
रॉकिंग स्टार यशने चाहत्यांना दिलं सरप्राईज! Toxicचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित
‘केजीएफ’ (KGF) फेम यश याचे केवळ साऊथकडेच नाही तर मुंबई, महाराष्ट्रासह भारतातील कानाकोपऱ्यात चाहते आहेत. केजीएफ चित्रपटाच्या ऑरामधून अजूनही यशे चाहते बाहेर पडले नव्हतेच की त्याचा आता आणखी एक Violent Look असलेला ‘टॉक्सिक’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज ८ जानेवारी वाढदिवसाच्या निमित्तानेच यशच्या (Yash) चाहत्यांना टॉक्सिक चित्रपटाचा टीझर भेट म्हणून दिला आहे. Toxic : A Fairy Tale For Grown Ups चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांनी केलं असून या चित्रपटातही यश चा हटके लूक आणि अभिनय प्रेक्षकांसमोर येणार आहे. (Kannada Film Toxic)

तर, टॉक्सिक या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात एका स्मशानभूमीतील दृश्याने होते, जिथे काही लोकं शोक व्यक्त करत आहेत. पण, यशच्या तुफान एन्ट्रीने त्याची चित्रपटात किती भारदस्त भूमिका असेल हे दाखवून जाते.त्याचा स्वॅग, अॅक्शन पाहून चाहते भलतेच खूश झालेत. विशेष म्हणजे हॉलिवूडच्या दर्जाचा थरार ‘टॉक्सिक’ला मिळवून देण्यासाठी साऊथच्या मेकर्सनी हॉलिवूडमधील दिग्गजांची फौज या चित्रपटासाठी उभी केली आहे. चित्रपटातील अॅक्शन कोरिओग्राफी ‘जॉन विक: चॅप्टर २’ आणि ‘आयर्न मॅन’ फेम जे.जे. पेरी यांनी केली असून ‘ड्यून: पार्ट २’ साठी काम केलेल्या बाफ्टा-विजेत्या DNEG या कंपनीने व्हिज्युअल इफेक्ट्सची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे आता साऊथच्या चित्रपटांचा दर्जा अधिक वरचढ झाला आहे हे निश्चित दिसून येत आहे. (Toxic Movie Teaser)

दरम्यान, ‘टॉक्सिक’ चित्रपटाच्या कास्टबद्दल बोलायचं झालं तर, यश प्रमुख भूमिकेत असून बॉबी देओल पुन्हा एकदा खतरनाक खलनायक या चित्रपटात साकारणार आहे. याव्यतिरिक्त रुक्मिणी वसंत, नयनतारा, कियारा अडवाणी (Kiara Advani), हुमा कुरेशी, तारा सुतारिया या अभिनेत्री देखील या चित्रपटात दिसतील. मुळ कन्नड भाषेत हा चित्रपट रिलीज होणार असून तो इंग्रजी, हिंदी, मल्याळम, तेलुगू भाषेत डब करत पॅन वर्ल्ड ठरणार आहे. (Toxic Movie Pan World Release)
================================
हे देखील वाचा : ‘व्ही शांताराम’ यांचा बायोपिक Ravi Jadhav डिरेक्ट करणार होते?
================================
एकीकडे टॉक्सिक चित्रपटातच बॉलिवूड आणि साऊथचे २ दिग्गज अर्थात यश आणि बॉबी देओल (Bobby Deol) एकमेकांना टक्कर दणार आहेतच, तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ (Dhurandhar 2) चा सामना करणार आहे. हिंदी चित्रपटृष्टीच्या इतिहासातील ‘धुरंधर’ हा ८३ कोटी पार करणारा पहिला चित्रपट ठरला असून आता १९ मार्च २०२६ रोजी ‘टॉक्सिक’ आणि ‘धुरंधर २’ मध्ये बाजी कोण मारणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच, २०२६ च्या दिवाळीत यशचा पहिला वहिला बॉलिवूड चित्रपट ‘रामायण’ (Ramayana Movie) देखील रिलीज होणार असून यात तो रावणाची भूमिका साकारणार आहे. (Dhurandhar 2 vs Toxic)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi