Vicky Kaushal-Katrina Kaif यांनी अखेर आपल्या लेकाचं नाव केलं रिव्हील,

‘कोडग्या निर्मात्याच्या थापांचा कंटाळा आलाय…’ मानधन न मिळाल्याने प्रसिद्ध अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केला राग
नेहमीच हसतमुख, सभ्य आणि प्रेक्षकांचा लाडका म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) सध्या मात्र कमालीचा अस्वस्थ दिसतो आहे. पडद्यावर शांत स्वभावाची भूमिका साकारणारा शशांक प्रत्यक्षात इतका संतप्त होईल, याची अनेकांना कल्पनाही नव्हती. पण नुकत्याच केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे त्याच्या मनात साचलेला राग अखेर बाहेर आला आहे.शशांकने थेट नाव न घेता एका निर्मात्यावर गंभीर आरोप केले असून, गेल्या पाच वर्षांपासून आपले मानधन मिळत नसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही, आश्वासनांशिवाय काहीच हाती न पडल्याचं त्याने स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. कलाकार असूनही स्वतःच्या मेहनतीच्या पैशांसाठी अशी लढाई लढावी लागत असल्याची खंत त्याच्या शब्दांतून जाणवते.(Actor Shashank Ketkar)

शशांकने फेसबुकवर आपली व्यथा मांडताना स्पष्ट केलं की, एका निर्मात्यासोबतचं त्याचं हे पेमेंटचं प्रकरण गेल्या ५ वर्षांपासून रखडलेलं आहे. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा संवाद सुरू होऊनही त्या निर्मात्याने दिलेला एकही शब्द पाळलेला नाही. शशांकने अतिशय कडक शब्दांत लिहिलंय, “5 वर्ष होऊन गेली. मागची ५ वर्ष आणि ८ october २०२५ पासून पुन्हा contact establish झाल्या मुळे तेव्हा पासून दिलेली एकही तारीख त्या निर्मात्याने पाळलेली नाही. थोडक्यात काय निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा कंटाळा आलाय आता. अजून एक date दिली आहे त्याने उद्याची ( ५ जानेवारी २०२६ ) full payment जमा झाले नाही तर एक detailed video post करेन… सगळ्या कुंडली सकट. आणि payment झाले तर.. तसाही payment झाल्याचा video पण post करेन.”

शशांक केतकरच्या भावनिक पोस्टनंतर मराठी मनोरंजनसृष्टीत चर्चेला वेग आला आहे. या प्रकरणावर आता अभिनेता आस्ताद काळे यानेही आपली ठाम भूमिका मांडली असून, त्याची प्रतिक्रिया विशेष लक्ष वेधून घेत आहे.आस्तादने शशांकच्या पोस्टखाली केलेल्या कमेंटमध्ये, हा राग नव्हे तर एका प्रामाणिक आणि लोकप्रिय कलाकाराच्या मनात दडलेली वेदना असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याच्या मते, कुणालाही त्रास न देणाऱ्या आणि आपल्या कामाशी प्रामाणिक असलेल्या व्यक्तीला असा मानसिक आणि आर्थिक ताण सहन करावा लागतो, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.(Actor Shashank Ketkar)
==================================
==================================
आस्तादच्या या शब्दांनी केवळ शशांकलाच पाठिंबा मिळालेला नाही, तर संपूर्ण इंडस्ट्रीतील निर्मात्यांच्या मनमानी पद्धतींवर पुन्हा एकदा प्रकाशझोत टाकला गेला आहे. अनेक कलाकारांनी आतापर्यंत न बोललेली व्यथा या निमित्ताने पुन्हा चर्चेत आली आहे. या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर कलाकारांच्या हक्कांबाबत चर्चा सुरू झाली असून, ‘गप्प बसण्यापेक्षा आवाज उठवणं गरजेचं आहे’ अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. आता या प्रकरणाचा पुढील टप्पा काय असेल आणि इंडस्ट्रीत बदल घडेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.