Tu Majha Kinara: प्रत्येक कुटुंबाच्या भावनांना स्पर्श करणारी कथा ‘तू

६६ पुरस्कार जिंकणारी Hindi Web series आहे तरी कोणती?
कौटुंबिक चित्रपटांपेक्षा अलिकडे प्रेक्षकांचा कल रिअल लाईफ स्टोरी किंवा समाजातील वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या वेब सीरीजकडे अधिक वाढलेला दिसून येतो… अशीच एक हिंदी वेब सीरीज २०२० मध्ये आली होती… गावचं जग आणि गावातलं राजकारण दाखवणाऱ्या या सीरीजने आजपर्यंत तब्बल १-२ नव्हे तर ६६ पुरस्कार जिंकले आहेत… इतकंच नाही तर International Film Festival (IFFI) मध्येही डंका वाजवणी ही सीरीज कोणती आहे? जाणून घेऊयात.. (Hindi Web Series)
तर, आपण ज्या सीरीजबद्दल बोलत आहोत ती आहे ‘पंचायत’ सीरिज… फुलेरा गावातील पंचायत निवडणूक आणि त्यात घडणाऱ्या घटना प्रेक्षकांना इतक्या भावल्या की या सीरीजने तब्बल ४ सीजीनचा प्रवास केला आहे… या सीरीजचा पहिला सीझन २०२० मध्ये आला होता… त्यानंतर २०२२ मध्ये दुसरा, २०२४ मध्ये तिसरा आणि २०२५ चौथा सीझन आला.. आता लवकरच पंचायतचा पाचवा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… (Panchayat Web series)

पंचायत सीरीजच्या नावावर ४ IIFA, ११ इंडियन टेलिव्हिजन अकादमी अवॉर्ड्स, ९ फिल्मफेयरसह तब्बल ६६ अवॉर्ड्स आहेत. ही धमाकेदार सीरिज चंदन कुमार आणि दीपक कुमार मिश्रा यांनी तयार केली आहे. या सीरिजमध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार, पंकज झा आणि आसिफ खान मुख्य भूमिकेत आहेत… (Web series news)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi