जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…

दोन कडक डायलॉग आणि थिएटरमध्ये टाळ्यांचा गडगडाट
…यह पुलीस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही,
…कौन है वो माय का लाल
चित्रपट दृश्य माध्यम असले तरी आपल्या चित्रपट प्रेक्षक संस्कृतीत ते डायलॉगसाठी जास्त लोकप्रिय आहे. एखाद्या कलाकाराच्या एक्स्प्रेशनला टाळ्या मिळण्यापेक्षा भारी संवादाला हाऊसफुल्ल थेटरात टाळ्या शिट्ट्या हुकमी. ती एक भन्नाट संस्कृती. दोन सुपर हिट डायलॉगने तर बरेच काही घडवले हे चित्रपट रसिकांच्या मागच्या पिढीने चांगलेच अनुभवलयं. (Dialogue)
प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर’ (रिलीज ११ मे १९७३) मध्ये इन्स्पेक्टर विजय खन्नाला (अमिताभ बच्चन) भेटायला आलेला शेरखान (प्राण) खुर्चीवर बसणार तोच विजय जोरदार लाथेने खुर्ची उडवतो आणि त्याच वेगात बोलतो, जब तक बैठने को ना कहा जाए शराफत से खडे रहेना… यह पुलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं… थिएटरमध्ये प्रचंड टाळ्या शिट्ट्या आणि या जोरदार डायलॉगसाठीही अनेकांनी पुन्हा पुन्हा ‘जंजीर’साठी थिएटरची वारी केली (असं अगदी के. असिफ दिग्दर्शित ‘मुगल ए आझम’पासून अनेक चित्रपटांबाबत घडले आणि असे आपल्या चित्रपटवेड्या देशात घडलयं. जुन्या पिढीतील चित्रपट दीवाने यावर डायलॉगसह बोलतील.) मुंबईत मेन थिएटर इंपिरियलमध्ये ‘जंजीर’ने पन्नास आठवड्यांचा मुक्काम उगाच केला नाही. हे घडत असतानाच अमिताभ बच्चनला ‘सूडनायक’ (ॲन्ग्री यंग मॅनची) इमेज मिळाली. त्याचा सुरुवातीचा ‘पडता काळ’ कायमचा मागे राहिला. हिंदी चित्रपटसृष्टीच्या नवीन इतिहासाचे पहिले पाऊल पडले.(Dialogue)

माझे ते शालेय वय होते. तर सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम क्षेत्रात राजेश खन्नाचा जणू हिस्टेरिया निर्माण झाला होता. अशातच ‘जंजीर’ आला. सलिम जावेद यांच्या पटकथा संवादाचा ‘जंजीर’च्या यशात महत्वाचा वाटा. हा भारी डायलॉग त्यांचाच. अमिताभने तो कडकपणे साकारला.
चित्रपटाच्या जगात यश हेच चलनी नाणे असते या अलिखित नियमानुसार आता अमिताभचा प्रदर्शित होत असलेला प्रत्येक नवीन चित्रपट ‘फोकस ‘मध्ये होता. र्जी दिग्दर्शित ‘अभिमान’ (रिलीज २७ जुलै १९७३), सुधेन्द्रू राॅय दिग्दर्शित ‘सौदागर’ (२६ ऑक्टोबर १९७३. अमिताभचा अगदी वेगळाच चित्रपट) आणि मग आला ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘नमक हराम’ ( रिलीज २३ नोव्हेंबर १९७३.. पन्नास वर्ष झालीदेखिल).
‘बेकेट’ या बहुचर्चित नाटकावर आधारित चित्रपट. पटकथा व संवाद गुलजार यांचे. आपल्या वडिलांच्या (ओम शिवपुरी) आजारात विकी (अमिताभ बच्चन) कारखाना उद्योग सांभाळत असतानाच कामगार नेते बिपीन लाल (ए. के. हनगल) यांची त्याला एका प्रकरणात माफी मागावी लागते. (Dialogue)
याचा ‘बदला’ घेण्याच्या विक्कीच्या रागात त्याचा अतिशय जिवलग आणि गरीब परन्तु सच्चा मित्र सोमू ( राजेश खन्ना) त्याला मदत करण्यासाठी चंदर नाव धारण करुन तेथे नोकरीला लागतो. कामगारांचे सुख दु:ख तणाव यांनी भरलेले आयुष्य पाहून तो हेलावतो व त्याना मदत करायला हवी असे विकीला सुचवतो. पण विकीचे वडिल चंदर आपला माणूस आहे हे कामगारांत दाखवून देताच ते कामगार भडकतात आणि चंदरला बेदम मारहाण करतात, ते कळताच विकी अतिशय रागाने कामगार वस्तीत शिरतो आणि अतिशय संतापाने म्हणतो, कौन है वो माय का लाल जिसने मेरे सोमू पर हाथ उठाया, अगर है खून मे मस्ती तो आ मैदान मे…. पब्लिक अशा काही टाळ्या शिट्ट्यांनी रिस्पॉन्स देतो की थिएटरचे छप्पर उडून जाईल की काय असे वाटावे.
या जोरदार डायलॉगसाठीही (Dialogue) अनेक फिल्म दीवाने पुन्हा पुन्हा ‘नमक हराम ‘चे तिकीट काढू लागले. मुंबईत मेन थिएटर नाॅव्हेल्टीत पिक्चरने रौप्यमहोत्सवी यश संपादले. आज वयाची साठी ओलांडलेले एव्हाना आपल्या फ्लॅशबॅकमध्ये रमले असतील, तर त्यानंतरच्या रसिक पिढीने ‘जंजीर’ व ‘नमक हराम’ च्या यशाच्या गोष्टी अनेकदा ऐकल्या असतीलच. एका पिढीतील चित्रपट त्यातील लोकप्रिय गाणी व डायलॉगने कायमच पुढील अनेक पिढ्यात जात असतातच. जुने ते सोने म्हटले जाते त्यात एक फंडा हादेखील नक्कीच आहे.
अनेक पिक्चर्समधील अनेक डायलॉग (Dialogue) हिट्ट आहेत. राजकुमार त्यामुळेच स्टार झाला, पब्लिकला त्यासाठीच भारीच आवडायचा. प्रत्येक कलाकाराची संवादफेकीची आपली एक शैली. आवाज ही अभिनयातील अतिशय महत्वाची गोष्ट. आणि त्यातही त्या भाषेचा पोत समजायला हवा. अमिताभ त्यात ‘किंग’. त्याचे अनेक डायलॉग सुपर हिट आहेत. त्याचा मजबूत पाया घातला गेला तो यह पुलीस स्टेशन है आणि कौन है वो माय का लाल या दोन खणखणीत संवादानी. फार पूर्वी कुलाब्यातील मुकेश मिलमधील अमिताभच्या विशेष स्वतंत्र मुलाखतीचा योग आला असता, माझा एक प्रश्न होता, ॲन्ग्री यंग मॅन या तुमच्या इमेजचे श्रेय तुम्ही कोणाला द्याल? अमिताभने अतिशय शांतपणे सांगितले, ‘जंजीर ‘चे लेखक सलिम जावेद व ‘नमक हराम ‘चे दिग्दर्शक ह्रषिकेश मुखर्जी…अमिताभही या दोन डायलॉगचे महत्व जाणून आहे यात बरेच काही आले. मी स्वतः पुन्हा पुन्हा ‘जंजीर’ व ‘नमक हराम’ पाहताना या माझ्या आवडत्या डायलॉगना उत्फूर्त टाळ्या वाजवल्यात.