‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
ट्रेंडफुल्ल लॉकडाऊन
कोरोना मुळे झालेला लॉक डाऊन आणि यात आपण सगळेच घरी आहोत , तर या लॉक डाऊन मध्ये कोणी स्वयंपाक करतय, कोणी व्यायाम करतय तर कोणी आपल्या आवडत्या गोष्टी करण्यात मग्न आहे. या लॉक डाऊन चा चांगला फायदा घेऊन सगळेच काही न काही नव्या गोष्टी करायला लागलंय. या लॉक डाऊन दरमान्य सोशल मीडिया वर काही ” ट्रेंड्स ” फार ट्रेंडी झाले. आपल्याकडे एखादा ट्रेंड येतो आणि तो पटकन व्हायरल होतो. सोशल मीडिया हे आपल्या सगळ्याचं आवडीचं ठिकाण , आपला खूप वेळ आपण इथे स्क्रोल करण्यात घालवतो. तर या लॉक डाऊन मध्ये काय काय ट्रेंड्स ट्रेंडी झाले आणि कोणते ट्रेंड येऊन गेले या बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ….
” अंताक्षरी खेळू चला “
अनेक मराठी कलाकारांनी चक्क ऑनलाइन अंताक्षरी खेळायला सुरवात केली , आपल्या सोशल मीडिया वरून एक गाणं गाऊन त्याच्या शेवटचा शब्द देऊन एक कलाकार आपल्या अनेक मित्र मैत्रिणीना या अंताक्षरी चॅलेंज मध्ये नॉमीनेट करायला लागले. ही अंताक्षरी जरी डिजिटली असली तरी त्यात अनेक कलाकार मोठ्या हौसेनं सहभागी झाले आणि ही गाण्यांची सुरेख मैफिल जमून आली.
” फेसबुकवर रंगल्या चारोळ्या “
” संपत आली जवानी तरी भाऊ म्हणतात हमारी अधुरी कहाणी “
अश्या अनेक चारोळ्याचा पाऊस तुमच्या सोशल मीडिया वर पडला असेल ना ! फेसबुक वर जुने फोटो शोधून त्यावर अश्या भन्नाट आणि कल्पक चारोळ्या लिहिण्याचा हटके ट्रेंड नुकताच सोशल मीडिया वर झाला. यामुळे अनेकांच्या जुन्या फोटोना उजाळा मिळाला पण लोकांच्या कल्पक कवितांच्या कंमेंट्स मध्ये भरभरून आल्या. तुम्ही सुद्धा हा ट्रेंड नक्कीच अनुभवला असेल यात शंका नाही.
” ट्रेंडी कॉफी ची गोष्ट “
” डालगोना कॉफी ” ही सध्या सोशल मीडिया वर एवढी ट्रेंडी आहे की अनेकांच्या स्टेटस आणि इंस्टाग्राम स्टोरी मध्ये तुम्ही ती बघितली असेल. खूप कलाकारांनी या कॉफीचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेयर केले. ही कॉफी एवढी का ट्रेंड झाली हे ठाऊक नाही पण ही ट्रेंडी कॉफी बनवण्यात अनेक जण रमले आहेत. या कॉफीवरून अनेक मिम्स सुद्धा आलेत.
” बिंगो चॅलेंज “
सोशल मीडिया वर कधी काय ट्रेंड होईन माहीत नाही , इथे एखादा ट्रेंड येऊन लगेच ट्रेंड होतो. तुम्ही तुमच्या सोशल मीडिया वर नक्कीच बिंगो चॅलेंज खेळला असाल , आपण साधं बिंगो खेळतो पण हे बिंगो चॅलेंज थोडं वेगळं होत. विविध फिल्ड च्या निगडित किंवा अगदी मजेशीर बिंगो यात बनवले गेले होते आणि हे चॅलेंज झालं की अनेक जण आपल्या मित्र मैत्रिणी ना यात नॉमीनेट करायचे. बिंगो चॅलेंज खेळण्यात एक वेगळीच मज्जा होती यात अनेक कलाकार देखील सहभागी झाले होते.
” साडी चॅलेंज “
एवढयात तुम्ही सोशल मीडिया वर अनेक मुलींचे साडी मधले फोटो बघितले असतील तर हा ट्रेंड होता ” साडी चॅलेंज ” चा. आपण साडी मधला फोटो टाकून आपल्या बाकी मैत्रिणींना यात टॅग करायचं किंवा त्यांना या चॅलेंज साठी नॉमीनेट करायचं.
तर अशी अनेक चॅलेंज आणि ट्रेंड्स सोशल मीडिया वर येत राहणार आहेत , तुम्ही सुद्धा घरबसल्या अश्या ट्रेंड्स ची मज्जा घ्या.