महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
…वडील रागावले म्हणून संगीत क्षेत्राला मिळाला लकी अली !
लकी अली नाव आणि त्यांची गाणी आज बूमर पासून जेन झी पर्यंत सर्वांना तोंडपाठ आहेत. दोस्तांची मैफिल जमली की, त्यात हमखास लकी अलीची गाणी वाजतात म्हणजे वाजतातच. नव्वदीचा नॉस्टॅल्जिया असो की, ट्रेंडिंग रील असो सगळीकडे लकी अली गातोच. त्याचा रस्टिक आवाज, इंटेन्स चेहरा या दोन्ही गोष्टी गाण्यातील भाव आणि आशय अगदी सहज आपल्यापर्यंत पोहचवतात. त्याने ‘शाम सवेरे’ गाण्यातील धून नुसती गुणगुणली तरी अख्या दिवसाचा शीण क्षणभरात निघून जातो आणि आपण लकी अलीच्या आवाजाला सरेंडर करतो.(Lucky Ali)
लकी अलीचे वडील प्रसिद्ध अभिनेते मेहमूद होते. लकी अलींचा (Lucky Ali) जन्म मुंबईत झाला. त्यांचे नाव ठेवले गेले मकसूद मेहमुद अली पण ज्यावेळी मकसूद जन्माला त्यावेळी मेहमूद साहेबांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी फिल्म साइन केली होती. यामुळेच मेहमूद मकसूदला तू माझ्यासाठी खूपच लकी आहेस म्हणून लकी असे बोलवू लागले. मेहमूद बोलावू लागल्यावर घरच्यांनी सुद्धा त्याला लकी बोलवायला सुरुवात केली.
पुढे मेहमूद फिल्म्समध्ये खूप बिझी झाले. छोट्या लकीची रवानगी डेहराडूनच्या हॉस्टेल मध्ये करण्यात आली. मेहमूद साहेब फिल्ममधे एवढा वेळ बिझी असायचे की त्यांना हॉस्टेलमध्ये ठेवलेल्या लकीला भेटायची वेळ मिळायची नाही. एकदा मेहमूद साहेबांना १० महिन्यानंतर त्याला हॉस्टेल मधून आणायचा वेळ मिळाला आणि ते त्याला फॅमिली सोबत आणायला गेले तेव्हा छोट्या लकीने त्यांना ओळखलेच नाही उलट तो म्हणाला की, हे तर कॉमेडियन मेहमूद आहेत. आणि मग वयाच्या ११ व्या वर्षी ते मुंबईला माघारी आले. मेहमूद यांनी त्यांचे ऍडमिशन सर्व स्टार्सची मुले ज्या शाळेत शिकायची त्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये केले तिथे ज्युबलीकुमार राजेंद्रकुमार यांची मुलगी त्यांची बेस्टफ्रेंड बनली.
मेहमूद साहेबांना त्यांच्या लकी मुलाने त्यांच्यासारखे अभिनेता व्हावे असे खूप मनापासून वाटत होते. त्यांनी यासाठी ‘छोटे नवाब’ नावाची फिल्म प्रोड्युस केली. त्यात लकी अलीचा छोटासा पार्ट होता. ही फिल्म काही खास चालली नाही. नंतर हमारे तुम्हारे, ये है जिंदगी, श्याम बेनेगल यांची ‘त्रिकाल’ अशा फिल्म्स मध्ये त्यांनी काम केले पण त्यांना अक्टिंगची आवड मुळातच नव्हती म्हणून ते कामापासून दूरच पळायायचे.
लकी अली (Lucky Ali) जेव्हा बंगलोर मध्ये शिकत असताना त्यांना गांजाचे व्यसन लागले. ते एवढे टोकाला गेले होते की ते थोडयाशा पैशांसाठी तिथल्या कोणत्याही ऑफिसमध्ये झाडू फडका मारत असत आणि त्या पैशांचा गांजा विकत घेत असत. मेहमुद यांनी त्यांचे व्यसन दूर करण्याचा प्रयत्न केला त्याचाच भाग म्हणून ‘दुश्मन दुनिया का’ ही फिल्म बनवली. लकी अलीला त्या काळात कोणते काम करायचे हे क्लियरच नव्हते कारण ते व्यसनात गुरफटलेले होते. गायन किंवा संगीत सुरू दूर पर्यंत त्यांच्या डोक्यात सुद्धा नव्हते. मेहमूद यांनी त्यांना घोड्यांच्या देखभालीचा कोर्स करण्यासाठी अमेरिकेला पाठवले. तिथे ते जहाजांवर गिटार वाजवायला शिकले.
पुढे अनेक वर्षे ते अशीच छोटी मोठी कामे करत भटकत राहिले. त्यांच्या जीवनात कोणतेच लक्ष नव्हते. मेहमूद त्यांच्यावर पुरते वैतागले होते आणि एकदा त्यांनी रागात बोलले की तू एक नंबरचा युजलेस आहेस आणि हे शब्द त्यांच्या काळजाला लागले. जहाजावर गिटार शिकल्यामुळे त्यांना संगीताची आवड निर्माण झाली होती आणि त्यांनी मग याच क्षेत्रात काहीतरी मोठं करून दाखवायचे ठरवले. त्या दरम्यान त्यांचे लग्न मिगन जेन मॅकक्लिरली हिच्याशी झाले आणि त्यांचा मेव्हणा लंडन मधील म्युझिक कंपनीत मोठ्या पदावर होता त्यांनी अल्बम रेकॉर्डिंगची सोय करून दिली. आता अल्बम रिलीज करून द्यायला त्यांना प्रत्येक छोट्या मोठ्या लेबलच्या मागे पळावे लागले. शेवटी क्रिसेंडो नावाच्या म्युझिक कंपनीने त्यांचा अल्बम रिलीज करण्याचे एक्सेप्ट केले पण व्हिडिओ स्वतः अलींनी बनवावा अशी अट घातली.
=========
हे देखील वाचा : दिलीप कुमार म्हणाले अनुपम तू एक…
========
लकी अली (Lucky Ali) आपल्या ऍड बनवणाऱ्या मित्राकडे महेश मथाई यांच्याकडे गेले आणि त्यांनी अलबमची सीडी दिली आणि सांगितले की गाणी आवडली तर तू विडिओ बनवा आवडली नाही तर सीडी खिडकीतून बाहेर फेक. महेश मथाई त्यांच्या व्हिडिओ प्रोडक्शनसाठी इजिप्तला गेले . या सर्वांसाठी १५ लाख लागणार होते. महेशने हा सर्व खर्च केला. व्हिडिओ बनवून अल्बम रिलीज झाला. या अल्बमच्या सीडीज रातोरात खपल्या कारण या अल्बममधील शाम सवेरे हे गाणे खुअपच लोकप्रिय झाले. जवळपास १ करोड सीडीज खपल्या होत्या. आणि मग या मेहमूदच्या युजलेस मुलाने कधीच मागे वळून पहिले नाही.