थलायवा तो छा गया
बेअर ग्रिल्सबरोबर रजनीकांत चा मॅन व्हरसेस वाईल्ड हा टीव्ही शो डिस्कव्हरी चॅनेलवर नुकताच झाला…एक जंगलात बिनधास्त फिरणारा तर दुसरा अभिनयाच्या क्षेत्रात राज्य करणारा…या दोघांना जंगलात फिरतांना बघण्याची संधी चुकवू नये अशीच होती…
थलायवा तो छा गया….
हा थलायवा शब्द आला की डोळ्यासमोर एकच नाव येतं….ते म्हणजे रजनीकांत…तामिळ सुपस्टार…अवघ्या भारतीयांच्या गळ्यातला ताईत..आणि आपल्या महाराष्ट्राचं बोलायचं तर रजनीकांत मराठी असल्याचं समाधानचं आपल्याला खूप देऊन जातं…हा सुपरस्टार आता पुन्हा चर्चेत आला आहे…यावेळी निमित्त आहे ते बेअर ग्रिल्सचं…आठवलं का कोण बेअर ते…हा तोच बेअर ज्यांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जंगलात फिरवलं…अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना जंगलात काही खाऊपिऊ घातलं…सध्या सर्वात मानधन घेणारा बेअर मॅन व्हरसेस वाईल्ड नावाचा टीव्ही शो करतो डिस्कव्हरी चॅनलवर…या शोमध्ये बेअरने अनेक लोकप्रिय कलाकारांना…नेत्यांना आपल्यासोबत फिरवलं आहे…आणि आता तो रजनीकांत आपल्या थलायवा बरोबर जंगल सफारीला गेला होता. मॅन व्हरसेस वाईल्ड हा लोकप्रिय शो आहे…याला कारण म्हणजे बेअर ग्रिल…बेअर म्हणजे काहीही करु शकणारा माणूस…या बेअरचं अवघं आयुष्य साहसी आहे. भीती नावाचा शब्द याच्या डिक्शनरीमध्ये औषधालाही सापडणार नाही. बेअर लहानपणापासून धडपड्या…स्काय डायव्हींग आणि गिर्यारोहणाचे धडे त्यांनी अगदी लहानवयात घेतले. ईटन हाऊस सारख्या प्रतिष्ठीत शाळेत तो शिकला. पुढे युनिव्हसिटी ऑफ इंग्लडमध्ये त्याचं पुढचं शिक्षण झालंय…शाळेत असतांना म्हणे त्याला मुलं खूप त्रास द्यायची…त्यामुळे या मुलांना अद्दल घडवण्यासाठी तो कराटे शिकू लागला. त्यात एवढी प्रगती केली की चक्क कमी वयात ब्लॅकबेल्ट घेणारा विद्यार्थ्यी म्हणून नावारुपाला आला…अर्थात त्याला चि़डवणा-या विद्यार्थ्यांना माघार घेतली असणार हे नक्की. पुढे बेअर भारतात फिरायला आला. सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या जंगलात तो फिरला. भारतीय सैन्याचं त्याला आकर्षण होतं. लवकरच तो ब्रिटीश आर्मीमध्ये दाखल झाला. स्पेशल फोर्समध्ये त्याचा सहभाग असल्याचं सांगितलं जातं…
इथेच त्याला जवळपास सर्व हत्यारंचालवण्याचं प्रशिक्षण मिळालं…हे सर्व चांगलं होत असतांनाच एकदा आफ्रीकेमध्ये मोहीमेवर असतांना बेअरला अपघात झाला आणि त्याचं आयुष्य बदललं…वय अवघं 21-22 होतं…सतरा हजार फूट उंचीवरुन पॅराशूटच्या आधारे त्यानं हॅलिकॉप्टरमधून उडी मारली. त्याचे सहकारी व्यवस्थित जमिनीवर उतरले. पण बेअरचं पॅराशूट उघडलं नाही…तो तेवढ्या उंचीवरुन जमिनीवर आदळला…पाठीवर पडल्यानं पाठीला जबरदस्त मार लागला…तो तसाच जखमी अवस्थेत काही तास पडून होता…सैनिकांनी शोधला तेव्हा तो मरणासन्न अवस्थेत होता…अठरा महिने हॉस्पिटलमध्ये होता…सर्व शरीराला फॅक्चर…शिवाय आता आर्मीमध्ये नसल्याचे दुःख…पण बेअर कसला हरतोय…अठरा महिन्यात तो उठला आणि चक्क माऊंट एव्हरेस्टची वाट पकडली. तिथेही संकंट त्याच्या मागे होतं…पाय घसरुन तो थेट खोल दरीत पडला. अंधा-या दरीमध्ये बर्फासोबत काही तास त्यानं काढले. मग वाट्याड्यानं त्याला शोधला. दोराच्या सहाय्यानं लटकणा-या
बेअरला त्यानं वर खेचलं…बेअरनं मग माऊंट एव्हरेस्ट सर केलाच आणि वयाच्या 23व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करणारा तो सर्वात लहान ब्रिटीश म्हणून गौरवला गेला. मग त्यानं उत्तर अटलांटीका पार केलं. थेम्स नदी पार केली. हिमालयावर पॅरामाऊंटनिंग केलं…हे करतांना तो अनेकवेळा संकटात सापडला…पण थांबला नाही…त्याचा हाच स्वभाव बघून त्याला टिव्ही शो मिळाले…सध्या त्याचा मॅन व्हरसेस वाईल्ड हा सर्वाधिक लोकप्रिय शो म्हणून ओळखला जातो…का असणार नाही… बेअर यात काय करत नाही…हा कुठे फिरायला जाईल याचा नेम नाही…आणि काय खाईल याचा नेम तर नाहीच नाही…अगदी जिवंत सापही खाऊन पचवलेला माणूस आहे हा…असा कुठलाही कीडा नाही जो बहुधा बेअरनं खाल्लेना नाही…
कुठूनही उड्या मारणं…मगर..शार्क यांच्याबरोबर खोल पाण्यात लढाई करणं…तळपत्या सूर्याबरोबर वाळवंटात फिरणं…असलं काहीही तो करतो…या त्याच्या सफरीत मग तो काही लोकप्रिय चेह यांनाही घेतो. हॉलिवूडचे अनेक स्टार बेअरबरोबर जंगलात फिरले आहेत. बराक ओबामाही त्याच्याबरोबर फिरले आणि बेअरच्या प्रेमात पडले. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीही जिम कार्बेटच्या जंगलात बोटीतून फिरले आहेत…आता तर त्यांनं डोनाल्ड ट्रम्प यांनाही आमंत्रण दिलंय…. पण या सर्वापेक्षा सर्वांचे लक्ष लागलं होतं ते बेअरच्या 23 मार्चच्या शो कडे…कारण यात तो आपल्या थलयवाबरोबर आला. अर्थात रजनीकांतबरोबर…या शो चा प्रोमोही चांगलाच लोकप्रिय झाला…रजनीकांत म्हणजे अभिनयाचा राजाच की…हा राजा जंगलातल्या राजाला बघायला जाणार आणि सोबतीला हा डेअरिंगबाज बेअर…हा त्रिवेणी संगम बघायला खरचं मजा आली… बेअर आपल्या 69 वर्षाच्या रजनीकांतचं कौतुक करतांना थकत नव्हता….रजनीकांत जंगलात फिरला…डोंगरावरुन उतरला…एका गंजलेल्या पुलाचे रेलींग पकडून तो पूल क्रॉस केला…यावेळी भर दुपार होती…त्यामुळे लोखंडी पूल चांगलाच तापला होता…शिवाय वन्यजीवांना पाणी पिण्यासाठी असलेल्या मोठ्याल्या तळ्यात हे दोघे उतरले…तिथे छुपा कॅमेरा लावला होता…यात वाघाचे फुटेज मिळाले त्या दोघांना…हे सर्व करतांना रजनीकांतचा उत्साह बघण्यासारखा होता. आता घरात बसून कंटाळलात असाल तर हा भाग पुन्हा पुन्हा बघा…नक्कीच उमेद वाढेल….अर्थात हे सर्व साहस करतांना बेअरसोबत त्याची टीम असते बरं का. आणि बेअरही नेहमी सांगतो, एखाद्या संकटात सापडलात तर हिंमत हरु नका. खंबीर रहा आणि सामना करा. संकट नेहमी रहातच नाही, यावर या पठ्ठ्याचा विश्वास आहे. मग या बेअरसाठी आणि त्याच्या या खंबीर मनोवृत्तीसाठी नक्की त्याचा कार्यक्रम पहा..
सई बने
फोटो सौजन्य- गुगल (Google)