Indeevar : संगीतकार आनंदजी यांनी इंदीवर यांना सुचवले होते हुक

असा झाला ‘लो बजेट फॅमिली एन्टरटेन्मेंट’च्या यशाचा नवा फॉर्म्युला
गाण्याचे शब्द तयार नाहीत, संगीतकाराला गीत कोणतं हे माहित नाही, गाणार कोणं याची काही कल्पना नाही असं असताना गाण्याचं चित्रीकरण मात्र पूर्ण झालेलं होतं! आपण नक्कीच कोड्यात पडला असणार; हे कसं शक्य आहे. पण ही गंमतीची गोष्ट खरी आहे. संगीतकार सलील चौधरी १९७३ साली ’रजनी गंधा’ या सिनेमाला (Cinema) संगीत देत होते. त्यांनी या सिनेमाचे टायटल सॉंगची ट्यून सिनेमाचे दिग्दर्शक बासु चटर्जी यांना पाठवून दि्ली. त्यावर ही धुन ऐकून एक दिवस बासुदा यांचा फोन सलीलदा यांना आला व ते म्हणाले, ‘दादा आपने इस पिक्चर का जो टायटल सॉंग बना रहे है वो थोडा १४ सेंकद कम कर दो’ सलीलदा यावर बासुंदांना म्हणाले, ऐसा क्यूं? अगर ऐसा हैं तो आप १४ सेंकद थोडा जादा शूट कर लेना!यावर बासुदांनी जे सांगितले त्यावर सलीलदा हादरलेच. बासुदा म्हणाले, नही दादा, गाना तो हमने पहलेही शूट कर लिया है! आता थक्क व्हायची पाळी सलीलदांची होती. जो गाना अभी रेकॉर्ड ही नही हुआ वो आपने पहले कैसे शूट किया? खरी गंमत अशी होती की, हे गाणं कुणाच्या तोंडी नव्हतं तर पार्श्वभूमीवर चित्रित होणार होतं. त्यामुळे नायिका विद्या सिन्हाच्या भावमुद्रा टिपणार हे गाणं, प्रत्यक्ष गाणं तयार व्हायच्या आधीच शूट झालं होतं. चित्रीत झालेल्या कालावधीत आता ते गाणं बसवायचं होतं आणि सलीलदांनी बनवलेली डमी धुन १४ सेकंदांनी जास्त होत होतं!

सिनेमा (Cinema) लो बजेटचा होता त्यामुळे ही तारेवरची कसरत होती. आता खरी कसोटी गीतकार योगेश व संगीतकार सलीलदांची होती. योगेशला गाण्याचं दुसरं कडवं बदलावं लागलं व सलीलदांनी इंटरल्यूडचे पीसेस थोडे कमी केले.’अधिकार ये जबसे साजनका’ हे फ्रेश कडवं योगेशने लिहिलं व गाणं तयार झालं ‘रजनी गंधा फूल तुम्हारे महके यूंही जीवन में’ सिनेमाचे बजेट अजिबात वाढू न देता बासूदांनी केलेली ही जोडतोड कुणाच्याही लक्षात तर आलीच नाही शिवाय एक अप्रतिम क्लासिक सॉंग तयार झालं! बासू चॅटर्जी यांचा ‘रजनीगंधा’ हा चित्रपट आज अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण चित्रपट आहे. एक अभिजात चित्रपट म्हणून या सिनेमाची (Cinema) ओळख आहे.
शहरी मध्यमवर्गीय जीवनावरील या चित्रपटाने अशा चित्रपटांची नवी सुरुवात केली. या चित्रपटात सुरुवातीला शशी कपूर, शर्मिला टागोर आणि अमिताभ बच्चन अशी स्टार कास्ट होती. परंतु शशिकपूर ने स्वतः बासूदा यांना सांगितले की, ही स्टोरी नवीन कलावंतांना घेऊन केली तरच या चित्रपटाचा फ्रेशनेस आणखी वाढेल. नंतर अपर्णा सेन आणि समीर भांजा यांना घेऊन चित्रपट करायचे ठरवले पण जमले नाही. क्लासिकल डान्सर मल्लिका साराभाई हिचा देखील बासू चटर्जी यांनी विचार केला होता पण, त्यावेळी नेमकी तिची एमबीए एक्झाम होती त्यामुळे तिने नकार दिला. शेवटी बासू चटर्जी यांच्याच एका ऍड फिल्ममध्ये विद्या सिन्हाने भूमिका केली होती, तिला या भूमितीसाठी साइन केले. अमोल पालेकर चा हा पहिलाच हिंदी चित्रपट होता. (Cinema)
तेव्हा तो रंगभूमीवरील एक व्यस्त कलाकार होता. एका फिल्म फोरमच्या मिटिंगमध्ये बासूदा यांनी अमोल पालेकरला या भूमिकेसाठी विचारले आणि त्याने होकार दिला. दिनेश ठाकूर हा दिल्ली रंगभूमी वरील कसदार अभिनेत्याने यातील सहनायकाची भूमिका केली. चित्रपटाला संगीत सलील चौधरी यांचे होते. यातील कई बार युंही देखा है ये जो मन की सीमा रेखा है…या मुकेशने गायलेल्या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. चित्रपटाची चित्रीकरण अवघ्या महिन्याभरात पूर्ण झाले.(Cinema)
परंतु चित्रपट घ्यायला कोणीही वितरण पुढे येत नव्हता शेवटी मुंबईच्या आकाशवाणी थिएटरमध्ये केवळ एका प्रिंटवर हा सिनेमा (Cinema) रिलीज करण्यात आला आणि हळूहळू माऊथ पब्लिसिटीने सिनेमाची लोकप्रियता वाढत गेली. रजनीगंधा 13 सप्टेंबर 1974 या दिवशी प्रदर्शित झाला आणि हळूहळू या सिनेमाचे लोकप्रियता एवढी वाढली की भारतातील बऱ्याच शहरांमध्ये हा चित्रपट या चित्रपटाने रौप्य महोत्सव साजरा केला. यानंतर बासू चटर्जी यांचे छोटी सी बात (१९७५) आणि चितचोर(१९७६) हे सिनेमे सुपर हिट ठरले.
========
हे देखील वाचा : एका हिंदी सिनेमाच्या गाण्याने झाला या गार्डनचा कम्प्लीट मेक ओव्हर!
========
सत्तरचं दशक हे अनेक अर्थाने महत्वपूर्ण होतं. या दशकात समांतर सिनेमासोबतच आशयसंपन्न अशा ‘लो बजेट’ सिनेमाची निर्मिती सुरू झाली. याच कॅटेगिरीतील हा चित्रपट होता बासु चटर्जींचा ’रजनी गंधा’. मनू भंडारी या ख्यातनाम गुजराती लेखिकेच्या ’यही सच है’ या कथेवर आधारीत या सिनेमात अमोल पालेकर,विद्या सिन्हा आणि दिनेश ठाकूर यांच्या भूमिका होत्या. हा सिनेमाला (Cinema) प्रदर्शित झाला आणि सुपर हिट ठरला. दर्जेदार कथानक, अप्रतिम अभिनय, मधाळ संगीत या लो बजेट फॅमिली एन्टरटेन्मेंट हा यशाचा नवा फॉर्म्युला तयार झाला.