Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Maya Marathi Movie: नात्यांची निःशब्द कहाणी सांगणाऱ्या सिनेमाचे मोशन पोस्टर

SHATAK : RSS शताब्दीच्या निमित्ताने ‘शतक’ चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित!

Bai Tujha Ashirwad: स्टार प्रवाहवर नव्या मालिकेचा AI टीजर रिलीज;

Bigg Boss Marathi 6: ‘तन्वी कोलते किती बोलते’; भाऊच्या धक्क्यावर Riteish

सांज ये गोकुळी सावळी सावळी..

आई–मुलींच्या नात्याच्या नाजूक छटा उलगडणारा Tighi चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Dhanush दुसऱ्या लग्नाच्या तयारीत? घटस्फोटानंतर दोनचं वर्षांनी नऊ वर्षांनी लहान

KJVMM BOX Collection: हेमंत ढोमेंच्या चित्रपटानं राखला बॉक्स ऑफिसचा गड

“तुमच्या जिभेचा ब्रेक फेल झालाय”; रितेश भाऊंनी घेतली Tanvi Kolte

Rajesh Khanna यांच्या अॅटीट्युडला छेद देणारा किस्सा!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

तैमूर व जेहची आजी ‘बबिता’

 तैमूर व जेहची आजी ‘बबिता’
कलाकृती विशेष

तैमूर व जेहची आजी ‘बबिता’

by दिलीप ठाकूर 20/04/2024

आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला बबिता आजच २० एप्रिल रोजी ७६ वर्षांची झाली असे म्हटलं तर पटकन लक्षात येणार नाही. तैमूर व जेह यांची आजी म्हटलं तर बरेचसे संदर्भ लागत जातील. तैमूरला तर वृत्त वाहिन्यांवर व सोशल मिडियात एखाद्या सेलिब्रिटीजप्रमाणे न्यूजसाठी स्पेस मिळत राहिली. यांचे मम्मी व डॅडी (सैफ अली खान व करिना कपूर) आपल्या या दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडताहेत तोच धडाधड फ्लॅश उडत त्याची बातमी होतेय. अशा लहानपणापासूनच ‘फोकस’मध्ये असलेल्या मुलांची आजी म्हणजे बबिता.

सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या काळातील चित्रपट रसिकांच्या एका पिढीसाठी ती शोमन राज कपूरची मोठी सून…मानाचं स्थान.
रणधीर कपूरची ती नायिका, प्रेयसी आणि मग पत्नी…भूमिकेत सतत बदल. आणि तोही लक्षणीय.

आजच्या मल्टीप्लेक्स ओटीटी, ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला ती लोलो अर्थात करिश्मा आणि बेबो अर्थात करिना यांची आई म्हणून माहित आहे. आई व या दोन मुलींचे नाते अतिशय जिव्हाळ्याचे आहे हे सोशल मिडियात सतत दिसून येते…अशात बबिताचेही आपले एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे,ओळख आहे. साठच्या दशकाच्या उत्तरार्धातील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ती नावारुपास आली. आपल्या दोन्ही मुलींचे चित्रपटसृष्टीत पाऊल पडताना घेतलेले धाडसी आणि व्यावहारिक दृष्टिकोन. त्यातलं तिचं ‘असणं’ बरेच अधोरेखित होणारे. दोन्ही मुलींचे करियरची आखणी करताना बबितामधील अनुभव उपयोगात आला.
अशा बबिताच्या वाढदिवसानिमित्त काही खास गोष्टी सांगायलाच हव्यात.

एकदा मला एकेकाळचा स्टार फोटोग्राफर ‘ज्याचा कॅमेरा बोले’ अशा जगदीश माळीने सांगितलेली गोष्ट सांगतो. त्यात बबिताचा धोरणीपणा आणि आपल्या मुलींना चित्रपटसृष्टीत ‘लाॅन्च’ करण्यातील स्मार्टपणा, व्यावसायिकता लक्षात येईल. कपूर खानदानाची ती सून असल्याचे त्यात अधोरेखित होईल. एका फिल्मी पार्टीत जगदीश माळीची भेट होताच बबिताने त्याला सांगितले, लोलोला मी फिल्म इंडस्ट्रीत आणतेय. तिचं एक फोटो सेशन कर… तुझ्या शैलीनुसार कर.

ठरल्याप्रमाणे जगदीश माळी वर्सोवा येथील बबिताच्या सोसायटीत शिरला. ( रणधीर कपूर व बबिता वेगळे राहत होते तेव्हाचे ते दिवस) तेव्हा सोसायटीतील विशाल अशा कंपाऊंडमधील स्वीमिंग पूल पाहून त्याने ठरवले. लोलोचं येथेच स्वीमिंग काॅश्चूममध्ये फोटो सूट करुया. त्याची ही कल्पना बबिताला पटली आणि लोलोही तयार झाली. जवळपास पस्तीस वर्षांपूर्वी हा ‘माॅडर्न विचार’ बबिताच्या स्वभावाची कल्पना देतो. काळासोबत आपणही बदलायला हवे हा तिचा यातला दृष्टिकोन. कपूर खानदानातील ही खासियत. आधुनिक विचारसरणी असावी.

बबिताच्या सकारात्मक दृष्टिकोनाची आणखीन उदाहरणे, लोलोचं रुपेरी पदार्पण ‘कपूर’ आडनावाला/खानदानाला साजेसं व्हावं असे बबिताला वाटणारच. शो बिझनेसमध्ये असेच वागावे लागते. तो खेळ जमायला हवा. तरच पत राहते. फोकस कायम राहतो. बेबोसाठी पहिला चित्रपट स्वीकारला, ‘बरसात’. याचा निर्माता धर्मेंद्र बबिताचा ‘कब क्यू और कहा’ ( १९७१) चा एकेकाळचा हीरो. दिग्दर्शन शेखर कपूरकडे आणि नायक बाॅबी देओल.

मला आठवतय, गोरेगावच्या फिल्मीस्थान स्टुडिओत अतिशय दणकेबाज ग्लॅमरस मुहूर्त रंगला. आम्ही अतिशय मनापासून रकानेच्या रकाने लिहिले. पण बरेच दिवस झाले तरी शूटिंगची काहीच खबर नाही. एके दिवशी बातमी आली, शेखर कपूरने हा चित्रपट सोडला. ( कितवा बरे?) आणि राजकुमार संतोषी आता दिग्दर्शक आहे. या उलथापालथीत जात असलेला वेळ बबिताला स्वस्थ बसू देईना. तिने लोलोला घेऊन हैदराबाद गाठलं आणि निर्माते डी. रामा नायडू यांची भेट घेऊन लोलोला ‘प्रेम कैदी’ची हरिशची नायिका केली. लोलोचा हा पहिलाच चित्रपट सुपर हिट. आईला यापेक्षा आणखीन आनंद तो काय हवा? चित्रपटाच्या जगात “यश हेच चलनी नाणे” यावर लक्ष असायलाच हवे.

लोलोचं करियर सुरु झालं आणि काही चित्रपटांनंतर तिने चित्रपट स्वीकारला, दीपक आनंद दिग्दर्शित ‘लग ते जिगर’. तिचा काका ऋषि कपूर या चित्रपटातही काकाच आणि या दोघांवर काही महत्वाची दृश्ये चित्रीत होत असतानाच आम्हा सिनेपत्रकारांना जुहूच्या मयूर महल या बंगल्यात शूटिंग रिपोर्टींगसाठी बोलावले. ते दिवसच वेगळे होते. काही वेगळं पाहायला मिळेल आणि म्हणूनच काही एक्स्युझिव्हज लिहायला मिळेल म्हणून थोडं लवकर गेलो ( ते अनुभव आता सांगायला मिळताहेत) तेव्हा काहीसा आडोसा पकडून चक्क बबिता बेबोला घेऊन आपल्या दीर व मुलीचे शूटिंग पाहत असल्याचे दिसले. क्या सीन है असंच म्हणावसं वाटलं. बेबो तेव्हा शाळकरी वयातील वाटली. गंमत म्हणजे, तेव्हा शूटिंग रिपोर्टींगमध्ये हेच लिहिलं. हा चित्रपट याच पहिल्याच शेड्युलनंतर डब्यात गेला. असं तर अनेकदा होते. या खेळाचाच एक भाग.

पुढचं पाऊल वेळीच टाकायला हवे ही बबिताची खुबी. हुशारी. बेबोच्या वेळीही अशीच ‘बदलाची खेळी’ रंगली. ह्रतिक रोशनची पहिली नायिका म्हणून राकेश रोशन दिग्दर्शित ‘कहो…ना प्यार है’ स्वीकारला. महालक्ष्मीच्या फेमस स्टुडिओत पहिले चित्रीकरण सत्रही पार पडतेय तोच बीग बी पुत्र अभिषेक चित्रपटसृष्टीत आला. क्या टायमिंग है…एकदम बीग शाॅट.

बेबोचा हा पहिला हीरो असायलाच हवा असे बबिताला वाटले आणि तिने चक्क तशी सकारात्मक पावलेही टाकली. आणि राकेश रोशनला सांगत ‘कहो ना.. प्यार है’ सोडला आणि दिग्दर्शक जे. पी. दत्ताची भेट घेत ‘रिफ्यूजी’त बेबो अभिषेकची नायिका झाली…आपल्या मुलींच्या कारकिर्दीच्या आखणीत इतकी काळजी कोणी घेतली असेल हो ? बबिताचे वेगळेपण हेच. महत्वाकांक्षी व धोरणी.

बबिताची रुपेरी पडद्यावरील करियर चित्रपटाच्या संख्येत फार नाही. तरी तिचा इम्पॅक्ट भारी. राजेश खन्नाची ती पहिली नायिका. ( जी. पी. सिप्पी निर्मित व भास्कर दवे दिग्दर्शित ‘राज’ चित्रपट १९६६). एका रिॲलिटी शोमध्ये बबिता व लोलो असताना लोलोचं आपल्या आईबद्दलचं फिल्मी ज्ञान जाणून घेण्यासाठी प्रश्न होता, बबिताचा पहिला चित्रपट कोणता? यावर लोलो काहीशी गोंधळली आणि म्हणाली, काकाजी ( राजेश खन्ना) के साथ ‘राज ‘ और संजय खानजी के साथ ‘दस लाख’… तिचं उत्तर बरोबर होते, कारण बबिताने एकाच वेळेस हे दोन चित्रपट स्वीकारले. तात्पर्य चित्रपटसृष्टीत तिचे स्वागत झाले होते.

बबिताने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले त्याच सुमारास इंद्राणी मुखर्जी, लीना चंदावरकर, हेमा मालिनी, जया भादुरी, रेखा, राखी, योगिता बाली आल्या, म्हणजे स्पर्धा तगडी होती. बबिता एकेकाळी असंख्य कॉलेज गर्लची “फॅशन आयकॉन” होती. तिचा टाइट चुडीदार कुर्ता, हूप इअर रिंग्स आणि गो-गो आय ग्लासेस त्या काळातील युवती आजही विसरलेल्या नाहीत. त्यांनी जमेल तेवढी ती केली. बबिताने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले तेव्हा अभिनय येणे वा असणे याला ‘छान दिसणे’ असा पर्याय एस्टॅब्लिश होत होता. बबिताचे वडिल हरी शिवदासानी असून ते सिंधी होते आणि आई फ्रेंच महिला होती. साधना आणि बबिता ह्या दोघी चुलत बहिणी.

बबिताने डोली, किस्मत, ‘ फर्ज’,’ ‘, ‘तुमसे अच्छा कौन है’ ,’हसीना मान जाएगी’ , एक श्रीमान एक श्रीमती, ‘अनजाना’,’कब क्यो और कहां’,’पहचान’, अनमोल मोती, बनफूल, सोने की लंका, एक हसिना दो दीवाने अशा अनेक चित्रपटात भूमिका साकारताना राजेंद्रकुमार, मनोजकुमार, शम्मी कपूर, शशी कपूर, जितेंद्र यांची नायिका बनण्यात यश मिळवत आपली स्पेस निर्माण केली. यातील काही पिक्चर्सच्या सुपर हिटने बबिता नावाला ग्लॅमर आलं…

=========

हे देखील वाचा : जगातला एकमेव ‘शापित’ सिनेमा, ज्याने घेतला १०० हून अधिक लोकांचा जीव

=========

अशा चढत्या भाजणीत आर. के. फिल्मच्या रणधीर कपूर दिग्दर्शित ‘कल आज और कल’मध्ये कपूर खानदानातील तीन पिढीसोबत ( पृथ्वीराज कपूर, राज कपूर व रणधीर कपूर) एकाच वेळेस काम करण्याची संधी मिळताच बबिताची किस्मत आणखीन उघडले. तेच ते सही टायमिंग. रणधीरला लाडाने/प्रेमाने डब्बू असं म्हणता म्हणता तोच तिच्या प्रेमात पडला. कधी कधी प्रेम असेच होत असते. पिक्चर पूर्ण होता होता ती कपूर खानदानाची सूनही झाली आणि संसारातही रमली. काही वर्षातच दोन मुलींचा जन्म झाला. पण कशावरुन तरी या संसारात कुरबूर, कटकटी, भांडणे, गैरसमज वाढत वाढत गेले आणि बबिता आपल्या दोन मुलींना घेऊन चेंबूरच्या आर. के. काॅटेजमधून बाहेर पडली आणि वर्सोव्यात वेगळी राहू लागली…गाॅसिप्स मॅगझिनमधून यावर काहीबाही लिहून आले. त्यांना भरपूर खमंग मसाला मिळत गेला. त्यात तथ्य किती हे तेच जाणोत.
ही ‘स्टोरी’ एव्हाना ‘मागील रिळा’त राहिलीय. काळ पुढे सरकायलाय आणि ते आता पुन्हा एकत्र आलेत. काही का असेना, दुरावलेली नाती पुन्हा जुळायला हवीतच. मग ती कपूर खानदानातील का ना असत?

बबिताला वयाच्या पंचाहत्तरीत ही छानशी भेटच. एक गोष्ट महत्वाची, नटी म्हणून आपलं करियर फार नसले तरी आपल्या दोन्ही मुलींना यशस्वी स्टार ॲक्ट्रेस म्हणून बबिताने घडवले. तैमूर व जेह यांच्या आजीची गोष्ट खूपच कलरफुल आहे. मोठाच फ्लॅशबॅक असणारी आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.