Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Dheeraj Kumar : संघर्षातून यशाकडे

अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘Family Man 3’;

‘दिवसाला ४० चपात्या आणि १.५ लीटर दूध’ Actor Jaideep Ahlawaचा

Aatali Batmi Phutali Teaser : खुनाच्या सुपारीभोवती फिरणारी भन्नाट कथा; १९

‘या’ कारणामुळे Mrunal Dusanis ने कलविश्वातल्या मुलाशी लग्न नाही केलं;

Parinati: अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी ही भन्नाट जोडी एकत्र झळकणार !

Jaideep Ahlawat : “‘नटसम्राट’ हिंदीत करण्याची इच्छा”

सिनेमाचा हिरो Rajesh Khanna पण किशोर कुमार यांचे गाणे दुसऱ्याच

Maalik : राजकुमार रावच्या मालिक चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर हवा?

Dheeraj Kumar : ‘रोटी, कपडा और मकान’ चित्रपट फेम ज्येष्ठ

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kon Hotis Tu Kay Jhalis Tu: कोकणात पार पडला ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेचा दमदार लॉन्च सोहळा…

 Kon Hotis Tu Kay Jhalis Tu: कोकणात पार पडला ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेचा दमदार लॉन्च सोहळा…
Kon Hotis Tu Kay Jhalis Tu Serial
टीव्ही वाले मिक्स मसाला

Kon Hotis Tu Kay Jhalis Tu: कोकणात पार पडला ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेचा दमदार लॉन्च सोहळा…

by Team KalakrutiMedia 23/04/2025

Kon Hotis Tu Kay Jhalis Tu : ‘बा लक्ष्मीनारायणा आणि रवळनाथा तू मागणं घेण्यास राजी हस तसोच ह्यो मायबाप प्रेक्षक मागणं घेण्यास राजी हा…तर देवा महाराजा आमच्या नव्या मालिकेसाठी आणि प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी आम्ही कलाकारांनी जो काय घाट घातलेला हा, जी काय मेहनत घेतलेली असा ती मेहनत फळाक येवोन सगळ्यांच्या पसंतीस उतरान दे रे म्हाराजा.’ लोकप्रिय अभिनेते वैभव मांगले यांनी घातलेल्या गाऱ्हाण्याचा नाद संपूर्ण वालावल नगरीत दुमदुमला. निमित्त होतं ते कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या लॉन्च सोहळ्याचं. या मालिकेचं बरचसं शूटिंग कोकणातल्या कुडाळमध्ये होणार आहे. वालावल मंदिर, निवतीचा समुद्र किनारा अशी निसर्ग सौंदर्याने नटलेली बरीचशी प्रेक्षणीय स्थळं मालिकेत पाहायला मिळणार आहेत. मालिकेची गोष्ट कोकणात घडत असल्यामुळे शूटिंगचा श्रीगणेशा आणि लॉन्चिंग सोहळा देखिल या देवभूमीत करण्यात आला. याप्रसंगी सुकन्या कुलकर्णी, वैभव मांगले, मंदार जाधव, गिरीजा प्रभू, अमृता माळवदकर, अमित खेडेकर, संजय शेजवळ आणि स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे उपस्थित होते. (Kon Hotis Tu Kay Jhalis Tu Serial)

Kon Hotis Tu Kay Jhalis Tu Serial
Kon Hotis Tu Kay Jhalis Tu Serial

अलोट जनसमुदायाच्या साक्षीने वालावल मंदिरात लक्ष्मीनारायणाच्या आशीर्वादाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कोकण म्हण्टलं की आपसुकच डोळ्यासमोर येतो तो दशावताराचा खेळ. त्यामुळेच कोण होतीस तू, काय झालीस तू च्या लॉन्च सोहळ्यातील संयुक्त दशावतराच्या खेळाला भरभरुन प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ठरलं ते या मालिकेतील कावेरी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभूने सादर केलेला लाठीकाठीचा खेळ. दोन महिन्यांपासूनची गिरीजाची ही मेहनत एक वेगळीच ऊर्जा देऊन गेली.

Kon Hotis Tu Kay Jhalis Tu Serial
Kon Hotis Tu Kay Jhalis Tu Serial

याप्रसंगी सुकन्या कुलकर्णी म्हणाल्या, ‘मी अतिशय भाराऊन गेली आहे. नाटक आणि सिनेमा पहाण्यासाठी हमखास गर्दी होतेच. पण मालिकेच्या लॉन्च सोहळ्याला ३००० पेक्षा जास्त चाहते उपस्थित होते हे पाहून खूप छान वाटलं. कोकणातली माणसं फणसासारखी असतात. वरुन काटेरी मात्र आतून तितकीच गोड. या मालिकेत मी साकारात असलेली सुलक्षणा धर्माधिकारी देखिल अशीच फणसासारखी असणार आहे. आजवर माझं हे रुप प्रेक्षकांनी पाहिलेलं नाहीय. त्यामुळे मला हे पात्र साकारताना मज्जा येतेय.’ (Kon Hotis Tu Kay Jhalis Tu Serial)

================================

हे देखील वाचा: Maharashtrachi Hasyajatra: महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर Mahesh Manjrekar खेळणार क्रिकेटचा डाव!

================================

या मालिकेतल्या प्रत्येक कलाकाराची कोकणाशी नाळ जोडलेली आहे. मालिकेच्या कथानकाविषयी देखिल उत्कंठा दिवसेंदिवस वाढतेय. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका कोण होतीस तू, काय झालीस तू सोमवार २८ एप्रिल पासून रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment kon hotis tu kay jhalis tu mandar jadhav marathi serrial satish rajwade Star Pravah sukanya kulkarni vaibhav kulkarni vaibhav mangale
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.