरमध्ये उत्तम ग्रोथ सुरु असताना एकाएका १४ जून २०२० रोजी सुशांतचा आकस्मिक मृत्यू झाला आणि अवघी बॉलिवूड इंडस्ट्री हादरली. कधीच कुठल्याच गॉसिपचा भाग नसणारा सुशांत एक उत्तम नट होताच शिवाय तो अभ्यासातही टॉपर होता. अंतराळवीर होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सुशांतने स्वत:चं टेलिस्कोपही घेतलं होतं. टेलिस्कोपमधून अंतराळातील तारे पाहणारा सुशांत आज त्याच ताऱ्यांपैकी एक बनला आहे. जाणून घेऊयात त्याची प्रेरणादायी गोष्ट…(Bollywood News)

सुशांतचा जन्म २१ जानेवारी १९८६ ला पाटणा येथे झाला… लहानपणापासूनच पुस्तकी किडा असणारा सुशांत DSE परीक्षेत ७वा आला होता. पुढे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश करत त्याने पुढील शिक्षण सुरु केलं. पण कुटुंबाची आर्थिक बाजू कमकूवत असल्यामुळे सुशांतने अर्ध्यातच इंजिनिअरिंगला राम राम केला आणि फिल्मी दुनियेत एन्ट्री केली. बरं… एकीकडे अभ्यास सुरु असताना नृत्याची आवड असल्यामुळे सुशांतने शामक दावकच्या डान्स स्कूलमध्ये अॅडमिशन घेतलं होतं… त्याचं नृत्य पाहून इम्प्रेस झालेल्या शामकने सुशांतला मोठमोठ्या संधी दिल्या…(Entertainment Tadaka)

एकीकडे नृत्यात आपलं नाव कमावणारा सुशांत नादिरा बब्बरच्या नाटकात काम करत होता… त्यावेळी त्याला त्याची पहिली टेलिव्हिजन मालिका ‘किस देश में है मेरा दिल’ मिळाली… आणि हिंदी मालिकाविश्वात सुशात सिंग राजपूत आपलं अभिनय कौशल्य सादर करु लागला… मग आली ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) ही मालिका… या मालिकेने सुशांतचं करिअरच बदलून टाकलं… ‘पवित्र रिश्ता’ मधील मानव प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या घरातला एक सदस्यच वाटू लागला आणि त्याची लोकप्रियता दुप्पटीने वाढू लागली… ‘पवित्र रिश्ता’ मालिकेची लोकप्रियता शिगेला असताना सुशांतने मालिका सोडून चित्रपटांमध्ये नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला…आणि त्यावेळी त्याला २०१३ मध्ये ‘काय पो चे’ (Kai Po Che) चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली… या संधीचं सोनं करत बॉलिवूडमधील पदार्पण सुशांतने इतकं जबरदस्त केलं की आजही प्रत्येकाच्या तो लक्षात आहे. (Sushant Singh Rajput Career)
================================
हे देखील वाचा: Ranbir Kapoor-Alia Bhatt : बॉलिवूड कलाकारांचे रिलेशनशिप्स आणि….
=================================
दरम्यान, पहिल्याच पदार्पणात त्याने ‘काय पो चे’ सोबत ‘शुद्ध देसी रोमान्स’ (Shuddh Desi Romance) हा चित्रपटही केला… पुढे मग ‘पीके’ (PK Movie) चित्रपटाने तर इतिहासच रचला… २०१४ मध्ये आलेल्या सुशांतच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भारतात ३४०.८ कोटी आणि जगभरात ७६९.८९ कोटी कमावले होते…त्यानंतर ‘एम.एस.धोनी’ (M.S.Dhoni Movie) हा चित्रपट त्याच्या करिअरचा आणखी एक महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरला होता… पुढे ‘राबता’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’, ‘दिल बेचारा’ या चित्रपटांतही त्यानं विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली…. २०१३ ते २०२० इतकाच काळ बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करणाऱ्या सुशांतला खूप संघर्ष नक्कीच करावा लागला होता…(Sushant Singh Rajput Movies)
रसिका शिंदे-पॉल
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi