Housefull 5 OTT: थिएटर्सनंतर आता ओटीटीवर झळकणार ‘हाउसफुल 5’; जाणून घ्या, कधी आणि कुठे

Venom The Last Dance: ‘या’ दिवशी होणार ‘व्हेनम: द लास्ट डान्स’चा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर !
व्हेनम: द लास्ट डान्स या बहुप्रतीक्षित ब्लॉकबस्टरचा ग्रँड टेलिव्हिजन प्रीमियर हिंदी भाषेत, सोनी मॅक्सवर होणार आहे, रविवार, 25 मे रोजी दुपारी 1 वाजता आणि त्याच वेळी हा चित्रपट सोनी PIX वर ‘संडे मेगा प्रीमियर’ अंतर्गत इंग्रजी भाषेत प्रसारित करण्यात येईल. या चित्रपटातील मुख्य अभिनेता टॉम हार्डी याने केली मार्सेलसोबत ‘व्हेनम: द लास्ट डान्स’च्या कथेचे सह-लेखन देखील केले आहे. (Venom The Last Dance Television Premier)

केली मार्सेलद्वारा दिग्दर्शित हा चित्रपट या सिरिजची ओळख असलेला डार्क हयूमर आणि जबरदस्त अॅक्शन सादर करतो. ही एडी आणि व्हेनमची गोष्ट आहे, ज्यांचा शोध सरकार घेत आहे आणि गॉड नल (Knull) हा दुष्ट एलियन त्यांच्यावर टपून बसला आहे, ज्याला हे ब्रह्मांड जिंकण्यासाठी व्हेनमच्या आत असलेले ‘कोडेक्स’ हवे आहे.
===================================
===================================
टॉम हार्डी पुन्हा एकदा व्हेनमच्या रूपात दिसणार आहे. हा चित्रपट एडी आणि व्हेनम यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्याचा शोध घेत या फ्रँचाईजचे भावनिक समापन दर्शवितो. समीक्षकांनी एडी आणि व्हेनम या टॉम हार्डीने साकारलेल्या दोन्ही भूमिकांचे आणि त्या दोघांमधील नात्याचे कौतुक केले आहे.

व्हेनम: द लास्ट डान्स हा व्हेनम त्रयीचे थरारक समापन दर्शवतो. व्हेनमच्या कथेचा असा नाट्यमय शेवट होतो. या चित्रपटाची निर्मिती कोलंबिया पिक्चर्स आणि मार्व्हल एन्टरटेन्मेंटने केली आहे, तर सोनी पिक्चर्सने चित्रपटाच्या वितरणाची बाजू सांभाळली आहे. सोनीच्या स्पायडर-मॅन युनिव्हर्स (SSU) मधील हा पाचवा चित्रपट आहे. हा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर अवश्य बघा, रविवार, 25 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता फक्त सोनी मॅक्स आणि सोनी PIX वर. (Venom The Last Dance Television Premier)