Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

साजिद नाडियादवालाचा ‘बच्चन पांडे’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ट्रेलर प्रदर्शित
पॉवर प्रोड्युसर साजिद नाडियादवाला यांच्याकडे त्यांचा हा वाढदिवस खास बनवण्यासाठी आणखी एक निमित्त आहे आणि ते म्हणजे आज या दिवशी ‘बच्चन पांडे’चा ट्रेलर लाँच करण्यात येत आहे. या होळीला सुपरस्टार अक्षय कुमार अभिनीत बहुप्रतिक्षित ऍक्शन कॉमेडी ‘बच्चन पांडे’ १८ मार्च २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘बच्चन पांडे’चा ट्रेलर ऍक्शन, कॉमेडी आणि क्राईमच्या हायव्होल्टेज कथानकाने परिपूर्ण आहे. सशक्त कामगिरीसह, ट्रेलरमध्ये एक्सपेरिमेंटल स्पॅगेटी पार्श्वभूमी, उत्कृष्ट ऍक्शन, अक्षय कुमारची सिग्नेचर कॉमिक स्टाइल आणि अर्शद वारसीच्या उत्कृष्ट अभिनय असणार आहे.
फरहाद सामजी दिग्दर्शित, हा चित्रपट प्रेक्षकांना अक्षय कुमारचा यापूर्वी कधीही न पाहिलेला, घातक अवतार आणि उत्कृष्ट व्हिज्युअल्सची पर्वणी असेल. क्रिती सॅनन, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अभिमन्यू सिंग, अर्शद वारसी आणि जॅकलीन फर्नांडिस अशा यातील दिग्गज कलाकारांच्या फळीमुळे प्रेक्षक चित्रपटाकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा नक्कीच करू शकतील.
====
हे देखील वाचा: …आणि ‘जो जीता वही सिकंदर’ मधून बॉलीवूडचा मि. खिलाडी अक्षय कुमार बाहेर पडला!
====
बच्चन पांडेमध्ये मुख्य भूमिका साकारणारा अक्षय कुमार म्हणतो “साजिद नाडियादवाला यांच्यासोबत काम करणे नेहमीच आनंददायक असते. साजिद आणि मी अनेक वर्षांपूर्वीपासून, अभिनेता-निर्माते होण्याच्या खूप आधीपासून मित्र आहोत आणि तुम्ही कल्पना करू शकता की मित्रांसोबत काम करण्यात किती मजा येते. ‘बच्चन पांडे’ हा माझा त्यांच्यासोबतचा दहावा चित्रपट आहे आणि प्रेक्षक चित्रपटाकडून दहापट मनोरंजनाची अपेक्षा करू शकतात.”
नाडियादवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंटचा ‘बच्चन पांडे’ १८ मार्च २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.