Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Avdhoot Gupte यांच्या ‘आई’ अल्बममधील आई-मुलाच्या नात्यातील मैत्री शोधणारे ‘सखी माझी आई’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला..
Avadhoot Gupte: प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि निर्माता अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ या भावनिक अल्बमला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या अल्बममधील दुसरे गाणे ‘सखी माझी आई’ नुकतेच प्रदर्शित झाले असून सध्या हे गाणे प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. ‘सखी माझी आई’ हे गाणे अवधूत गुप्ते यांनी स्वतः लिहिले असून या गाण्याला त्यांचाच आवाज व संगीत लाभले आहे. या गाण्यात आई व मुलाच्या नात्यातील मैत्र शोधण्याचा प्रयत्न दिसतो. त्यामुळे हे गाणे अंतर्मनाला स्पर्श करते. या गाण्याचे संगीत संयोजन अनुराज गोडबोले यांनी केले आहे.(Avadhoot Guptes Aai New Album)

याआधी प्रदर्शित झालेले ‘सोप्पं नव्हं माय’ हे पहिले गाणेही प्रेक्षकांच्या मनाला भिडले असून, ‘आई’ या विषयावर आधारित चार गाण्यांचा हा अल्बम दर आठवड्याला एक नवीन गाणे घेऊन येणार आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘आई’ या अल्बममधील गीतांचे लेखन समीर सामंत, प्रशांत मडपुवार आणि अवधूत गुप्ते यांनी केले आहे.
==============================
===============================
या गाण्याविषयी अवधूत गुप्ते म्हणतात, ‘‘सखी माझी आई’ हे गाणे मी माझ्या आईला अर्पण करतो. आई ही फक्त जन्मदात्री नसून ती आपल्या आयुष्याची खरी सखी असते. हे गाणे तिच्या त्या सोबतीपणाला समर्पित आहे. मी स्वतः हे गाणे लिहिले, संगीतबद्ध केले आणि गायल्यामुळे माझ्या मनातले तिच्याबद्दलचे प्रेम अगदी शब्दशः उतरवता आले आहेत.”

काही दिवसांपूर्वी त्यांच या अल्बम मधल अजुन एक गाण प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. ल्बममधील पहिले गाणे ‘सोप्पं नव्हं माय’, नुकतेच प्रदर्शित झाले असून याचे गीतलेखन वैभव जोशी (Vaibhav Joshi) यांनी केले आहे. यात लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब (Actor Prathmesh Parab) झळकत असून, एक हळवं आणि संवेदनशील दृश्यरूप यात पाहायला मिळत आहे. दर आठवड्याला या अल्बममधील एक गाणे प्रदर्शित होणार असून समीर सामंत, प्रशांत मडपुवार आणि अवधूत गुप्ते यांनी ही गाणी शब्दबद्ध केली आहेत.
==============================
===============================
‘आई’ (Aai) या अतिशय सर्वाच्याच जिव्हाळ्याच्या विषयावर आधारित असलेला हा चार गाण्यांचा अल्बम आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत या अल्बममधील सर्व गाणी अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध व गायलेली असून, अनुभवी संगीत संयोजक अनुराग गोडबोले (Anurag Godbole) यांनी सर्व सुंदर गाण्यांना संगीताची जोड दिली आहे.